Actor Omkar Govardhan In Vastraharan : आई कुठे काय करते मालिकेतील आशुतोष लवकरचं दिसणार नवीन भूमिकेत

 Actor Omkar Govardhan In Vastraharan 

Actor Omkar Govardhan In Vastraharan अभिनेता ओंकार गोवर्धनने नुकताच आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्याने मालिकेत साकारलेली आशुतोषची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण त्याची भूमिका संपल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावं लागलं आणि आता त्याचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत. ओंकारला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी  सर्वजण खूप उत्सुक आहेत.

 Actor Omkar Govardhan In Vastraharan 

पण आता ओंकारच्या फॅन्ससाठी खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता ओंकार गोवर्धन लवकरच एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ओंकार आता एखाद्या मालिकेत किंवा सिनेमात नाही तर चक्क एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो लवकरच वस्त्रहरण या नाटकातून भूमिका साकारताना दिसणार आहे.

ओंकारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या नाटकाच्या टीमसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या नाटकात ओंकारची नेमकी भूमिका कोणती असेल ते अजून समोर आलेलं नाही. पण या नाटकात ओंकारला समोरासमोर पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद येणार आहे.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीने मुंबईत घेतलं नवीन घर

या Actor Omkar Govardhan In Vastraharan नाटकात त्याच्यासोबत प्रियदर्शन जाधव, रोहन गुजर, अंशुमन विचारे, अरुण कदम, पुष्कराज चिरपुटकर, संदेश उपशाम अशा अनेक उत्तम कलाकारांची फौज आहे. हे एक कॉमेडी नाटक असणार आहे. भद्रकाली प्रोडक्शन्स हे नाटक सादर करत आहे आणि हे अजरामर नाटक नवीन कलाकारांसोबत रंगभूमीवर परतणार आहे.

वस्त्रहरण नाटक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस

सर्वच कलाकार या नाटकाची जोरदार तालीम करत आहेत. नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार २७ एप्रिल दुपारी ४:३० वाजता गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत दुसऱ्या ठिकाणी प्रयोग होतील. या नाटकाचे फक्त ४२ प्रयोग होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. नाटकाची तिकीट विक्रीसुद्धा सुरू झाली आहे.

इतके Actor Omkar Govardhan In Vastraharan उत्तम कलाकार असल्यानंतर हे नाटक खूपच छान असणार यात शंका नाही. प्रेक्षक या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता ओंकार गोवर्धनला आई कुठे काय करते या मालिकेनंतर या कॉमेडी नाटकामध्ये नवीन भूमिकेत पाहणं हे त्याच्या फॅन्ससाठी एक पर्वणीच असणार आहे. फॅन्स नक्कीच त्याला समोरासमोर अभिनय करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top