प्रसिद्ध अभिनेता अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन

अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन

अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन. अभिनेता अमित खेडेकर हा मराठी मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच 15 मे रोजी अमितच्या आईचं कॅन्सरमुळे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे अमितला जबर धक्का बसला आहे. तो अक्षरशः कोसळून गेलाय. त्याने ही दुःखद बातमी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना दिली.

अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन
अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन

अमितने आपल्या आईचे काही फोटो पोस्ट करत त्यासोबत एक पोस्ट लिहून आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमित खेडेकरच्या आईचं कॅन्सरने दुःखद निधन

या पोस्टमध्ये त्याने लिहलंय की,

हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की माझी आई, सौ. सुनिता खेडेकर, 15 मे रोजी रात्री 12.50 च्या सुमारास वयाच्या 60 व्या वर्षी या जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती.
ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दुःखाच्या छायेत आहेत. तिच्या जवळच्या लोकांन पलीकडे ही, माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दुःखात गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या निःस्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली.
खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. या कठीण काळात आमच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.
– खेडेकर कुटुंबीय

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं दुःखद निधन

अमितने या शब्दांत आपलं आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत अमितच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे आणि अमितला या दुःखाच्या प्रसंगी धीर दिला आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top