AC Cooling Capacity सध्या वाढत्या उन्हामुळे सगळे त्राहीमाम त्राहीमाम करताय आणि या वाढत्या उन्हापासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एअर कंडिशनर (AC). जर एसी विकत घ्यायचा असेल, तर सर्वात आधी तुम्हाला प्रश्न विचारला जातो की, कोणता एसी घ्यायचा आहे ? 1 टन, 1.5 टन की 2 टन.
मग तुमच्या मनात हा प्रश्न कधी आलाय का, की हे 1 टन, 2 टन नेमकं आहे तरी काय ? एसीचं वजन 1 टन किंवा 2 टन तर असतं का ? अनेकांना असं वाटतं की, एसीचं वजन तेवढं असल्यामुळेचं त्याला 1 टन किंवा 2 टन म्हटलं जातं. परंतु एक छोटासा एसी इतका वजनदार कसा असू शकतो ?
AC Cooling Capacity
तर हा एक गैरसमज आहे. 1 टन किंवा 2 टन हे एसीचं वजन नसून त्याची कूलिंग कॅपॅसिटी (AC Cooling Capacity) असते. जसं तापमान मोजण्यासाठी आपण सेल्सिअस हे मापक वापरतो. तसंच कुलिंग मोजण्यासाठी ब्रिटिश थर्मल युनिट म्हणजेचं BTU हे मापक वापरलं जातं आणि याचं BTU ला टनमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. म्हणूनचं एसीची कॅपॅसिटी ही टनमध्ये मोजली जाते.
तुम्ही जितक्या जास्त टन कॅपॅसिटीचा एसी खरेदी कराल, तितकं जास्त तुम्हाला विजेचं बिल येऊ शकतं. कारण त्यानुसारचं त्याची कुलिंग कॅपॅसिटी वाढते. कुलिंग कॅपॅसिटी वाढली की, विजेचा खप वाढतो आणि विजेचा खप वाढला की, विजेचं बिलही वाढतं.
जास्त AC वापरूनही बिल कमी कसं येईल
परंतु आता जास्त कुलिंग तर सर्वांनाचं हवी आहे. मग यावर उपाय कोणता ? तर तुम्ही फाईव्ह स्टार रेटिंग असलेले एसी खरेदी करू शकतात. जिथे तुम्ही जास्त कुलिंग कॅपिसिटीचे एसी घेतल्यानंतरही विजेची बचत होते आणि तुम्हाला विजेचं बिल कमी येतं.
आणि जर तुम्हाला आयुष्यभरासाठी फ्री वीज हवी असेल, तर भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 300 युनिट फ्री वीज मिळेल. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.
तर तुम्ही एसी घ्यायचा विचार करताय का ? तुम्हाला हे कूलिंग कॅपॅसिटीचं (AC Cooling Capacity) गणित माहिती होतं का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !