कलर्स मराठीवरील अबीर गुलाल मालिकेत दिसणार हा लोकप्रिय अभिनेता

अबीर गुलाल

कलर्स मराठीवर अबीर गुलाल मागील काही दिवसांपूर्वी ‘अबीर गुलाल’ या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच मालिकेचा प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर दाखवण्यात आला होता. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेत्री पायल जाधव या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पण या मालिकेत मुख्य अभिनेता कोण असेल याबद्दल माहिती समोर आली नव्हती. नुकताच या मालिकेचा आणखी एक नवीन प्रोमो समोर आलाय. 

कलर्स मराठीवर अबीर गुलाल 

नवीन प्रोमोवरून कळतंय की, कलर्स मराठीवर अबीर गुलाल मालिकेची कथा कोल्हापुरात घडणार आहे. मालिकेचा हिरो हा आरजे शुभ्राचा खूप मोठा फॅन असतो. तो शुभ्राला भेटण्यासाठी रेडिओ स्टेशनला जातो तेव्हा त्याची भेट शुभ्राऐवजी श्री हिच्याशी होते. शुभ्रा आणि श्रीच्या गुंफलेल्या नशिबांचा गुंफलेला खेळ आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Gayatri Datar In Abir Gulal
Gayatri Datar In Abir Gulal

अभिनेता अक्षय केळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो पहिल्यांदाच अभिनेत्री गायत्री दातारसोबत काम करताना दिसेल. अक्षयला या मालिकेत नव्या भूमिकेत पाहून त्याचे फॅन्स खूपच खुश झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत फॅन्स आणि अनेक मराठी कलाकार अक्षय केळकरला या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देत आहेत.

Colors Marathi Abir Gulal Serial  

याबरोबरच ‘अबीर गुलाल’ ही मालिका कधीपासून सुरू होणार याबद्दलही खुलासा झाला आहे. ही मालिका येत्या 27 मेपासून दररोज रात्री 8:30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर दाखवली जाणार आहे. सध्या या वेळेवर ‘काव्यांजली‘ ही मालिका सुरू आहे पण ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल आणि त्याजागी ‘अबीर गुलाल’ ही मालिका दाखवण्यात येईल.

Akshay Kelkar In Abir Gulal Serial
Akshay Kelkar In Abir Gulal Serial

अभिनेता अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव ही मालिकेची स्टारकास्ट प्रेक्षकांना फारच आवडतेय. यासोबतच मालिकेत अजून कोणकोणते कलाकार दिसणार आहेत हेसुद्धा लवकरच कळेल. मालिकेची कथा आणि कलाकार दोन्हीही खूपच उत्तम आहेत. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता खूपच वाढली आहे आणि सगळेजण खूपच आतुरतेने वाट पाहताय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top