Abhijeet Khandkekar Shocking News : अभिनेता अभिजीत खांडकेकरचे मालिकेच्या सेटवर हाल, जेवणदेखील मिळालं नाही

Abhijeet Khandkekar Shocking News

Abhijeet Khandkekar Shocking News अभिजीत खांडकेकर हा मराठी मालिकांमधील आघाडीचा हिरो म्हणून ओळखला जातो. तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय. आजवर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. त्याचा मोठा चाहतावर्गदेखील आहे.

अभिजीतने मनोरंजनविश्वात कोणाचीही ओळख नसताना आपली मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर आज हे स्थान मिळवलं आहे. पण तो जेव्हा नवीन नवीन या मनोरंजनक्षेत्रात आला होता तेव्हा त्याला खूप त्रास सहन करावा लागला.

 Abhijeet Khandkekar Shocking News

नुकताच अभिजीतने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या मालिकेच्या वेळी आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं. बालाजी टेलिफिल्म्सची ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना‘ ही अभिजीतची पहिलीच मालिका होती. या मालिकेच्या शूटिंगच्यावेळी आलेले वाईट अनुभव अभिजीतने सांगितले.

अभिजीतला (Abhijeet Khandkekar Shocking News) पहिल्या मालिकेत बालाजी टेलिफिल्म्सबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिजीतने उत्तर दिलं की, या मालिकेमुळे आम्हाला ओळख मिळाली, भरपूर प्रसिद्धी मिळाली, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ही आमची पहिलीच मालिका होती. याबद्दल मी पूर्णपणे प्रोडक्शन हाऊसला दोष देणार नाही, कारण यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो. काही गोष्टी वरतीपर्यंत पोहचत नसाव्यात.

अभिनेता अभिजित खांडकेकरचे मालिकेच्या सेटवर हाल

ती माझी पहिलीच मालिका होती त्यामुळे अनेक बाबतीत वाईट वागणूक देण्यात आली. काम करण्याची संधी दिली असं म्हणत आमच्याकडून खूप कमी पैशात काम करून घेण्यात आलं. तो एक त्यांच्या व्यवसायाचा भाग होता म्हणून ठीक आहे पण लहान लहान गोष्टींमध्ये आम्हाला त्रास दिला गेला त्यामुळे माणूस म्हणून चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती असं वाटतं.

मराठी अभिनेत्रीने श्वानाचा धुमधडाक्यात साजरा केला वाढदिवस

इंडस्ट्रीच्या नियमानुसार चांगल्या प्रकारचं जेवण, चांगल्या प्रकारची वागणूक दिली गेली नाही. आमचे सहकलाकार आमच्यासाठी जेवणाचा डबा घरून घेऊन यायचे. त्यावेळी मी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आणि वेळोवेळी त्यांना सुनावलं होतं. तुम्ही काम करण्याची संधी देताय, आमच्याकडून अभिनयाचं मोठं काम करून घेताय ज्यामुळे आमचं करियर होईल पण याचा अर्थ आम्ही तुमचे गुलाम आहोत असं नाही.

अभिनेता अभिजीत खांडकेकरला (Abhijeet Khandkekar Shocking News) करियरच्या सुरुवातीला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असेल. पण आज त्याने या सर्व अडचणींवर मात करत फक्त आपल्या टॅलेंटच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत यश मिळवून मोठं नाव कमावलं आहे. आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे आणि तो नक्कीच अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहे. 

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top