Aaji Aajoba Marathi Goshta सुनेने सासू-सासर्‍याला घराबाहेर काढलं, मग नातवंडांनी आजी-आजोबाला चक्क …

Aaji Aajoba Marathi Goshta

Aaji Aajoba Marathi Goshta “मॅडम तुमच्या मुलाला समजावून सांगा, त्याने आज माझ्या मुलाच्या थोबाडीत मारली. त्याच्याबरोबर मारामारी केली. किती लागलंय पहा त्याला. पुन्हा असं काही केलं, तर मी तुमची पोलिसांमध्ये तक्रार करेल, हे लक्षात ठेवा.” श्लोकची आई वैदहीकडे तिच्या मुलाची सारांशची तक्रार करत होती.

सारांश हा मान खाली घालून उभा होता. वैदही त्याच्याकडे रागाने पाहते आणि म्हणते, “माफ करा श्लोकच्या आई, तो कधीचं असं करत नाही. पण आज त्याने कसा काय हात उचलला काय माहित, पुन्हा असं होणार नाही. याची गॅरंटी मी देते, पण तुम्ही पोलीस तक्रार वगैरे करू नका.”

Aaji Aajoba Marathi Goshta 

श्लोकची आई म्हणते, “एवढ्या वेळेस सोडते, पण पुढच्यावेळेस नाही सोडणार, लक्षात ठेवा.” असं म्हणून श्लोकची आई तेथून निघून जाते. वैदही दरवाजा बंद करते. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

सारांश म्हणतो, “याला अजून दोन-तीन फटके द्यायला पाहिजे होते, मग चांगला सुधारला असता.”

हे ऐकून वैदेही चक्क सारांशच्या थोबाडीत मारते.  सारांशचे आजी आजोबा बाहेर येतात. आजोबा त्याला जवळ घेतात आणि म्हणतात, “सुनबाई हे काय करतेस ? 

Aaji Aajoba Marathi Goshta 

एवढ्याशा लहान मुलाला कोणी मारतं का ?” वैदेही म्हणते, “बाबा तुमच्या लाडामुळेचं बिघडलाय तो आणि एवढ्या लहान मुलाला कोणी मारत नाही, मग त्याने श्लोकला का मारलं ? तुम्ही पाहिलं नाही काय अवस्था झाली होती त्याची,  आई तर पोलिसांना तक्रार करण्याची धमकी देत होती.”

आजोबा सारांशला म्हणतात, “काय झालं बेटा, मला सांग.” सारांश म्हणतो, “आजोबा तो श्लोक नेहमी मला त्रास देतो, मला चिडवतो, मला ढकलतो. मी नेहमी सहन करायचो. पण परवा तुम्हीच मला सांगितलं होतं ना, 

Aaji Aajoba Marathi Goshta 

अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा असतो. म्हणून मी ठरवलं की, आता अन्याय नाही सहन करायचा आणि मी त्याला मारलं. मग चांगलाचं घाबरून पळून गेला तो.” आजोबा म्हणतात, “अरे वाह, एकदम बरोबर केलंस तू.”

वैदेही चिडून म्हणते, “वा बाबा वा, काय शिकवताय तुम्ही स्वतःच्या नातवंडाला. त्याला गुंडा वगैरे बनवायचंय की काय ? 

Aaji Aajoba Marathi Goshta 

तो शिकून मोठा साहेब बनावा असं मला वाटतं आणि तुम्हाला त्याला रस्त्यावरचा मवाली बनवायचंय, असं दिसतं.”

आजोबा म्हणतात, “सुनबाई एकदा ऐकून तरी घे. मी सारांशला त्या मुलाला मारलं म्हणून शाबासकी देत नव्हतो, तर अन्याय कधीही सहन करू नये, 

Aaji Aajoba Marathi Goshta 

अन्याय करणाऱ्याला चांगला धडा शिकवावा, हे त्याला कळलं म्हणून वाह म्हणालो. आता खरं कारण काय, तो मुलगा खरंच त्रास देत होता का, चूक कोणाची, हे तर शोधून काढावं लागेल ना.”

वैदेही म्हणते, “मला काही नाही शोधून काढायचंय आणि मला माझ्या मुलाला असे संस्कारही द्यायचे नाहीये. कालपर्यंत तो शांत आणि हुशार मुलगा होता. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

परंतु जेव्हापासून तुम्ही इथे राहायला आलाय, त्यापासून तो असंच वागायला लागला आहे आणि त्यातल्या त्यात आई तुम्ही माझ्या मुलीला तसल्या गोष्टी शिकवताय.”

आजी पुढे येते आणि म्हणते, “सुनबाई हे काय बोलतेस तू ? मी नियतीला काय शिकवतेय, कोणत्या तसल्या गोष्टी ? ” वैदही म्हणते, “तुम्ही तिला देव पूजा कशी करायची, स्वयंपाक कसा करायचा, या सगळ्या गोष्टी सांगत होता. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

तुम्हाला काय तिला गावची गावठी पोरगी बनवायचय की काय, मला तिला शहरातील मॉडर्न, शिकलेली मुलगी बनवायचं आणि तुम्ही तिला गावठी मुलगी बनवण्याच्या मागे लागल्या आहात.

आता खूप झालं तुमच्या दोघांचं. जोपर्यंत तुम्ही येथे राहत नव्हता, सगळं किती छान चाललं होतं. तुम्ही इथे राहायला आला आणि मुलांची वळण बिघडली. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

मला त्यांना असं वाढू नाही द्यायचं. मी आजचं अभिषेकशी बोलते आणि तुम्हाला परत गावी पाठवून देते.”

आजी म्हणते, “सुनबाई बस झालं. आम्ही आमच्या नातवंडांना वाईट वळणं नाही लावत आणि तुला जे वाईट वळण वाटतंय ना, ते खरं तर खूप चांगली वपन आहे, पण जाऊ दे तुला नाही कळायचं आणि तू काय अभिषेकशी बोलून आम्हाला गावी पाठवून देशील. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

 आम्हालाच येथे नाही राहायचं. आम्ही चाललो आमच्या गावी.” असं म्हणून हे दोघे त्यांची बॅग घेतात आणि गावी निघून जातात.

वैदहीला आनंद होतो. पण नियती आणि सारांशला मात्र खूप दुःख होतं. हे दोघे आजी आजोबाला अडवण्याचा प्रयत्न करतात. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

पण आजी आजोबा त्यांना समजावून सांगतात, “आम्हाला येथे मान नाही, तुझ्या आईला आम्ही आवडत नाही. मग आम्ही इथे का राहायचं” म्हणून ते गावी निघून जातात.

संध्याकाळी वैदहीचा नवरा घरी येतो. तेव्हा सारांश आणि नियती हे दोघे त्याला झालेला सगळा प्रकार सांगतात की, मम्मी आजी आणि आजोबाला खूप बोलली. म्हणून ते गावी निघून गेले. अभिषेक खूप चिडतो आणि वैदेहीला जाब विचारतो. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

वैदेही अभिषेकला काही बाही सांगू लागते की, आपल्या मुलांना ते दोघे वाईट वळण लावत होते आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी मला शिवीगाळ केली. नाही नाही ते बोलले आणि ती रडायचं नाटक करते. अभिषेक त्यामुळे वैदेहीची बाजू घेतो. सारांश आणि नियतिला सगळं माहीत असतं आणि आई किती खोटं बोलली हे त्यांना समजतं.

सारांश आणि नियती या दोघांना त्यांच्या आजी-आजोबाची खूप आठवण येत असते. आजी आजोबा किती चांगले आहेत, हे त्यांना माहीत असतं. काहीही करून त्यांना या घरात परत आणायचं आणि वैदेही वाईट वागली आहे, हे सर्वांना दाखवून द्यायचं, असे हे दोघे ठरवतात.

काही दिवसानंतर सारांश आणि नियतीच्या शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमांमध्ये एका विषयावर हे दोघे भाषण करायचं ठरवतात. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

आम्ही आमचा विषय ऐनवेळी सांगू, अशी अट ते ठेवतात. शिक्षिक यासाठी तयार होतात.

आपली मुलं काहीतरी छान करणार आहेत. असं समजल्यावर वैदही आणि अभिषेकला खूप आनंद होतो. हे दोघेही या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेत पोहोचतात. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

एकानंतर एक मुलांचे परफॉर्मन्सेस होत असतात. त्यानंतर सारांश आणि नियती या दोघांचं नाव अनाउन्स केलं जातं. हे दोघेही स्टेजवर येतात.

सारांश म्हणतो, “आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आजी आजोबा आजच्या काळात, आजच्या पिढीत गरजेचे आहेत की नाहीत ? ते त्यांच्या नातवंडांवर चुकीचे संस्कार करतात का ?” नियती त्याची साथ द्यायचं म्हणते. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

हे ऐकून वैदेहीला ऐकून मोठा धक्काचं बसतो. आपली मुलं आता आपला भांडाफोड करणार, असं तिला वाटतं. परंतु हा परफॉर्मन्स तिला काही थांबवता येणार नसतो.

सारांश म्हणतो, “आजच्या काळात आजी आजोबा घरात नसलेलेचं बरे, कारण ते नातवंडाला नेहमी चुकीचं वळण लावतात. वाईट संस्कार देतात.” नियती विचारते, “पण असं कसं, आजी आजोबा तर चांगले संस्कार देतात ना.” सारांश म्हणतो, “नाही नाही ते कसे चांगले संस्कार देतील, कारण ते तर नातवंडाला सांगतात, अन्याय कधी सहन करायचा नसतो. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

अन्यायविरुद्ध लढायचं असतं आणि मुलं अन्यायाविरुद्ध लढली की, तुम्ही आमच्या मुलांना गुंड मवाली बनवायला निघाला की काय, असं आजी आजोबांना म्हटलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. त्यामुळे आजी आजोबा मुलांना चुकीचे संस्कार देतात हे सिद्ध होतं.”

नियती म्हणते, “दादा तू एकदम खरं बोलतोय. हे असंच असतं.” पुढे सारांश म्हणतो, “एवढचं नाही तर आजी आजोबा त्यांच्या गावी सुखी असतात. परंतु आईबापाकडून त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी सासू-सासर्‍यांना शहरात बोलवलं जातं. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

तेव्हा तर फार गोड बोललं जातं. पण मुलं मोठी झाल्यानंतर आजी आजोबाची गरज संपते. मग आजी-आजोबांना टोमणे दिले जातात. त्यांचा अपमान केला जातो आणि त्यांनी घर सोडून जावं, यासाठी प्रयत्न केले जातात.

अगं नियती आपल्या आई-बाबांची पिढी अशीच आहे आणि या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकून घेतल्या पाहिजेत. गरज सरो आणि वैद्य मरो, ही म्हण लक्षात ठेवायला पाहिजे.” नियती विचारते, “दादा तुला ही म्हण कोणी शिकवली ?” तर सारांश म्हणतो, “मला ही म्हण आजी-आजोबांनी शिकवली. पण ही सुद्धा त्यांची चूक आहे. कारण त्यांनी मला माझ्या आई-वडिलांबद्दल भडकवून दिलंय. मला त्यांना नाव ठेवता यावी, म्हणूनचं त्यांनी मला ही म्हण शिकवली.”

सारांश आणि नियतीचे हे शब्द फक्त वैदही आणि अभिषेकचं नाही, तर तेथे बसलेल्या अनेक आई-बाबांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत असतात. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

कारण घरोघरी मातीच्या चुली असतात. सगळीकडे असंच घडत असतं.

नियती म्हणते, “दादा परंतु यात खरंच आजी-आजोबांची चूक आहे का ?” सारांश म्हणतो, “हो नियती यामध्ये फक्त आणि फक्त आजी-आजोबांचीचं चूक आहे. कारण त्यांनी त्यांच्या मुलांना जन्म दिलेला असतो आणि मुल तर शहरात जाऊन त्यांना विसरून गेलेले असतात. परंतु जेव्हा त्यांना मुलं होतात. तेव्हा मात्र त्यांची गरज निर्माण होते. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

आजी आजोबाही प्रेमाने दुधावरची साय म्हणून नातवंडांना सांभाळायला येतात आणि जेव्हा ही दुधावरची साय पक्की होते. नातवंड मोठी होतात. तेव्हा ते आजी आजोबा मुलांना पुन्हा एकदा अडचण वाटू लागतात आणि त्यांची गावी रवानगी होते.

सारांश आणि नियतीचा हा परफॉर्मन्स पाहून सगळे सुन्न झालेले असतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. शाळेचे प्राचार्य या दोघांचं खूप कौतुक करतात. 

श्री स्वामी समर्थ मराठी गोष्ट

एवढ्या लहान वयात त्यांनी किती छान सामाजिक विषयावर मत मांडलं आहे. कार्यक्रम संपतो आणि सारांश नियती हे दोघे गाडी जवळ येतात.

तेव्हा अभिषेक त्यांना विचारतो, “तुम्ही जे काही म्हटला, ते सगळं आपल्या घरी घडलंय का ?” सारांश हो म्हणतो. अभिषेक रागारागाने वैदेहीकडे पाहतो. वैदेही मान खाली घालते.

हे सगळे गाडीत बसतात आणि गाडी त्यांच्या घराकडे जाण्याऐवजी, गावाकडे जाते आजी आजोबांकडे. आजी-आजोबांना भेटून सारांश आणि नियतीला खूप आनंद होतो. 

Aaji Aajoba Marathi Goshta 

वैदेही आणि अभिषेक आजी-आजोबाची माफी मागतात की, “आमचं चुकलं, आम्ही परत असं करणार नाही. तुम्ही परत चला, आमच्यासाठी नाही तुमच्या नातवंडांसाठी कायमचं.”

आजी आजोबा सगळं विसरून पुन्हा त्यांच्याकडे राहायला तयार होतात. त्यामुळे सारांश आणि नियतीला खूप आनंद होतो आणि त्यानंतर हे सगळे आनंदाने राहतात. आजी आजोबा नातवंडांना खूप चांगले संस्कार देतात.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top