Aadhar Card In Marathi आजच्या काळात तुम्हाला आपल्या देशात क्वचितच असा एखादा माणूस सापडेल, ज्याच्याकडे आधार कार्ड नाहीये. आधार कार्डचे असे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाकडे आधार कार्ड असतंच. परंतु Aadhar Card In Marathi आधार कार्ड म्हणजे काय ? आधार कार्डचे फायदे आणि गरज काय आहेत ? आज आपण याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
(Aadhar Card In Marathi) आधार कार्ड म्हणजे काय ?
आधार कार्ड हे भारत सरकारने भारतीय नागरिकांना दिलेलं एक ओळखपत्र आहे. परंतु ते भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र नाही.
आधार कार्ड एक 12 अंकांचं विशिष्ट ओळखपत्र आहे. जे भारतीय विशिष्ट प्राधिकरण म्हणजेच यु आय डी ए आय (UIDAI) ने जारी केलं आहे.
आधार कार्ड रहिवासाचं प्रमाण आहे, परंतु नागरिकत्वाचं प्रमाण नाही.
आधार कार्डबरोबर तुमची वैयक्तिक माहिती जसं की, तुमचं संपूर्ण नाव, तुमची जन्मतारीख आणि पत्ता समाविष्ट करून घेतलेला असतो. त्याचबरोबर तुमची बायोमेट्रिक ओळख म्हणजे हाताच्या दहा बोटांचे ठसे, दोन बुबुळे आणि एक छायाचित्रही संग्रहित केलं जातं.
आधार कार्डचे फायदे आणि गरज :
आधार कार्डची सुरुवात 2009 मध्ये भारत सरकारने नियोजन आयोगाअंतर्गत केली होती.
आधार कार्डमध्ये Aadhar Card In Marathi प्रत्येक व्यक्तीला फक्त एकदाचं नोंदणी करता येते.
आधार कार्डचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कारण तुम्हाला कोणत्याही सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास आधार कार्ड अनिवार्य आहे. जसं की,
१) बँकेत जनधन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
२) पासपोर्ट काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
३) एलपीजी गॅस सबसिडीला लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे.
४) आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण खूप महत्त्वाचं आहे.
५) पीएफ म्हणजेचं भविष्य निर्वाह निधीसाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे.
६) इन्कम टॅक्स रिटर्न, सिम कार्ड, बँकेत अकाउंट उघडणे, होम लोन, पर्सनल लोन आणि बँकेच्या कोणत्याही आर्थिक सुविधा मिळवण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे.
७) सध्या अनेक सरकारी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणं महत्त्वाचं आहे.
एकूणचं आधार कार्ड Aadhar Card In Marathi तुम्हाला प्रत्येक सरकारी किंवा सामाजिक कामासाठी अनिवार्य करण्यात आलं आहे.
तुम्ही जवळच्या आधार नोंदणी कार्यालयामध्ये मोफत किंवा खूप कमी शुल्क देऊन आधार कार्ड काढून घेऊ शकता किंवा अपडेटही करू शकता.
आधार नोंदणी केल्यानंतर भारतीय पोस्टद्वारे आधार कार्ड घरपोच होतं. किंवा तुम्ही यूआयडीएआय (UIDAI) च्या वेबसाईटवरूनसुद्धा आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
हा Aadhar Card In Marathi लेख जर तुम्हाला फायदेशीर ठरला असेल, तर नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आमचे दुसरे लेखही नक्कीच वाचा.
धन्यवाद !