A Sad Mother Story आई न होऊ शकलेल्या बाईची गोष्ट

A Sad Mother Story

A Sad Mother Story मंजिरी आपल्या आईला फोन करते आणि विचारते, “कशी आहेस आई तू ?” आई म्हणते, “मी बरी आहे बाळा. तू अचानक कसा फोन केलास ? आज तर तुझ्या लहान जावेच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रम होता ना. तुला वेळ भेटला का त्या धावपळीतून मला फोन करायला ?”

मंजिरी क्षणभर काहीचं बोलत नाही. हा प्रश्न तिला अपेक्षितचं होता. परंतु फोन केल्या केल्याचं आई असं विचारेल, हे तिला वाटलं नव्हतं. ती क्षणभर थांबते आणि म्हणते, “नाही आई मी नाही गेले.”

A Sad Mother Story 

मंजिरीच्या आवाजावरून आईला समजतं की, ती आत्ताच रडलीये. ती खूप दुःखी आहे. आई विचारते, “का गं काय झालंय बाळा ? तुझा आवाज खूप वेगळा येतोय.”

मंजिरी म्हणते, “नाही गं आई, तसं काही नाहीये.” आई म्हणते, “तुला किती वेळेस सांगितलंय, अख्या जगाशी खोटं बोल. परंतु आईशी नाही. नऊ महिने तुला पोटात वाढवलंय. मला सगळं कळतं. सांग मला काय झालंय ?”

मंजिरी रडू लागते. तिच्या हुंडक्यांचा आवाज आईला दुसऱ्या बाजूने येतो आणि आईच्या काळजात धस्स होतं. A Sad Mother Story आई म्हणते, “नको रडू बाळा. काय असेल, ते मन मोकळं करून सांग मला. आई आहे मी तुझी.”

मंजिरी कसेबसे आपले अश्रू थांबवते. डोळे पुसते आणि आईला म्हणते, “आई खरं आहे तुझं. एका बाळाबद्दल तिच्या आईपेक्षा A Sad Mother Story  जास्त चांगलं कोणाला समजणार नाही. परंतु हे सुख मला अनुभवायचंय आणि तेचं मिळत नाहीये ना.

लग्नाला पाच वर्ष होऊन गेलीत. अजूनही तुझी ही मुलगी आई नाही बनू शकली. A Sad Mother Story सगळं करून झालंय, डॉक्टर, ट्रीटमेंट, उपास, तापास. परंतु अजूनही मी अशीचं आहे वांजोटी.”

हा शब्द ऐकून मंजिरीच्या आईला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, “हे काय बोलतेस बाळा ?” A Sad Mother Story मंजिरी म्हणते, “आई मलाही नाही हा शब्द आवडत. परंतु आता लोकचं मला या नावाने हाक मारतात, तर मला हा शब्द स्वीकारावाचं लागेल ना.

आई बापाची दुःखद गोष्ट

नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की, एवढ्या लवकर बाळ नको. दोन-तीन वर्षांनी पाहू. मी सुद्धा लग्नानंतर हाचं विचार केला होता. परंतु त्या दोन-तीन वर्षानंतर सुद्धा जेव्हा बाळ होत नाही. A Sad Mother Story खूप प्रयत्न करून सुद्धा बाळ होत नाही. तेव्हा समजतं आई होणं किती महत्त्वाचं असतं.”

मंजिरीच्या आई विचारते, “बाळा तुला कोणी काही बोललं का ? तुझ्या सासरची मंडळी काही बोलली का ?” मंजिरी म्हणते, “नाही गं आई. माझ्या सासरची मंडळी तर चांगली आहेत. परंतु आई नं बनण्याचं जेवढं दुःख मला आहे. A Sad Mother Story तेवढंचं एक बाप न बनण्याचं आणि आजी-आजोबांना नं बनण्याचं दुःख त्यांनाही असेलचं ना. ते तोंडावर नाही बोलत. परंतु त्यांचे उदास चेहरे लगेचं मला समजतात.

घरातील लोक आपल्याचं माणसाचं मन नाही दुखवायचं, म्हणून नाही काही स्पष्ट बोलत. परंतु बाहेरच्यांची तोंड कशी बंद करणार ? मागच्या महिन्यात कॉलनीमध्ये एका बाईच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला मी गेले होते. तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणेचं विचारलं, तुम्हाला बाळ होत नाहीये का ? A Sad Mother Story मग तुम्ही येथे थांबू नका. अशा कार्यक्रमात तुमच्यासारख्या बाईने थांबलेलं चांगलं नसतं. आई तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मी ठरवलं की, यानंतर अशा कोणत्याही कार्यक्रमाला नाही जायचं. A Sad Mother Story त्यामुळे आज मी स्वतःच्या छोट्या जावेच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमालाही नाही गेले.

आई लोक किती वाईट बोलतात ना गं. एका बाईचं अस्तित्व हे फक्त बाळ होण्यापुरतचं मर्यादित असतं का ? तिला बाळ नाही झालं, तर एक बाई म्हणून ती परिपूर्ण असू शकत नाही का ? लोक असं का बोलतात ? A Sad Mother Story समोरच्याला त्याचा किती त्रास होत असेल, त्याचं मन किती दुखावलं सात असेल, याचा विचार कोणीच करत नाही.”

आपल्या मुलीचं दुःख पाहून मंजिरीच्या आईच्या डोळ्यातसुद्धा अश्रू येतात आणि ती म्हणते, “जाऊदे बाळा. आपण लोकांची तोंड नाही बंद करू शकत. A Sad Mother Story आपणचं आपलं मन घट्ट करायचं. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. एक दिवस तो तुझी झोळी भरेलं. सगळं काही ठीक होईल.

मंजिरी म्हणते, “आई मी यांना विचारलसुद्धा, अहो मी तुम्हाला बाळ देऊ शकत नाहीये. तुमची इच्छा असेल तर आपण दोघे वेगळे होऊयात. तर हे मला म्हणाले, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला या गोष्टीने काही फरक पडत नाही. A Sad Mother Story मला तू जास्त महत्त्वाची आहेस. आज जे आपल्याकडे नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा, जे आहे त्याची किंमत मी करतो. त्यामुळे असं परत कधी बोलायचं नाही.

माझे सासू-सासरे सुद्धा मला समजून घेतात. निराश होऊ नको, A Sad Mother Story सगळं काही ठीक होईल, असं म्हणतात. पण आई मी त्यांच्या दुःखाला कारणीभूत आहे, हेही मला समजतंय ना.”

मंजिरीची आई म्हणते, बाळा मला खूप बरं वाटलं. तुझे घरचे तुला सपोर्ट करताय. तुझा नवरा जे म्हणाला, ते अगदी योग्य आहे. आज तुझ्याकडे जे नाहीये, त्यासाठी दुःख करत बसण्यापेक्षा, तुझ्याकडे जे आहे, A Sad Mother Story इतका चांगला नवरा, सासू-सासरे त्यांची किंमत कर. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. तू आनंदी राहशील, त्यांच्यासाठी काही करशील, तर देवही तुझ्यासाठी काहीतरी करेल.”

मंजिरी म्हणते, “खरं बोललीस आई. आता यानंतर मी दुःखी नाही राहणार. त्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. A Sad Mother Story एक दिवस माझ्या प्रयत्नाला नक्कीचं यश येईल.” मंजिरी पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने उभी राहते.

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top