LIC Jeevan Lakshya Policy | LIC जीवन लक्ष्य पॉलिसीची मराठीत माहिती

LIC Jeevan Lakshya Policy

LIC Jeevan Lakshya Policy

LIC Jeevan Lakshya Policy प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक उद्दिष्ट असतं, एक लक्ष्य असतं की मला या या वयापर्यंत आयुष्यात हे करायचंय ते करायचंय. ज्या लोकांवर जबाबदार असतात, ते आपल्या बायकोसाठी, आई-वडिलांसाठी, मुलांसाठी काही गोष्टी ठरवतात की, मला या वयापर्यंत त्यांच्यासाठी एवढी गुंतवणूक करायची आहे. त्यांना भविष्यात या गोष्टी द्यायच्यात.

ही सगळी उद्दिष्ट, हे लक्ष्य साध्य करायचं असेल, तर एक गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे बचत. परंतु बचत केलेला पैसा जर तुम्ही घरात ठेवला, तर तो वाढत नाही. त्याचा तुम्हाला पुरेसा फायदा मिळत नाही. परंतु हीच बचत जर तुम्ही एखाद्या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवली, तर त्यावर तुम्हाला व्याज मिळतं, बोनस मिळतो आणि तुम्ही केलेली बचत कितीतरी अधिक पटीने तुम्हाला परत मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशाचं एका योजनेबद्दल सांगणार आहोत. गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल सांगणारा आहोत. जेथे तुम्ही बचत करू शकतात आणि तुमच्या आयुष्यातील उद्दिष्ट, तुमच्या आयुष्यातील लक्ष्य प्राप्त करू शकतात. या गुंतवणुकीच्या योजनेचे नाव आहे (LIC Jeevan Lakshya Policy) एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी.

मग ही एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी नेमकी आहे तरी काय ? या पॉलिसीच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? या पॉलिसीत किती गुंतवणूक करावी लागते ? मॅच्युरिटी पिरेड किती आहे ? बोनस आहे की नाही ? विमा संरक्षण आहे की नाही ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीची वैशिष्ट्ये

1) एलआयसी जीवन लक्ष्य (LIC Jeevan Lakshya Policy) ही नोन लिंकड, पार्टिसिपेटिंग, एन्डोवमेंट, रिलायबिलिटी पॉलिसी आहे.

2) या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेकडे तुम्ही एक गुंतवणुकीचा, बचतीचा पर्याय म्हणूनही पाहू शकता. पण त्याचबरोबर ही एलआयसीची योजना असल्यामुळे तुम्हाला जीवन विम्याचा लाभही मिळेल.

3) समजा जर मॅच्युरिटी आधीचं पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला, तर ही योजना त्या व्यक्तीच्या कुटुंबाला वार्षिक उत्पन्नही मिळवून देते. त्याचबरोबर पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड पूर्ण झाल्यानंतर एक रकमी मॅच्युरिटी बेनिफिटही दिला जातो.

4) एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये कमीत कमी 1 लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम आहे. जास्तीत जास्त मॅच्युरिटी रकमेची कोणतीही सीमा नाहीये.

5) जीवन लक्ष्य पॉलिसीचा अवधी 13 ते 25 वर्षां दरम्यान आहे. तुम्ही या पॉलिसीचे हप्ते त्रैमासिक, सहामासिक, वार्षिक किंवा दर महिनाही भरू शकतात.

6) एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयकर नियम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची कर बचतही करता येते.

7) या पॉलिसीमध्ये तुम्ही पहिले तीन वर्ष प्रीमियम भरला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर पैसे भरता आले नाही, तर पॉलिसी पेड अप मानली जाते आणि तुम्ही यातील पैसे काढून घेऊ शकता.

8) या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला लोन फॅसिलिटीही उपलब्ध आहे. तुम्ही जमा केलेल्या पैशांवर काही टक्केवारी ने लोन तुम्हाला दिलं जातं आणि लोन भरण्याचा अवधी 36 महिने असतो.

9) जर ही पॉलिसी सुरू केल्यानंतर बारा महिन्यांच्या आतचं पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास, त्याने भरलेल्या पॉलिसी प्रीमियमच्या 80 टक्के रक्कम त्याच्या कुटुंबास परत केली जाते.

10) या LIC Jeevan Lakshya Policy पॉलिसीअंतर्गत 15 दिवसांचा फ्री लुक पिरेड सुद्धा दिला जातो. म्हणजे जर पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ही पॉलिसी आवडली नाही, तुम्हाला ही पॉलिसी रद्द करायची असेल, तर पंधरा दिवसांच्या आत तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही भरलेला प्रीमियम तुम्हाला परत केला जाईल.

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीच्या पात्रता आणि अटी

या LIC Jeevan Lakshya Policy पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास एलआयसीने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत, आपण त्या पाहुयात.

1) या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॉलिसी धारकाचे वय 18 ते 50 या वयोगटा दरम्यान असावं.

2) पॉलिसी मॅच्युअर होतेवेळी पॉलिसीधारकाचे वय जास्तीत जास्त 65 वर्ष असू शकतं. म्हणजेचं जर एखाद्या व्यक्तीने 50 वर्षांचा असताना ही पॉलिसी खरेदी केली, तर त्याला जास्तीत जास्त पंधरा वर्षांसाठीचं ही पॉलिसी खरेदी करता येईल.

3) ही LIC Jeevan Lakshya Policy पॉलिसी कमीत कमी 13 वर्षे ते जास्तीत जास्त 25 वर्षासाठी खरेदी करता येते.

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीसाठी आवश्यक कागदपत्रे

ही LIC Jeevan Lakshya Policy पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला काही कागदपत्रे जमा करणं आवश्यक आहेत, त्यांची लिस्ट पाहूया.

1) पॉलिसीधारकाचं आधार कार्ड

2) पॉलिसीधारकाचा पासपोर्ट साईज फोटो

3) पॉलिसीधारकाचा पत्ता, जन्मतारीख, अशी माहिती देणारे एक ओळखपत्र.

हेही वाचा : Bihar Laghu Udyami Yojana 2024 | बिहार लघु उद्यमी योजना माहिती

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी कशी खरेदी करायची

तसं तर एलआयसीच्या अनेक पॉलिसी तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. परंतु एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध नाहीये. यासाठी तुम्हाला एलआयसी एजंटला संपर्क साधावा लागेल आणि त्या मार्फतचं ही पॉलिसी खरेदी करता येते.

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी का महत्त्वाची

सध्याचे 21 वे शतक खूप स्पर्धात्मक आहे. मग ती मोठी माणसं असो किंवा लहान मुलं. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यातल्या त्यात जी घरातील जबाबदारी व्यक्ती असते, कमावती व्यक्ती असते, तिला तर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याकडे लक्ष द्यावं लागतं. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला सुखी, आनंदी ठेवायचं त्यांचं उद्दिष्ट असतं.

आई-वडिलांना तीर्थयात्रेला पाठवायचंय. बायकोची हौस करायचीये, तिला फिरायला घेऊन जायचंय. मुलांना चांगल्या शाळेमध्ये ), चांगल्या कॉलेजमध्ये शिकवायचंय. एखादा चांगला कोर्स करण्यासाठी पाठवायचंय. क्रिकेटची ट्रेनिंग द्यायची आहे. अशी अनेक स्वप्न या जबाबदार व्यक्तीची असतात.

आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आयुष्यात एक उद्दिष्ट ठरवतो, एक लक्ष्य ठरवतो की, या या अवधीपर्यंत, इतक्या वर्षानंतर माझ्याकडे एवढे पैसे जमायला हवे, तरच मी ही सगळी स्वप्न पूर्ण करू शकेल.

आणि ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग आहे बचत करणं. दरमहा उत्पन्नातून काही रक्कम बाजूला ठेवणं. मागे ठेवणं. परंतु ही रक्कम तशीच घरात किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये जपून ठेवली, तर त्या बचतीचा जास्त फायदा होत नाही. ही बचत तुम्ही ठरवलेलं लक्ष्य नक्कीचं पूर्ण करू शकत नाही.

त्यामुळेचं ही बचत केली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक खूप महत्त्वाचं असतं. सध्या बाजारात अशा अनेक योजना आहेत, जिथे तुम्ही तुमची बचत गुंतवू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात. म्हणजे तुम्ही ठरवलेलं लक्ष नक्कीचं पूर्ण होईल.

या सर्व गुंतवणुकीच्या योजनांमध्ये एलआयसीने सुरु केलेली जीवन लक्ष्य ही योजनासुद्धा आहे. मग या योजनेचे असे इतर योजनांपेक्षा जास्त फायदे कोणते आहेत ? ते आपण जाणून घेऊया.

एक तर एलआयसी ही भारत सरकारची विमा कंपनी असल्यामुळे या कंपनीच्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे जोखीमरहित असतात. तुम्ही गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा गॅरंटीड असतो. तो परत मिळेल की नाही, याबद्दल चिंता करण्याची तुम्हाला कोणतीही गरज नाहीये.

दुसरीकडे एखाद्या खाजगी कंपनीच्या गुंतवणूक योजनेत गुंतवलेले पैसे किंवा म्युचल फंडमध्ये गुंतवलेले पैसे हे बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. त्यामुळे तुमची मूळ रक्कम परत येईल की नाही, याचीही शाश्वती नसते.

निश्चितचं या योजनांमध्ये एलआयसीच्या योजनेपेक्षा जास्त परतावा दिला जाईल, असं आश्वासन दिलं जातं. परंतु रिस्क एलआयसीच्या योजनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. जास्त परतावा मिळूही शकतो किंवा मूळ रक्कम मिळणं ही अवघड होऊ शकतं.

म्हणूनचं अनेक लोक एलआयसी योजनांकडे त्यांचा रोख वळवतात. एलआयसीच्या योजनेवर त्यांचा जास्त भरवसा असतो. त्यामुळे जर तुम्हालाही आयुष्यात एखादं उद्दिष्ट, एखादं लक्ष ठेवून पैसे गुंतवायचे असतील, तर एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) नक्कीचं फायदेशीर आहे, तुमच्यासाठी आहे, यात शंका नाही.

FAQ About LIC Jeevan Lakshya Policy एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : एलआयसीने जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) कधी सुरू केली ?

उत्तर : एलआयसीने जीवन लक्ष्य पॉलिसी जून 2015 मध्ये सुरू केली होती.

2) प्रश्न : एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी किती अवधीसाठी घेता येते ?

उत्तर : ही पॉलिसी तुम्ही 13 ते 25 वर्ष या अवधीदरम्यान खरेदी करू शकतात.

3) प्रश्न : एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये किती प्रीमियम भरावा लागतो ?

उत्तर : या पॉलिसीमध्ये मिनिमम सम अश्यूर्ड एक लाख रुपये आहे, तर जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही किती अवधीसाठी ही पॉलिसी खरेदी करता, त्यानंतर सम अश्यूर्ड किती आहे, यानुसार तुमचा प्रीमियम ठरतो.

4) प्रश्न : एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास आयकारात सूट मिळते का ?

उत्तर : होय, या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर अधिनियम 80C अंतर्गत आयकारात दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते.

5) प्रश्न : एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) खरेदी करण्यासाठी कमीत कमी किती वय असायला हवं ?

उत्तर : ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय कमीत कमी 18 वर्षे असायला हवं.

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya Policy) त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी पुढील काही वर्षात आपल्या आयुष्यात एखादं उद्दिष्ट, एखादं लक्ष ठेवलंय, ते पूर्ण करण्यासाठी ही पॉलिसी नक्कीसाग फायदेशीर ठरू शकते, यात शंका नाही.

तुमच्या मनात एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीबद्दल (LIC Jeevan Lakshya Policy) आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन गुंतवणुकीच्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top