Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana
Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana राजस्थान सरकार राज्यातील नागरिकांसाठी नेहमीचं नवीन नवीन आणि उपयुक्त योजना आणत असते. आताही त्यांनी राज्यातील वरिष्ठ नागरिकांचा विचार करून एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव आहे राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना.
या योजनेच्या नावावरूनचं कळतंय की, राजस्थान सरकार राज्यातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवणार आहे. तीर्थयात्रा करण्याची इच्छा प्रत्येक वरिष्ठ नागरिकाची असते. परंतु कामाचा व्याप असो किंवा आर्थिक चणचण या गोष्टींमुळे त्यांचं हे स्वप्न अपुरं राहून जातं. आता राजस्थान सरकारने राज्यातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याचा विडा उचलला आहे.
मग ही Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana नेमकी आहे तरी काय ? या योजनेत राज्यातील कोणत्या वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवली जाईल ? तीर्थयात्रेमध्ये कोणकोणत्या देवस्थानांचं दर्शन घडवलं जाईल. खर्च किती येईल ? Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेची वैशिष्ट्ये
सरकारने सुरू केलेली ही Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता आपण या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
1) या योजनेअंतर्गत राजस्थान सरकारने राज्यातील 40,000 वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
2) या योजनेमध्ये फक्त भारतातीलचं नाही, तर भारताबाहेरील देवस्थानांचीही तीर्थयात्रा घडवली जाईल.
3) या योजनेमध्ये वरिष्ठ नागरिकांची ने आण रेल्वे आणि विमानाद्वारे केली जाईल.
4) 40000 वरिष्ठ नागरिकांपैकी 36 हजार वरिष्ठ नागरिकांना देशांतर्गत तीर्थयात्रा घडवली जाईल. तर उरलेल्या 4000 वरिष्ठ नागरिकांना देशाबाहेरील देवस्थानांची तीर्थयात्रा घडवण्यात येईल. देशाबाहेरील तीर्थयात्रा विमानाद्वारे असेल.
5) तीर्थयात्रेदरम्यान होणारा संपूर्ण खर्च मग तो रेल्वे विमानाचा असो किंवा तीर्थस्थळांना भेट दिल्यावर तेथे राहण्याचा, खाण्याचा, फिरण्याचा असो, तो संपूर्ण खर्च राजस्थान सरकारद्वारेचं केला जाईल. तीर्थयात्रा करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांकडून एकही पैसा घेतला जाणार नाही.
6) राजस्थान सरकारने या Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana मध्ये विविध टूर पॅकेज डिझाईन केलेले आहेत. एकाचं रूटवर असलेल्या तीर्थस्थळांना एकत्र ठेवण्यात आलंय.
7) प्रत्येक जिल्ह्यासाठी तीर्थयात्रींचा एक कोटा ठरवून देण्यात आला आहे. जेव्हा प्रत्येक जिल्ह्यानुसार हा कोटा भरेल, तेव्हा या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलं जाईल आणि मग त्यांना तीर्थयात्रेत कोठे पाठवायचे, हे ठरवलं जाईल.
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेसाठी पात्रता अटी
या योजनेत लाभार्थी होण्यासाठी राजस्थान सरकारने काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत, आपण त्या जाणून घेऊया.
1) अर्ज करणारी व्यक्ती राजस्थान राज्याची मूळ निवासी असावी.
2) अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावं.
3) अर्जदार व्यक्ती आयकर भरत नसावा.
4) वरिष्ठ नागरिक अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेला एक सहाय्यक बरोबर घेऊ शकतात.
5) राज्यातील प्रत्येक वरिष्ठ नागरिकास या Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana लाभ फक्त एकदाचं घेता येईल.
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेअंतर्गत पात्र देवस्थानं
आता आपण पाहूया की, या Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना कोणत्या तीर्थस्थानांची यात्रा घडवली जाईल.
या तीर्थस्थानांना रेल्वे आणि विमानमार्ग अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे. आपण सर्वात आधी रेल्वे मार्गाने घडवल्या जाणाऱ्या तीर्थस्थानांबद्दल जाणून घेऊया.
मथुरा – वृन्दावन – बरसाना
सम्मेदशिखर – पावापुरी – बैद्यनाथ
उज्जेन – ओम्कारेश्वर – त्र्यंबकेश्वर
गंगासागर – कोलकाता
हरिद्वार – ऋषिकेश – अयोध्या
रामेश्वरम – मदुरई
जगन्नाथपुरी – तिरुपति
द्वारकापुरी – सोमनाथ
वैष्णोदेवी – अमृतसर
प्रयागराज – वाराणसी
याव्यतिरिक्त एक तीर्थक्षेत्राला विमानाद्वारेही भेट दिली जाणार आहे.
हेही वाचा : LIC Aadhaar Shila Policy In Marathi | एलआयसी आधार शीला पॉलिसीची माहिती
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना आवश्यक कागदपत्रे
या Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana अर्ज करण्याआधी वरिष्ठ नागरिकांना काही महत्त्वाची कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. ही कागदपत्र कोणती ते पाहूयात.
1) आधार कार्ड
2) राजस्थानचे मूळ निवासी पत्र
3) वयाचा दाखला
4) मेडिकल सर्टिफिकेट
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana अर्ज करण्यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धती ठरवून दिली आहे.
सर्वात आधी राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेत सहभागासाठी राजस्थान सरकारच्या देवस्थान पोर्टलवर लॉग इन करावं लागेल.
लॉगिन केल्यानंतर अर्जदाराला त्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून द्यावी लागेल.
वैयक्तिक माहितीनंतर आवश्यक कागदपत्रे या पोर्टलवर अपलोड करावी लागतील.
आणि मग हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
आता या योजनेमध्ये फक्त 40,000 वरिष्ठ नागरिकांनाचं तीर्थयात्रा घडवली जाणार आहे. मग त्यांची निवड होणार कशी ? तर राजस्थान सरकारने यासाठी लॉटरी पद्धत ठेवली आहे. जमा झालेल्या अर्जांमध्ये 40000 लोकांची नावे लॉटरी पद्धतीने काढली जातील आणि मग या नागरिकांना तीर्थयात्रा घडवली जाईल.
राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना का महत्त्वाची
तुम्ही जर कोणत्याही वरिष्ठ नागरिकाला विचारलं की, आता तुम्हाला काय करायचंय ? तुमचा कोणतं स्वप्न आहे ? तर त्यांचं एकचं उत्तर असेल ते म्हणजे मला तीर्थयात्रा करायचीये. देशभरातील तीर्थस्थानाला भेट द्यायची आहे. देवाला भेट द्यायचीये.
आयुष्यभर आपण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली असतो. लहानपणापासून म्हातारा होईपर्यंत कधी शाळा, कधी कॉलेज, कधी नोकरी, कधी मुलं, बायका, नातवंड यांच्या जबाबदारीतचं आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. अशावेळेस देवाला भेट देण, तीर्थक्षेत्रांची यात्रा करणं, या गोष्टी कुठेतरी मागे राहून जातात.
एकदा का या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं संपलं, मग आपण तीर्थयात्रा करायची. देशभर फिरायचं, असं अनेक वरिष्ठ नागरिक ठरवतात. परंतु यापैकी फक्त काहीचं नागरिकांच्या नशिबात हे असतं.
अनेक वरिष्ठ नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी अनेक कारणे असतात. मग ते प्रकृती अस्वस्थतेचं कारण असो किंवा मग आर्थिक चणचण असो किंवा मग पैसे असताना, प्रकृती ठीक असतानाही, कोणी बरोबर नसणं, या गोष्टींमुळे अनेक वरिष्ठ नागरिक निवृत्तीनंतर तीर्थयात्रा पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही.
आता अशाचं नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी राजस्थान सरकारने, राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जे नागरिक स्वतःहून तीर्थयात्रा करू शकत नाही, त्यांच्यासाठी ही योजना खूपचं उपयुक्त आहे. कारण एक तर ही योजना राज्य सरकारची असल्यामुळे पूर्णपणे मोफत आहे. वरिष्ठ नागरिकांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे जे नागरिक पैसा खर्च करू शकत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे.
याउलट ज्या नागरिकांकडे पैसा आहे. परंतु त्यांना एकट्याने तीर्थयात्रा करायची नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना खूपचं फायदेशीर आहे. कारण ही योजना ग्रुप टूर असेल. अनेक वरीष्ठ नागरिक बरोबर असतील, त्यामुळे अशा नागरिकांसाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे.
जसं श्रावण बाळाने आपल्या आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवली होती. तशाच प्रकारे राजस्थान सरकारने आता राज्यातील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याचा विडा उचलला आहे आणि त्यांना या योजनेत नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ही योजना सफल आहे.
एवढ्या मोठ्या राज्यात फक्त चाळीस हजार लोकांनाचं तीर्थयात्रा घडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. त्यामुळे अनेक नागरिकांचं हे स्वप्न अपूर्ण राहत आहे. परंतु येत्या काही दिवसात बाकीच्या नागरिकांसाठीसुद्धा ही योजना उपलब्ध होईल, यात शंका नाही.
FAQ About Rajasthan Varishth Nagrik Tirthyatra Yojana | वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana कोणासाठी आहे ?
उत्तर : ही योजना राजस्थान सरकारने राज्यातील साठ वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे.
2) प्रश्न : या योजनेअंतर्गत लाभार्थी वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्यासाठी किती खर्च येईल ?
उत्तर : या योजनेतील लाभार्थी वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्यासाठी एक रुपयाचा खर्चही येणार नाही. राजस्थान सरकार या योजनेत संपूर्ण खर्च करणार आहे.
3) प्रश्न : Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana कोणत्या तीर्थस्थळांची यात्रा करण्यात येईल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत देशभरातील विविध तीर्थस्थळांची यात्रा घडवण्यात येईल. त्याचबरोबर पशुपतिनाथ नेपाळ या विदेशातील तीर्थस्थळाची यात्राही करण्यात येईल.
4) प्रश्न : राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेअंतर्गत किती वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्यात येईल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत राजस्थान राज्यातील 40,000 वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्यात येणार आहे.
5) प्रश्न : राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल ?
उत्तर : या योजनेसाठी अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी तीर्थयात्रिंचा कोटा ठरवून दिलेला आहे.
एकूणचं राजस्थान सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी एक खूपचं छान योजना तयार केली आहे. कारण निवृत्तीनंतर तीर्थयात्रा करण्याची प्रत्येक वरिष्ठ नागरिकाची इच्छा असते. परंतु काही अडचणीमुळे त्यांना ती करता येत नाही. अशा वेळेस सरकारने जर त्यांना तीर्थयात्रा घडवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असेल, तर त्यांच्यासाठी अनेक अडचणी सोप्या होतील, यात शंका नाही.
कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रकृती अस्वस्थतेमुळे तीर्थयात्रा करायची राहून गेली आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे.
तुमच्या मनात राजस्थान वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेबद्दल Rajasthan Varishtha Nagrik Tirthyatra Yojana आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !