Shravan Bal Yojana In Marathi
Shravan Bal Yojana In Marathi जसं आपण आपल्या घरातील लहान बाळांची काळजी घेतो, कारण ते आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतात. तशीच घरातील वरिष्ठ नागरिकांचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण वरिष्ठ नागरिक घरातील तरुणांवर, जबाबदार व्यक्तींवर अवलंबून असतात. मग ते आर्थिकदृष्ट्या असो भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या.
आपल्या देशात काही वर्षांपूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकाचं कुटुंबात तीन तीन पिढ्या राहायच्या. परंतु आधुनिकरणामुळे आणि शहरात नोकऱ्यांसाठी स्थलांतरामुळे आता एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंबपद्धती जन्माला आलीये. आई वडील गावी राहतात. तर त्यांची मुलं शहरात राहतात. त्यात शहरातली घरं छोटी असल्यामुळे मुलं आई-वडिलांना तेथे आणत नाही. मुलांनी जरी आणलं तरी आई-वडिलांना आपलं गाव सोडून शहरांमध्ये करमत नाही.
पण एकवेळेस ज्या वरिष्ठ नागरिकांकडे संपत्ती आहे. गावाकडे घर आहे, शेती आहे, रोजगार मिळवण्याचं, पैसे मिळवण्याचं, उदरनिर्वाह करण्याचं साधन आहे किंवा ज्यांना मुलं आहेत, ते त्यांना पैसे पाठवतात. अशा लोकांना भविष्याची काळजी नसते. परंतु त्या लोकांचं काय, त्या वरिष्ठ नागरिकांचं काय, ज्यांना कुणीही नाहीये. जे निराधार आहेत.
वयोमानामुळे त्यांना आता कोणतं कामही करता येत नाही. असं कुणी नाहीये, जे त्यांना सांभाळेल. मग त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार ? ते कसं जगणार ? हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे. वरिष्ठ नागरिकांचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या Shravan Bal Yojana In Marathi योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन मिळणार आहे. मग ही श्रावणबाळ योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा लाभ कोणत्या वरिष्ठ नागरिकांना मिळेल ? या योजनेअंतर्गत किती मासिक पेन्शन देण्यात येईल ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? Shravan Bal Yojana In Marathi या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
श्रावणबाळ योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट
महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये श्रावणबाळ योजनेला सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना सरकार दरमहा पंधराशे रुपये पेन्शन देतं. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट वरिष्ठ नागरिकांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागू नये असा आहे.
वयाबरोबर वरिष्ठ नागरिकांना आजारपण, अपंगत्व यांवरील उपचारासाठी खर्च होतो. त्यामुळे त्यांना पैशांची गरज असते. तेव्हा हे पैसे त्यांना कोणाकडून मागावे लागू नये, सरकार म्हणून आपण या वरिष्ठ नागरिकांची जबाबदारी घ्यावी, या उद्देशानेचं महाराष्ट्र सरकारने श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana In Marathi) सुरू केली आहे.
श्रावण बाळ योजनेच्या पात्रता आणि अटी
या Shravan Bal Yojana In Marathi योजनेअंतर्गत लाभार्थी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत. आपण त्या पाहुयात.
1) अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं.
2) अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असायला हवा.
3) अर्जदार व्यक्तीचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त असायला नको.
4) अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असायला नको.
5) अर्जदार व्यक्तीला केंद्रशासन किंवा महाराष्ट्र शासनाची इतर कोणतीही पेन्शन मिळत असायला नको.
श्रावणबाळ योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
या Shravan Bal Yojana In Marathi योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
1) अर्जदार व्यक्तीचं आधार कार्ड
2) अर्जदार व्यक्तीचा वयाचा दाखला
3) अर्जदार व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला
4) अर्जदार व्यक्तीचा रहिवासी दाखला
5) अर्जदार व्यक्तीचं बँक अकाउंट पासबुक
6) अर्जदार व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो
7) अर्जदार व्यक्तीचा मोबाईल नंबर
https://faktyojana.com/web-stories/how-to-apply-for-maharashtra-governments-lek-ladki-yojana/
श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या Shravan Bal Yojana In Marathi योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतही वापरू शकता.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या ग्रामपंचायत, तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल. येथे तुम्हाला श्रावण बाळ योजनेचा अर्ज मिळेल. हा अर्ज संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला या कार्यालयात जमा करायचा आहे. या अर्जाची छाननी झाल्यानंतर श्रावणबाळ योजनेसाठी अर्जदार लाभार्थी होईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर लॉगिन करावं लागेल. येथे श्रावणबाळ योजना या योजनेचा पर्याय सिलेक्ट करून अर्ज भरावा लागतो आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्जदार या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो.
श्रावण बाळ योजनेची वैशिष्ट्ये
1) या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जाते.
2) लाभार्थी होण्यासाठी वरिष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीतला असायला हवा
3) श्रावण बाळ योजनेत लाभार्थी असलेल्या व्यक्तीच्या अकाउंटवर दरमहा 1500 रुपये डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जातात.
4) Shravan Bal Yojana In Marathi योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वरिष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवते आणि त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही.
श्रावणबाळ योजनेचं सामाजिक महत्त्व
आपण घरातील लहान बाळांची काळजी घेतो, तशीच घरातील वरिष्ठ नागरिक हे सुद्धा मानसिकदृष्ट्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर अवलंबून असतात. जर त्यांना कुटुंबात प्रेम मिळाला, आदर मिळाला, तर त्यांचं उरलेलं आयुष्य खूप आनंदात, समाधानात, सुखात जातं. परंतु त्याचवेळेस जर त्यांना आर्थिक चणचण भासत असेल, पैशांची कमी भासत असेल, तर मात्र त्यांना या वरिष्ठ वयातसुद्धा डिप्रेशन येणं, मानसिक ताणतणाव येणं अशा समस्यांना सामोरे जावं लागतं.
वरिष्ठ नागरिकांच्याही अनेक गरजा असतात. ज्या पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशांची आवश्यकता असते. परंतु त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, तर त्यांना उदरनिर्वाह करणं खूप जिकिरीचं जातं.
आपल्या समाजातील ही एक खूप मोठी समस्या आहे. कारण वरिष्ठ नागरिक वयोमानानुसार कोणतेही काम करू शकत नाही, नोकरी करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना या वयात अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
या समस्या लक्षात घेऊनचं महाराष्ट्र सरकारने श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana In Marathi) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावणबाळ योजना राज्यातील वरिष्ठ नागरिकांना दरमहा मासिक पेन्शन देतं. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा भागू शकतात. त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही आणि ते आर्थिक स्वावलंबी बनतील.
FAQ’s About Shravan Bal Yojana श्रावण बाळ योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Shravan Bal Yojana In Marathi कधी सुरू झाली ?
उत्तर : महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये श्रावणबाळ योजनेला सुरुवात केली होती.
2) प्रश्न : श्रावणबाळ योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
उत्तर : महाराष्ट्र राज्यातील 65 वय वर्षावरील वरिष्ठ नागरिक ज्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते.
3) प्रश्न : श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
उत्तर : या योजनेसाठी पात्र वरिष्ठ नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्विसेस सेंटरला भेट देऊ शकता किंवा ऑफलाइन पद्धतीसाठी तुमच्या जवळील ग्रामपंचायत, तलाठी किंवा तहसील कार्यालयात फॉर्म भरून देऊ शकतात.
4) प्रश्न : Shravan Bal Yojana In Marathi लाभार्थी होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाची अट आहे का ?
उत्तर : होय, या योजनेत पात्र होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाची अट आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील वरिष्ठ नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
5) प्रश्न : कुटुंबात सरकारी नोकरी असेल, तर श्रावणबाळ योजनेत अर्ज करता येतो का ?
उत्तर : नाही, ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीस सरकारी नोकरी आहे. त्या कुटुंबातील वरिष्ठ नागरिकाला श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करता येत नाही, तो या योजनेसाठी पात्र नसेल.
सर्वांना श्रावण बाळाची कथा माहित आहे. श्रावण बाळाने आपल्या खांद्यावर अंध आई-वडिलांना घेऊन तीर्थयात्रा केली होती. त्यामुळे आपल्या समाजात मुलगा असावा, तर श्रावण बाळासारखा असं म्हटलं जातं. त्याचं आई-वडिलांवर किती प्रेम होतं. त्याने आई-वडिलांची किती सेवा केली. असं म्हटलं जातं आणि म्हणूनच चांगल्या मुलांना श्रावणबाळ असंही संबोधलं जातं.
म्हणूनचं महाराष्ट्र सरकारने राज्यातील वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेचे नाव श्रावणबाळ योजना असं ठेवलं आहे. राज्य सरकार श्रावण बाळाप्रमाणे आपल्या राज्यातील वरिष्ठ नागरिकांची सेवा करणार आहे. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणार आहे. दरमहा मिळालेल्या पंधराशे रुपये पेन्शनमधून या वरिष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत होईल, या तीळमात्रही शंका नाही.
देशातील विविध राज्यातसुद्धा महाराष्ट्र सरकारच्या श्रावणबाळ योजने सारख्याच योजना सुरू करायला हव्यात. कारण वरिष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागतं आणि जर सरकारचं श्रावणबाळ बनून त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवत असेल, तर त्यांना खूप फायदा होईल यात शंका नाही.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा अनेक योजना राबवतं, जिथे असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन दिली जाते. परंतु त्यासाठी आधी गुंतवणूक करावी लागते. तरुण वयातचं या योजनेत गुंतवणूक सुरू करावी लागते. परंतु जे लोक आता वरिष्ठ झाले आहेत. त्यांच्या काळात अशा योजना नव्हत्या. त्यांच्यासाठी सरकारने सुरू केलेली श्रावणबाळ योजना खूपचं कौतुकास्पद आहे, यात शंका नाही.
तुमच्याही मनात श्रावणबाळ योजनेबद्दल Shravan Bal Yojana In Marathi आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !