Honda Activa E एक्टिवा, एक्टिवा, एक्टिवा स्कूटर म्हणजे एक्टिवा. होंडा एक्टिवा या स्कूटरची ही जाहिरात तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल आणि या जाहिरातीमध्ये म्हटल्याप्रमाणेच स्कूटर घ्यायची म्हटल्यावर सर्वात आधी एक्टिवा हेच नाव समोर येतं.
होंडा एक्टिवा या स्कूटरने ग्राहकांच्या मनात आपल्या बद्दल हे विशेष प्रेम निर्माण केलं आहे आणि आता हीच एक्टिवा एका नव्या रूपात, एका नव्या ढंगात सर्वांसमोर आलीये. होंडा कंपनीने आता इलेक्ट्रिक ऍक्टिवा (होंडा एक्टिवा E) मार्केटमध्ये लॉन्च केलीये.
बदलत्या काळानुसार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक एनर्जीवर चालणाऱ्या वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढतोय आणि हा कल लक्षात घेऊनच होंडाने आपल्या एक्टिवा स्कुटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये आणलंय. मग काय खास आहे या इलेक्ट्रिक ऍक्टिवामध्ये आज आपण तेच जाणून घेऊया.
Honda Activa E Specifications
इलेक्ट्रिक ऍक्टिवा E मध्ये 1.5 KW कॅपिसीटीच्या दोन बॅटरीज आहेत. म्हणजेच टोटल 3 किलो वॅटच्या कॅपॅसिटीमुळे होंडा एक्टिवा चक्क 102 किलोमीटरची रेंज देते. त्याचबरोबर हे बॅटरी पॅक रिमूव्हेबल आहेत. परंतु ते तुम्ही घरी नाही चार्ज करू शकत, तर त्यासाठी तुम्हाला होंडाच्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर जावं लागेल.
पुढील काही दिवसांमध्ये होंडा कंपनी देशातील विविध महानगरांमध्ये आपलं बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उघडणार आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात कुठेही बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही किंवा बॅटरी संपेल काय अशी भीतीही राहणार नाही.
Honda Activa E Price
त्याचबरोबर या गाडीमध्ये जीपीएस नेवीगेशन, टच स्क्रीन पॅनल, यूएसबी पोर्ट असे अनेक नवीन नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. आता तरी या एक्टिवा ई ची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. 1 जानेवारी 2025 रोजी अॅक्टिवा E ची किंमत जाहीर करण्यात येईल. परंतु किंमत ही जवळपास एक लाख दहा हजार पेक्षा जास्त असेल असं सांगितलं जातंय.
एक्टिवा E ला टक्कर देण्यासाठी ओला, एथर यांसारख्या गाड्या आधीच मार्केटमध्ये आहेत। मग ऍक्टिवा पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करू शकेल का ? हे तर येणारा काळच ठरवेल. मग तुम्ही घेणार का ऍक्टिव्ह E ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !