नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 पार पडली. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा असते, ती म्हणजे जिंकलेल्या उमेदवारांचे मताधिक्य किती आहे. आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवारांबद्दलच चर्चा करणार आहोत. तर हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 मताधिक्य घेऊन विजयी झालेले उमेदवार.
सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले टॉप 5 आमदार
1) सातारा विधानसभेतील भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेले उमेदवार आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 142124 ( 1 लाख 42 हजार 124) जास्त मते मिळाली आहेत.
2) परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 141241 ( 1 लाख 41 हजार 241) मते जास्त मिळाली आहेत.
3) बागलान विधानसभेतील भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 129287 ( एक लाख 29 हजार 287 ) मते अधिक मिळाली आहेत.
4) कोपरी पाचपाखडी या विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 120335 (1 लाख 20 हजार 335) मते अधिक मिळाली आहेत.
5) कोथरूड विधानसभेतील भाजपचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 112041 (1 लाख 12 हजार 41) मते अधिक मिळाली आहेत.
तर हे आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळालेले टॉप फाईव्ह आमदार. तर तुमच्या मतदारसंघातील आमदाराला किती मताधिक्य मिळालंय ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !