Aai Kuthe Kay Karte Update. आई कुठे काय करते या मालिकेने मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. परंतु काही महिन्यांपूर्वी ही मालिका संध्याकाळी नाही दुपारी शिफ्ट करण्यात आली. त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेचं आता मालिकेत नवीन नवीन ट्विस्ट आणले जाताय आणि मालिकेकडे पुन्हा एकदा प्रेक्षकांना वळवण्याचा प्रयत्न केला जातोय.
त्यामुळेचं आता आई कुठे काय करते मालिकेत एक खूपचं भारी ट्विस्ट येणार आहे. जेथे आपण महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा पाहणार आहोत. या स्पर्धेत अनिरुद्ध आणि संजना हे दोघे भाग घेणार आहेत. तर त्यांच्याविरुद्ध उभे ठाकतील अरुंधती आणि मालिकेत नव्याने आलेला मिहीर शर्मा.
Aai Kuthe Kay Karte Update
आपल्या सर्वांना माहिती आहे की, अरुंधती आणि मिहिर शर्मा हे दोघे किती चांगला स्वयंपाक बनवतात, परंतु त्यांच्यासमोर संजना आणि अनिरुद्धची दाळ गळणार नाही, हेही आपल्याला माहितीये. पण हे दोघे अरुंधती आणि मिहिरीला हरवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे सगळे हातखंडे वापरतील हे मात्र नक्की.
अनिरुद्ध आणि संजनाने समृद्धी बंगल्यावर आपला हक्क सांगितलाय आणि अरुंधतीने त्यांना चॅलेंज दिलंय की, त्यांना पैसे देऊन हे घर परत घेणार. परंतु पैसे कमवायचे कुठून ? हा प्रश्न तिला पडला होता. त्यातचं महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेबद्दल तिला समजलं. ही स्पर्धा आपण जिंकू शकतो आणि समृद्धी बंगला अनिरुद्धच्या तावडीतून सोडवु शकतो, हे अरुंधतीला समजलं. पण अरुंधती ही स्पर्धा सहज जिंकेल. बंगला आपल्या हातातून जाईल, या भीतीने संजना आणि अनिरुद्धने या स्पर्धेत भाग घेतला आहे.
अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार ?
मग आता या महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेमध्ये चांगलीच मजा येईल, एवढं मात्र नक्की. कारण अरुंधती आणि मिहीर यांचा हात स्वयंपाकात संजना आणि अनिरुद्ध धरू शकणार नाही. पण अरुंधती आणि मिहीरने बनवलेले पदार्थ कसे बिघडवायचे आणि त्यांना स्पर्धेत हरवायचं याचा प्रयत्न संजना आणि अनिरुद्ध करतील आणि हे करताना त्यांची चांगलीच फजिती होईल, ते पाहायलाही मजा येईल.
तर तुम्ही सुद्धा एक्साईटेड आहात का, आई कुठे काय करते मालिकेतील ही नवीन स्पर्धा पाहण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !