अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार ? सचिन पिळगावकरांनी केला मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट. मराठीतील सर्वांचा आवडता चित्रपट म्हटलं की अशी ही बनवाबनवी हे नाव हमखास समोर येतं. अशी अशी बनवाबनवी चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास 35 वर्षांचा काळ उलटलाय. तरीही हा चित्रपट एकदा टीव्हीवर लागला की, सगळेजण काम सोडून चित्रपट पाहू लागतात.

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे, सुधीर जोशी, आशा काळे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, विजू खोटे, यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा फेवरेट आहे.

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार
अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार

सध्या जुन्या चित्रपटाचे दुसरे भाग आणण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यातच सचिन पिळगावकर यांचा गाजलेला चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 येतोय. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. डबिंग सुरू आहे आणि येत्या काही दिवसात चित्रपट रिलीज होईल, असं सांगितलं जातंय.

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार
अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार

या निमित्तानेच चित्रपटाचे अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी एक मुलाखत दिली. तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला की, जसा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट येतोय. तसाच अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट सुद्धा येईल का ? तुम्ही या चित्रपटाच्या दुसरा भाग आणण्याचा विचार करताय का ?

तेव्हा सचिन पिळगावकर यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटलं. तर अनेकांच्या डोळ्यातही पाणी आलं. सचिन पिळगावकर म्हणाले की, अशी ही बनवाबनवी चित्रपटाचा दुसरा भाग कधीही येऊ शकत नाही. कारण लक्ष्मीकांत बेर्डे आता या जगात नाहीत.

तू भेटशी नव्याने मालिकेतील कलाकार

लक्ष्याशिवाय हा चित्रपट पुन्हा होऊ शकत नाही. तसेच चित्रपटाचे अनेक कलाकार सुद्धा आपल्याला सोडून गेले आहेत. चित्रपट मी नाही बनवला, या सगळ्यांनी एकत्र येऊन तो बनवला होता. त्यामुळे सगळे नाही तर हा चित्रपटाचा दुसरा भागही नाही.

अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार
अशी ही बनवाबनवी 2 चित्रपट येणार

सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांचं हे उत्तर चांगलंच व्हायरल झालंय आणि सगळेच अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या आठवणींमध्ये रमून गेले आहेत. सर्वांचा आवडता लक्ष्या आपल्याला 2006 मध्ये सोडून गेला. परंतु त्याचा अभिनय अनंत काळापर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहील, आठवणीत राहील एवढं मात्र नक्की.

तर तुम्हाला वाटतं का अशी ही बनवाबनवी चित्रपटाचा दुसरा भाग यायला हवा ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top