Krrish Movie Child Actor मालिका असो किंवा चित्रपट अनेक बालकलाकार महत्वाच्या भूमिका साकारत असतात. मुख्य हिरोच्या लहानपणाची भूमिका ते साकारतात आणि लोकांच्या लक्षात राहून जातात. असाच एक बालकलाकार आहे मिकी धानीजानी.
Krrish Movie Child Actor
आपल्या देशाचा पहिला सुपरहिरो म्हणून क्रिशला आपण सगळेचं ओळखतो. येत्या काही वर्षात क्रिश 4 सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु 2006 मध्ये रिलीज झालेला ऋतिक रोशनचा पहिला क्रिश चित्रपट आजही प्रेक्षकांचा फेवरेट आहे.
मग तुम्हाला आठवतं का या चित्रपटात ऋतिक रोशनच्या लहानपणीची म्हणजेचं क्रिशच्या लहानपणीची भूमिका साकारली होती एका बालकलाकाराने आणि या बालकलाकाराचे नाव होतं मिकी धानीजानी. तेव्हा तो सर्वांचा फेवरेट बनला होता. परंतु क्रिश चित्रपटानंतर तो कोठेही दिसला नाही आणि आता हा चित्रपट येऊन 18 वर्षे झाली आहेत.
मिकी धानीजानी आता मोठा झालाय. मग तो आता नेमका कोठे आहे ? तो अभिनय क्षेत्रात काम करतो की त्याने दुसरं क्षेत्र निवडलंय ? याबद्दल तुमच्याही मनात नक्कीचं उत्सुकता असेल, तर चला आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.
मिकी धानीजानी हा सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव आहे आणि नुकतीच त्याने instagram वर एक रील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास मांडला आहे. यात क्रिश चित्रपटादरम्यान प्रियंका चोप्रा, रितिक रोशन, रेखा आणि राकेश रोशन यांच्याबरोबर असलेले फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्याचबरोबर सध्या तो काय करतो, हेही सांगितलंय त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच खुश झालेत.
मीकीने सांगितलं की, तो आता अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही, तर तो डोळ्यांचा डॉक्टर बनला आहे आणि लोकांच्या डोळ्याचे उपचार करतोय. आयुष्याच्या या नव्या वळणावर फॅन्सनी त्याला सपोर्ट करावा, अशी त्याची इच्छा आहे.
मिकीच्या या व्हिडिओवर त्याच्या फॅन्सने लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तू खूप चांगलं काम केलंय, तुझ्या शक्तीचा चांगला वापर केलाय, अशाही कमेंट प्रेक्षकांनी केल्यात आणि त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर तुम्हाला आठवतो का तो छोटासा क्रिश ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !