Tu Bhetshi Navyane Update सोमवार 8 जुलैपासून रात्री 9 वाजता सोनी मराठीवर सुबोध भावेची नवीन मालिका तू भेटशी नव्याने सुरू होणार आहे. या मालिकेचे प्रोमो सगळीकडेचं व्हायरल झालेत. मालिकेचं प्रमोशन सुद्धा जोरात सुरू आहे. ही जगभरातील अशी पहिलीचं मालिका असणार आहे, जेथे AI च्या मदतीने एखाद्या कॅरेक्टरला तरुण दाखवलं जाईल. सुबोध भावे हा तरुणपणीची आणि सध्याच्या वयातील अशी दुहेरी भूमिका साकारतोय.
Tu Bhetshi Navyane Update
चाळीशीत असलेला कॉलेजमधील प्रोफेसर अभिमन्यू आणि याच कॉलेजमध्ये शिकणारा 20 वर्षांचा अभिमन्यू या दोन्ही भूमिका तो साकारेल. तर त्याच्या प्रेमात पडणारी त्याचीच विद्यार्थ्यांनी म्हणून शिवानी सोनार गौरीची भूमिका साकारणार आहे. या दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
जगायला श्वासाची गरज नाही, तर प्रेमाची गरज असते. ही टॅगलाईन घेऊन मालिका प्रेक्षकांच्या मनात आतापासूनचं घर करतेय.
आणि आता प्रेक्षकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांची फेवरेट बनलेली अभिनेत्री प्रिया मराठे तू भेटशी नव्याने मालिकेत मुख्य खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
अभिमन्यूच्या कॉलेजमध्ये असलेल्या प्राध्यापिका रागिनी अग्निहोत्रीची भूमिका ती साकारेल. रागिनी अभिमन्यूवर जीवापाड प्रेम करते. परंतु अभिमन्यूने ठरवलंय की, आता कोणावरही प्रेम करायचं नाही. परंतु त्यातचं गौरीची एन्ट्री होते आणि मग रागिनी खलनायिकेच्या भूमिकेत येईल.
मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच एक्साईटेड करतेय. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रिया मराठेने एक्झिट घेतल्यानंतर सगळेचं तिला मिस करत होते. तू पडद्यावर पुन्हा कधी दिसशील, याबद्दल चौकशी करत होते आणि आता लवकरचं ती कमबॅक करतेय म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झालाय.
प्रियाने आपल्या भूमिकेबद्दल सांगितलं की, जेव्हा माझ्या भूमिकेला कथेमध्ये जास्त महत्त्व असतं, तेव्हा मला आनंद होतो आणि तू भेटशी नव्याने मालिकेतील माझं कॅरेक्टर खूपच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ही भूमिका करायला मला खूप मजा येईल.
तू भेटशी नव्याने मालिकेतील कलाकार
मग आता सुबोध भावे, शिवानी सोनार आणि प्रिया मराठे यांची तिकडी काय कमाल करते, ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते की नाही, हे तर येणाऱ्या दिवसात कळेलचं परंतु तोपर्यंत मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !