पावसाळ्यात लाईट गेल्यावर वापरा हा स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब

स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब

स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब. पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाल्यावर एक गोष्ट जी कोणालाचं आवडत नाही आणि ती म्हणजे वेळी अवेळी लाईट जाणं. पावसाचा एक थेंब जरी पडला, तरी सुद्धा वीज गायब होते आणि मग काय करायचं हा प्रश्न डोळ्यांसमोर येतो.

या वीज जाण्याच्या प्रॉब्लेमवर अनेकांनी इन्व्हर्टरचा ऑप्शन शोधलाय. परंतु इन्वर्टर घेणं हे खूप महाग असतं किंवा मग कधी कधी पंधरा मिनिटं किंवा तासाभरासाठी वीज जाते त्यासाठी इन्व्हर्टर घेणं परवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक असा पर्याय घेऊन आलो आहोत, तो तुम्हाला स्वस्तही पडेल आणि या वीज जाण्याच्या प्रॉब्लेमपासून तुमचा बचाव सुद्धा होईल.

स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब
स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब

स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब

मार्केटमध्ये आता इन्व्हर्टर बल्ब आले आहेत. इन्व्हर्टेर बल्ब हे साध्या बल्ब सारखेचं असतात. ते जोपर्यंत विजेवर चालतात तोपर्यंत त्यामधील बॅटरी चार्ज होत असते आणि एकदा का लाईट गेली, की ते आपोआप पेटतात आणि मग पुढे चार ते पाच तास ते तुम्हाला बॅकअप देतात. त्यांना वेगळे चार्ज करण्याची गरज नाहीये.

तुम्ही अनेक ठिकाणी असे बल्ब पाहिलेही असतील. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की, हा बल्ब कुठून विकत घ्यायचा आणि त्याची किंमत असते तरी नेमकी किती ? तर आज आम्ही तुम्हाला तेही सांगतो. हा इन्व्हर्टर बल्ब तुम्ही ऑनलाईन ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतात.

स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब
स्वस्तात मस्त इन्व्हर्टर बल्ब

अनेक प्रसिद्ध ब्रँड क्रॉम्प्टन, ॲमेझॉन बेसिक, एव्हरेडी, बजाज, ओरिएंट आणि फिलिप्स इन्वर्टर बल्ब विकतात. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या साइटवर तुम्हाला असे अनेक ऑप्शन दिसून जातील.

एलन मस्कचा वार्षिक पगार माहितेय का ?

या बल्बची किंमत जास्त नाहीये. 250 ते 300 रुपयांमध्ये तुम्हाला हे बल्ब मिळून जातील. त्यात 10 W, 15 W असे विविध ऑपशन सुद्धा आहेत. ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. परंतु हा पर्याय पावसात वेळी अवेळी जाणाऱ्या विजेपासून तुमचा बचाव नक्कीचं करू शकतो, यात शंका नाही.

तर तुम्ही असा इन्व्हर्टर बल्ब वापरता का किंवा या पावसाळ्यात तुम्ही असा बल्ब खरेदी कराल का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top