सुर्यवंशम चित्रपटातील बालकलाकार. अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट पाहिला नसेल, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. सोनी मॅक्स या चॅनलवर तर नेहमीचं सूर्यवंशम हा चित्रपट लागलेला असायचा. यावर अनेक मीन्स सुद्धा चांगलेचं व्हायरल झाले होते.
सुर्यवंशम चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोलं साकारला होता. तर त्यांच्या नातवाची भूमिका साकारली होती आनंदवर्धन या बालकलाकाराने. आता या चित्रपटाला येऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. मग हा बालकलाकार आनंदवर्धन नेमका होता तरी कोण आणि सध्या तो काय करतोय ? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना आणि आता आनंदवर्धनबद्दल एक खूप मोठी बातमी समोर येतेय.
सुर्यवंशम चित्रपटातील बालकलाकार
आनंदवर्धन हा आता मोठा झाला असून लवकरचं एका तेलगू सिनेमातून तो पदार्पण करणार आहे. मुख्य भूमिकेत तो दिसणार आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची तर सगळे वाट पाहत आहेत. परंतु जेव्हा सूर्यवंशम चित्रपट आला होता, तेव्हा आनंदवर्धन हा अवघ्या नऊ वर्षांचा होता.
आनंदवर्धनचे आजोबा हे साउथ इंडियन चित्रपटांमधील एक प्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्या घरी नेहमी चित्रपटाच्या निर्माते यांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे आनंदवर्धनला वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून भूमिका मिळाली होती.
बालकलाकार म्हणून त्याने तब्बल 25 चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु सूर्यवंशम चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजलेली. त्यानंतर मात्र आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला आणि कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रामध्ये बी टेक पदवी मिळवली.
तारक मेहता मालिकेतील गोलीने मालिका सोडली ?
काही वर्ष नोकरी केल्यानंतर आता मात्र तो पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळला आहे आणि लवकरचं एका तेलगू चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने त्याचे सोशल मीडियावरील फोटो चांगलेच व्हायरल झालेत.
25 वर्षांमध्ये आनंद वर्धन मध्ये चांगलाच बदल घडून आलाय आणि तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. तो सोशल मीडियावर आपले नवीन नवीन फोटोज पोस्ट करत असतो. आता तो चांगलाच हँडसम दिसतोय. परंतु लोकांना अजूनही त्याची सूर्यवंशम चित्रपटातील भूमिका आठवते.
तर तुम्हाला आठवतोय का सूर्यवंशम चित्रपटातील हिरा ठाकूर म्हणजेचं आनंदवर्धन ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !