Premachi Goshta Serial Today प्रेमाची गोष्ट ही मालिका आजकाल प्रेक्षकांना खूप आवडतेय आणि त्यातचं आता सागर आणि मुक्ता या दोघांच्या लव स्टोरीचा ट्रॅक सुरू झाला आहे. त्यामुळे तर टीआरपीमध्ये मोठी वाढ होतेय. या मालिकेचा नुकताचं प्रसारित झालेला एपिसोड तर खूपचं भारी होता.
जेथे सागरने विचार केला की, माझ्या आयुष्यात लग्नानंतर होणाऱ्या नाजूक गोष्टी घडून गेल्यात. परंतु मुक्ताच्या आयुष्यात असं काहीचं घडलेलं नाहीये. त्यामुळे मुक्ता आता त्या गोष्टीबद्दल विचार करत असेल का ?
Premachi Goshta Serial Today
हा विचार करून सागर घरी येतो आणि रूममध्ये येऊन पाहतो, तर त्याच्या बेडवर कोणीतरी पांघरून घेऊन झोपलेलं असतं. सागरला वाटतं ही मुक्ताचं आहे आणि तो मुक्ता समजून आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगून टाकतो की, आपण आता पुढे जायला हवं. तो मुक्ता समजून त्या व्यक्तीच्या अंगावरील पांघरून काढतो, तर ती मुक्ता नसून चक्क लकी असतो. लकी त्याच्यावर खूप चिडतो. तेवढ्यात मुक्ता येते.
लकी या दोघांच्या अंगावर बेडशीट टाकून तेथून निघून जातो. सागर मुक्ताच्या जवळ येऊ लागतो. तर मुक्ता त्याला दूर लोटते. सागर आणि मुक्ता या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं की, मी आजची स्त्री आहे, मी स्वावलंबी आहे, मी काहीही करू शकते. सागर म्हणतो, तुम्ही मला चॅलेंज देताय का ? ठीक आहे, मग मी जे करेल ते तुम्ही करून दाखवा. असं म्हणून सागर चक्क मुक्ताच्या गालावर किस करतो.
यामुळे मुक्ताला जबर धक्काचं बसतो. मुक्ता खूप लाजते, खूप खुश होते. सागर म्हणतो, आता मी जे केलंय, ते तुम्ही करून दाखवा. त्याच भावनेने आणि तो तिथून निघून जातो. मुक्ताला काय करावे, काय बोलावं, हे समजतचं नाही.
थोडं तुझं थोडं माझं मालिका अपडेट
नंतर मुक्ता किचनमध्ये काम करत असते. तर सागर तिला चिडवत असतो की, मी जे केले ते तुम्ही करू शकता का ? तुम्ही तर स्वावलंबी, इंडिपेंडेंट आहात ना.
पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की, मुक्ता चक्क इंद्रा, स्वाती, कोमल आणि सई या सगळ्यांसमोर सागरच्या गालावर किस करणार, त्यामुळे सागरलाही मोठा धक्का बसेल.
एकूणचं ही मालिका दिवसेंदिवस खूपचं इंटरेस्टिंग होत चालली आहे. तर तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट बघायला आवडेल ना ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !