पडद्यावर बिकिनी घालायला हिम्मत लागते. मराठीतील गोड आणि गोंडस अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली पर्ण पेठे आपल्या सर्वांची आवडती आहे. 2009 मध्ये तिने विहीर या चित्रपटातुन अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर रमा माधव, वाय झेड यासारख्या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
सध्या ती तिच्या आगामी विषय हार्ड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचं तिने एका यूट्यूब चैनलला मुलाखत देत आपल्या मनातील अनेक गोष्टी सांगितल्या. या दरम्यान तिला विचारलं गेलं की, तुला आता कोणत्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत ?
पडद्यावर बिकिनी घालायला हिम्मत लागते
या प्रश्नाचे उत्तर देताना पर्ण पेठेने सांगितलं की, गोड गोंडस अभिनेत्री म्हणून मला एक टॅग लागलाय, त्याचा मला कंटाळा आलाय. म्हणून मी स्वतःची इमेज बदलण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी एका नाटकात मी वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली होती. तसंच मला आता एखादी ग्लॅमरस भूमिका करावी असं वाटतंय.
परंतु त्यासाठी कोणीतरी मला तशी भूमिका ऑफर करायला हवी. आजकाल चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये अनेक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिका साकारतात. ऑन स्क्रीन बिकिनीही घालतात. अशा अभिनेत्रींना खूप ट्रोल केलं जातं. परंतु स्क्रीनवर ग्लॅमरस दिसण, सेक्सी दिसण हे काही सोपं काम नाहीये.
या भूमिका करताना स्वतःची बॉडी फिट ठेवावी लागते. त्याचबरोबर स्वतःवर कोणताही संशय घ्यावा लागत नाही. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल तेव्हा तुम्हाला अशा भूमिका करणं जमतं. हे काही सोपं काम नाहीये. मलाही अशी एखादी भूमिका भेटली, तर मी नक्कीचं करेल, असंही पर्ण पेठे म्हणाली.
नुकतचं तिने हिरामण्डी ही वेब सिरीजही पाहिली. यामध्ये आदिती राव हेंद्रीचं काम तिला खूप आवडलं. तिने ज्याप्रकारे ही भूमिका साकारली तिचं पर्ण पेठेने कौतुक केलं.
तिच्या आगामी विषय हार्ड या चित्रपटामध्ये सुमित पाटील, भूमी पाटील आणि चैताली इनाममदार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि आता तिचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
तर तुम्हाला पर्ण पेठेचा कोणता चित्रपट आवडतो ? नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !