Tharala Tar Mag Update चैतन्यच्या एका चुकीने साक्षी बसली अर्जुन सायलीच्या डोक्यावर

Tharala Tar Mag Update

Tharala Tar Mag Update ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची खूप फेवरेट आहे. मागील अनेक महिन्यांपासून या मालिकेने नंबर वनची पोझिशन सोडलेली नाहीये आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मालिकेत एकानंतर एक येणारे जबरदस्त ट्विस्ट आणि आता असाचं एक जबरदस्त ट्विस्ट मालिकेत आलाय.

आपल्याला असं वाटत होतं की, आता महिपत सारखीचं साक्षीसुद्धा जेलमध्ये जाणार. अर्जुन आणि चैतन्यची जोडी तिला फसवणार. परंतु घडलं उलटच. साक्षीनेचं या दोघांची फसवणूक केली आहे. नुकत्याचं झालेल्या एपिसोडमध्ये आपल्याला कळलं की, साक्षीने चक्क अर्जुन आणि चैतन्य या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Tharala Tar Mag Update
Tharala Tar Mag Update

Tharala Tar Mag Update

त्यानंतर ती महिपतला भेटायला गेली. महिपतला जेलमध्ये भेटल्यानंतर तिने आपण हा प्लॅन कसा तयार केला, याबद्दल सांगितलं. चैतन्यच्या गाफीलपणामुळे तिला चैतन्य हा पंकज नाही, तर अर्जुनशी बोलतोय. हे दोघे एकत्र आलेत, ही गोष्ट समजली. चैतन्यचं सत्य समजल्यानंतरचं मग तिने हा सगळा प्लॅन बनवला की, चैतन्य आणि अर्जुनला कसं फसवायचं.

सगळ्या मीडियासमोर तिने खोटे आरोप लावले की, चैतन्यने माझ्याशी लग्न करण्याचं मला खोटं वचन दिलं आणि त्यानंतरचं त्याने माझा फायदा उचलला. हा अर्जुन आणि चैतन्य या दोघांचा प्लॅन होता.

त्यानंतर महिपतने साक्षीला आणखीन एक जबरदस्त आयडिया सुचवली की, चैतन्य आणि अर्जुन या दोघांना जेलमध्ये पाठवण्यापेक्षा त्यांची जास्तीत जास्त बदनामी कर. त्याचा फायदा तुला होईल आणि तिने असंच केलं.

Tharala Tar Mag Update
Tharala Tar Mag Update

साक्षीने आपले काही गुंड समाजसेवक म्हणून अर्जुनच्या ऑफिसमध्ये पाठवले. त्यांनी तेथे अर्जुनला धमक्या दिल्या. चैतन्यला धमक्या दिल्या आणि त्यानंतर चक्क अर्जुनच्या ऑफिसमध्ये तोडफोडसुद्धा केली. म्हणजे एकीकडे अर्जुनची आणि चैतन्यची मीडियामध्ये बदनामी होत आहे. तर त्याचबरोबर त्यांना मनस्ताप देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्येही तोडफोड झालीये.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा एक उपाय करा

साक्षी आणि महिपतने मिळून जबरदस्त प्लॅन बनवला आहे. परंतु आता या प्लॅनचा तोड सायली काढणार आहे. कारण अर्जुन आणि चैतन्यकडे असलेल्या सगळ्या केसेस त्यांच्या क्लाईटने काढून घेतल्यात. परंतु साक्षीची केस मात्र अर्जुनकडेच राहील आणि अर्जुन या केसमध्ये साक्षीला खुनी ठरवल्यानंतर साक्षी खोटारडी आहे, हे तर आपोआपचं सिद्ध होईल.

मग आता पुढे या मालिकेत काय होईल ? हे पाहणं तर खूपचं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही सुद्धा ठरलं तर मग मालिका पाहण्यासाठी एक्साईटेड आहात ना ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top