शेअर मार्केटमध्ये आणणार 25000 कोटींचा आयपीओ. अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. परंतु शेअर मार्केटमध्ये कमवण्याची सर्वात जास्त संधी असते, जेव्हा एखाद्या कंपनीचा ipo बाजारामध्ये येतो. तुम्हाला जर हा आयपीओ मिळाला, तर कंपनीची शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर शेअरची किंमत खूप वाढते आणि बक्कळ पैसा कमवता येतो.
त्यामुळेचं अनेक इन्वेस्टर शेअर मार्केटमध्ये नवीन कोणता आयपीओ येणार आहे, याकडे डोळे लावून असतात आणि आता अशा इन्व्हेस्टरसाठी खूप आनंदाची बातमी आहे. भारतातील दोन नंबरची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई मोटर्स लवकरचं भारतीय शेअर मार्केटमध्ये आपला आयपीओ आणणार आहे.
शेअर मार्केटमध्ये आणणार 25000 कोटींचा आयपीओ
आणि हा आयपीओ आजपर्यंतच्या भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल. जेथे कंपनी 25000 कोटी रुपये जमवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्युंदाईने सेबीकडे याबद्दलचा द्राफ्ट सबमिट केला आहे आणि लवकरचं त्यांचा आयपीओ मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.
जर सगळ्या गोष्टी या योजनेनुसार झाल्या, तर लवकरचं ह्युंदाईचा आयपीओ मार्केटमध्ये येईल आणि चांगला धमाका करेल, यात शंका नाही. आजपर्यंत 2022 मध्ये एलआयसीने आणलेला आयपीओ हा भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ होता. जिथे त्यांनी जवळपास 20,000 कोटी रुपये जमवले होते. पण आता हुंदाई त्यापेक्षाही मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
जेवणानंतर वजन कमी करण्यासाठी 10 मिनिटं करा हे काम
जवळपास 20 वर्षानंतर कोणतीही भारतीय ऑटोमोबाईल कंपनी बाजारात आयपीओ आणतेय. याआधी मारुती सुझुकीने 2003 मध्ये बाजारात आयपीओ आणला होता. परंतु त्यानंतर इतर कोणत्याही कंपनीचा आयपीओ भारतीय बाजारात आलेला नाही आणि हा आयपीओ येणार म्हटल्यावर सगळेचं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक एक्साईटेड झालेत, एवढं मात्र नक्की.
2023 – 2024 च्या आकडेवारीनुसार ह्युंदाई ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या मार्केट लीडर आहेत. ह्युंदाईच्या क्रेटा, आय टेन, आय ट्वेंटी यांसारख्या गाड्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये चांगल्या लोकप्रिय आहेत.
अमेरिका आणि साऊथ कोरियानंतर ह्युंदाईसाठी भारत हे तिसरं सगळ्यात मोठे मार्केट आहे. मूळची साउथ कोरियाची असलेली ह्युंदाई मोटर्स भारतात मागील अनेक वर्षांपासून काम करते आणि आता त्यांचा आयपीओ येणार म्हटल्यावर सगळेचं खूप खुश आहेत.
तर तुम्ही ह्युंदाईच्या आयपीओसाठी अप्लाय करणार का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !