या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका ! कारण ऐकून धक्का बसेल

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा ही आपल्या सर्वांची आवडती मालिका आहे. दुपारच्या वेळेस येत असली, तरीही या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. रमा आणि अक्षयची प्रेमकहानी आणि त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाचं आवडतेय.

परंतु रमा आणि अक्षय यांच्या व्यतिरिक्त आई आजी, शशिकांत, जानवी यांसारख्या पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. जानवीच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसून येतेय. परंतु आता तिच्याबद्दल खूपचं धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका

अभिनेत्री स्मिता शेवाळेने मुरांबा या मालिकेला रामराम ठोकला आहे. यानंतर ती जानवीच्या भूमिकेत दिसून येणार नाहीये. याबद्दल तिने स्वतः आपल्या युट्युब अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

तिच्या या व्हिडिओनंतर फॅन्सला जबर धक्का बसला आहे. नेमकं असं काय झालं की, स्मिता शेवाळेने मुरुंबा मालिका सोडण्याचा निर्णय घेतला ? तर तिने स्वतः या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलीये. स्मिता शेवाळेने सांगितलं की, तिचा मुलगा कबीर हा खूप लहान आहे आणि त्याला सांभाळेल अशी कुणीही व्यक्ती तिच्या घरी नाहीये.

मुरांबा या मालिकेचं शूटिंग मुंबई मध्ये होतं आणि हे शूटिंग 20 दिवस चालतं. तोपर्यंत तिच्या मुलाला सांभाळणं तिच्यासाठी शक्य होत नाहीये. त्यामुळे स्मिता शेवाळेने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय.

दुनियादारी 2 चित्रपट येणार

परंतु असे नाहीये कि, स्मिता आता अभिनय विश्वापासून दूर जाणार आहे. स्मिता शेवाळेने पुण्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे तिची आई राहते. ती आईच्या घराजवळ घर घेईल आणि वेब सिरीज किंवा नाटक जेथे कमी दिवस काम करावं लागतं, अशा गोष्टीत काम करण्याचं तिने ठरवलंय.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका

स्मिता शेवाळेने पुढे सांगितलं की, आज ना उद्या अभिनयाची काम येऊ शकतील. परंतु माझ्या मुलाचं वय असं आहे की, त्याला माझी खूप गरज आहे आणि त्याचे हे दिवस परत येणार नाहीत. म्हणून मला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. त्याचबरोबर साईड बाय साईड मी अभिनय करत राहील.

अनेकांना तिच्या निर्णयाचं कौतुक वाटतंय. परंतु प्रेक्षक तिला मिस करतील, एवढं मात्र नक्की. तर तुम्ही सुद्धा स्मिता शेवाळेला मुरांबा मालिकेत मिस कराल का ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top