चला हवा येऊ द्या नंतर श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये

श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये

श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये. झी मराठीवर सध्या अनेक नवीन नवीन कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. त्यातचं झी मराठी आता एक नवीन रियालिटी शो घेऊन येणार आहे आणि या कार्यक्रमाचे नाव आहे ड्रामा ज्युनिअर. या कार्यक्रमात बच्चे मंडळी आपलं अभिनय कौशल्य दाखवणार आहेत.

ड्रामा ज्युनिअरच्या निमित्ताने आपल्या सर्वांची लाडकी श्रेया बुगडे टेलिव्हिजनवर कमबॅक करतेय. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून तिने अपार लोकप्रियता मिळवली होती. 2014 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम 2024 मध्ये बंद झाला. तब्बल 10 वर्ष चला हवा येऊ द्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये
श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये

श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये

निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे या तगड्या कलाकारांच्या फौजेमध्ये श्रेया बुगडेने तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ती या टीममध्ये एकमेव मुलगी होती आणि तिने सर्वांचीचं मनं जिंकली.

परंतु चला हवा येऊ द्यानंतर ही टीम वेगळी झाली. एकीकडे निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी कलर्स वाहिनीवरील हसताय ना, हसायलाचं पाहिजे हा कार्यक्रम सुरू केला. तर कुशल बद्रिके हिंदी कार्यक्रमात दिसला. भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे सुद्धा विविध नाटक आणि मालिकांमध्ये दिसत आहेत.

श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये
श्रेया बुगडे दिसणार नवीन रियालिटी शोमध्ये

परंतु चला हवा येऊ द्या नंतर श्रेया बुगडे कुठेही दिसली नव्हती. त्यामुळे तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर याबद्दलच विचारत होते की, तुम्हाला पुन्हा कधी टीव्हीवर पाहता येईल आणि आता तिच्या फॅन्सची उत्सुकता संपली आहे. ती लवकरचं ड्रामा ज्युनिअर कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दुनियादारी 2 चित्रपट येणार

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा एक प्रोमो चांगलाच व्हायरल झाला होता. जेथे अमृता खानविलकर आणि संकर्षण कराडे यांना किडनॅप करताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे सगळ्यांचीचं उत्सुकता ताणली गेली होती.

खरंतर या दोघांचं किडनॅपिंग केलं होतं ड्रामा जूनियर्समधील बच्चे मंडळींनी. त्यांनी आपल्या परीक्षकांना किडनॅप केलं, म्हणजे ही मुलं काय काय करू शकतात, हा विचारचं केलेला बरा.

ड्रामा जुनिअर्समध्ये अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे हे दोघे परीक्षक म्हणून काम करतील आणि ड्रामा ज्युनिअरचा विजेता ठरवतील.

तर तुम्हीसुद्धा एक्साईटेड आहात का ड्रामा जूनियर्स पाहण्यासाठी नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top