लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कलाचा बॉयफ्रेंड आई कुठे काय करते मालिकेत दिसणार

लक्ष्मीच्या पावलांनी

लक्ष्मीच्या पावलांनी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका टीआरपीमध्ये सुद्धा ठरलं तर मग या टॉपच्या मालिकेला कॉम्पिटिशन देत असते. या मालिकेत अभिनेत्री इशा केसकरने कलाची भूमिका साकारली आहे.

आणि आता कलाचा खऱ्या आयुष्यातील अद्वेत म्हणजेच इशा केसकरचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना हा सुद्धा स्टार प्रवाहवरील एका प्रसिद्ध मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. ऋषी सक्सेना लवकरचं आई कुठे काय करते मालिकेत एन्ट्री करेल.

लक्ष्मीच्या पावलांनी
लक्ष्मीच्या पावलांनी

लक्ष्मीच्या पावलांनी

ऋषी सक्सेनाला या आधी आपण झी मराठीच्या काही दिया परदेस या मालिकेत पाहिलं होतं. या मालिकेतून त्याने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. तो सर्वांचा लाडका बनला होता. परंतु मागील 6 वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर होता. आता मात्र त्याने आई कुठे काय करते मालिकेत धमाकेदार एन्ट्री केली आहे.

दुनियादारी 2 चित्रपट येणार

ऋषी सक्सेनाने एका मुलाखतीत याबद्दल माहिती सांगितली. तो म्हणाला की, मी मागील अनेक दिवसांपासून टेलिव्हिजनला मिस करत होतो. मी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. त्यातचं मला आई कुठे काय करते या मालिकेत मिहीर शर्मा ही भूमिका ऑफर झाली. मिहीर शर्मा हा एक उत्तम शेफ आहे. परंतु त्याची आई अरुंधतीच्या गाण्याची मोठी फॅन होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं, अशी तिची इच्छा असल्यामुळे आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अरुंधतीकडून गाणे शिकायला येतो.

लक्ष्मीच्या पावलांनी
लक्ष्मीच्या पावलांनी

ऋषी सक्सेनाने सांगितलं की, मालिकेच्या पहिल्या दिवशी त्याला खूप टेन्शन आलं होतं. परंतु मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्याला आपलंसं करून घेतलं आणि आता तो तिथे चांगलाच रुळला आहे. एकूणचं ऋषीला पुन्हा एकदा छोट्या पडल्यावर पाहणं त्याच्या फॅन्ससाठी खूप चांगला अनुभव असेल.

ऋषी सक्सेना आणि इशा केसकर हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करताय. एकीकडे ईशाची मालिका सुरू असताना ऋषीनेही स्टार प्रवाहच्या मालिकेत काम करणं हा सगळ्यांसाठीच आनंदाचा धक्का आहे.

तर तुम्हीसुद्धा एक्साईटेड आहात ना, ऋषी सक्सेनाला आई कुठे काय करते या मालिकेत पाहण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top