Jijaji Sali Marathi Story संध्यासाठी आजचा दिवस खूपचं आनंदाचा होता. कारण तिच्या संपूर्ण कुटुंबात, ती अशी पहिली मुलगी होती, जिने विशेष प्राविण्यात दहावी पास केली होती आणि ते सुद्धा 95 % गुणांनी. ती फक्त आपल्या शाळेतचं नाही, तर संपूर्ण तालुक्यात प्रथम आली होती. एवढ्या छोट्या गावात कोणत्याही ट्युशनविना तिने हे यश संपादन केलं होतं. त्यामुळे तिच्या आई-वडिलांपासून, शिक्षकांपर्यंत आणि संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटत होता.
दिवसभर प्रत्येक घरात संध्याचं कौतुक झालं होतं. संध्या आनंदाने आपल्या घरी परत येते आणि बाबांना म्हणते, “बाबा माझी दहावी तर झाली, आता मला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय.”
Jijaji Sali Marathi Story
संध्याचे बाबा म्हणतात, “घे ना ऍडमिशन. तुला शिकवण्यासाठी मी रात्रंदिवस एक करेल. रक्ताचं पाणी करेल. तुला जे शिकायचं, ते शिक. गरज पडली तर मी स्वतःला विकेल. परंतु तुझ्या शिक्षणात कधी कोणती कमी नाही पडू देणार.” संध्याला खूप आनंद होतो आणि ती बाबांना मिठी मारते. Jijaji Sali Marathi Story बाबाही प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, “बाळा तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगतोय मी.”
आई म्हणते, “अहो तुम्ही एका गोष्टीचा विचार केलाय का ? आपल्या गावामध्ये दहावीनंतरची शाळा नाहीये, कॉलेज नाहीये. हिला जर दहावीनंतर शिकायचं असेल, तर इथून तालुक्याच्या गावाला जावं लागेल. 40 किलोमीटर दूर आहे ते.” Jijaji Sali Marathi Story संध्या म्हणते, “आई माहिती आहे मला ते. जाईल ना मी. आपल्या गावातून रोज सकाळी एक बस असते आणि संध्याकाळीही असते. जाऊन येऊन करेल मी”
बाबा म्हणतात, “संध्या बेटा बरोबर आहे तुझं, पण खरं सांगायचं तर हा प्रवास सोपा नाहीये. रस्त्याची अगदी चाळण झालेली आहे. 40 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागतात आणि परत येण्यासाठीही तेवढाच वेळ. Jijaji Sali Marathi Story जर तू चार-पाच तास असा रोज प्रवास केला, तोही त्या वाईट रस्त्याने तर तुझी तब्येत बिघडेल ना.”
संध्या म्हणते, “बाबा मला आता माझ्या तब्येतीची काळजी नाहीये. मला शिक्षण पूर्ण करायचंय आणि त्यानंतर आपलं सगळ्यांचं भविष्य बदलायचंय. आता आपण या गरिबीत नाही राहायचं. Jijaji Sali Marathi Story मला तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायचीत. तुमच्यासाठी एक मोठं घर घ्यायचंय. तुम्हाला शहरात न्यायचंय. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप त्रास सहन केला, पण मला तुम्हाला प्रत्येक सोयसुविधा द्यायची आहे.”
बाबा म्हणतात, “खूप मेहनती मुलगी आहेस तू बेटा. परंतु रोज इतका मोठा प्रवास, तोही अशा वाईट रस्त्याने मला तर खूप भीती वाटते. कसं करशील तू हे सगळं ?” तेवढ्यात संध्याची मोठी ताई आणि भाऊजी तेथे येतात. Jijaji Sali Marathi Story आपल्या ताईला आणि भाऊजीला पाहून संध्या खूप खुश होते. ती ताईला मिठी मारते आणि भाऊजींच्या पाया पडते. भाऊजी तिला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देतात.
संध्याचे भाऊजी बाबांना म्हणतात, “बाबा तुमची काळजी कळतेय मला. आत्ताचं आम्हाला तालुक्याच्या गावावरून येथे येताना अडीच तास लागले, तेही स्वतःची गाडी असताना. तर बसमध्ये आणखीन वेळ लागेल. Jijaji Sali Marathi Story आणखीन त्रास होईल.” संध्या म्हणते, “काही नाही भाऊजी, मी करेल ॲडजस्ट. तुम्ही नका काळजी करू.”
सध्याची ताई म्हणते, “अशी कशी ऍडजस्ट करशील ? तुझ्यासारखाचं उत्साह मला सुद्धा होता. मीही चांगल्या मार्काने दहावी पास झाले होते. परंतु जेव्हा मी कॉलेजसाठी तालुक्याला जायला लागले, तेव्हा सहा महिन्यातचं माझी हौस भागली. Jijaji Sali Marathi Story तब्येत बिघडून गेली. सहन नाही होत असा हा प्रवास. खरं सांगायचं, तर हा एक जीवघेणा प्रवास आहे. कित्येक लोकांचे एक्सीडेंट होतात. अनेक लोक अपंग झाले आहे त्या प्रवासात.”
संध्याची आई खूप घाबरते आणि म्हणते, “नाही असं असेलं, तर मी नाही जाऊ देणार तुला तालुक्याच्या गावाला शिकायला. तुझ्या शिक्षणापेक्षा आम्हाला तुझा जीव जास्त महत्त्वाचा आहे. Jijaji Sali Marathi Story जसं तुझ्या ताईने लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलं, तसं तुलाही एखादा चांगला मुलगा भेटेल, तू लग्नानंतर शिक्षण पूर्ण कर. परंतु आता नको शिकूस.”
संध्या चिडून म्हणते, “आई हे काय बोलतेस तू ? मी शिक्षण पूर्ण नाही करायचं का ? Jijaji Sali Marathi Story मी शिकणारचं, मग भले काहीही हो.”
संध्याचे भावजी म्हणतात, “शांत व्हा सगळे. उगाचचं भांडू नका. Jijaji Sali Marathi Story एकमेकांवर चिडू नका. माझ्याकडे एक कल्पना आहे.”
संध्याचे बाबा विचारतात, “कोणती जावईबापू ?” भाऊजी म्हणतात, “मी तालुक्याच्या गावालाचं राहतो. Jijaji Sali Marathi Story जर संध्या माझ्याकडे राहायला आली आणि पुढील दोन-तीन वर्ष तिने तेथेचं राहून शिक्षण पूर्ण केलं, तर काय हरकत आहे ? सुट्टीच्या दिवशी ती येत जाईल तुम्हाला भेटायला, नाही तर तुम्ही येत जा.”
ही कल्पना संध्या आणि तिच्या मोठ्या बहिणीला खूप आवडते. परंतु सध्याच्या आई-बाबांना मात्र प्रश्न पडतो की, Jijaji Sali Marathi Story अशा सोळा वर्षाच्या तरण्या मुलीला बहिणीकडे शिकायला कसं पाठवायचं ? लोक काय म्हणतील. भाऊजी विचारतात, “काय झालं बाबा ? तुम्ही असे गप्प का झालात अचानक ? तुम्हाला नाही आवडली का ही कल्पना ?”
सध्याचे बाबा म्हणतात, “जावईबापू माफ करा आम्हाला. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही लहानपणापासून संध्याला पाहत आलात, एका मोठ्या भावासारखं तुम्ही तिला जीव लावता, Jijaji Sali Marathi Story परंतु आजूबाजूचे लोक काय म्हणतील ? अशा तरण्या पोरीला बहिणीकडे आणि भाऊजीकडे पाठवून दिलं, लोक चुकीच्या नजरेने पाहतील ना.”
भाऊजी म्हणतात, “बाबा तुमची शंका योग्यचं आहे. जेव्हा माझ्या मनात हा विचार आला होता, तेव्हा मला सुद्धा असंच वाटलं होतं की, नक्कीचं यावर तुम्ही शंका घ्याल. लोक काय म्हणतील याचा विचार कराल. परंतु लोक काय म्हणतील, यापेक्षा आपल्याला संध्याचं भविष्य महत्त्वाचं आहे. Jijaji Sali Marathi Story तिची हुशारी अशी वाया जाता कामा नये आणि जर लोकांचं समाधान करायचं असेल, तर मी संध्याला दत्तक घेतो. तसही आम्हाला काही मूलबाळ नाहीये. मी संध्याचा बाबा बनतो. तिला तुमच्याकडून दत्तक घेतो, मग तर कुणाला काही फरक पडणार नाही ना ?
ताई म्हणते, “अहो किती छान कल्पना आहे ही. माझ्या तर डोक्यात ही कल्पना आलीचं नाही. Jijaji Sali Marathi Story तशीही आपल्याला मुलंबाळं नाहीये. आपण तिला दत्तकचं घेऊया.”
ही कल्पना संध्याच्या आई-बाबांना सुद्धा आवडते. ते म्हणतात, “जावईबापू बरोबर आहे तुमचं. माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मी तिला माझ्यापासून दूरही करू शकतो. Jijaji Sali Marathi Story तिची स्वप्न महत्त्वाची आहेत. तिचं आमच्याबरोबर राहणं नाही. जर तुम्ही असं केलं, तर लोकांनाही कोणती शंका राहणार नाही.”
संध्याचे भावजी तिला विचारतात, “तुला कशी वाटली ही कल्पना ? Jijaji Sali Marathi Story संध्या म्हणते, “खूप छान वाटली बाबा.” हे ऐकून सगळेचं हसू लागतात.
संध्या म्हणते, “ताई खरंच मी लहान असताना तू मला खूप सांभाळलं होतं. तू आणि भाऊजी नेहमीचं माझ्यासाठी आई-वडिलांच्या जागी राहिलात Jijaji Sali Marathi Story आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय, हे मी कधीही विसरणार नाही.
जशी मी माझ्या आई-बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करणार, तशी तुमचीही सगळी स्वप्न पूर्ण करणार. तुम्हाला कधीही स्वतःच्या बाळाची कमी भासू नाही देणार मी.” Jijaji Sali Marathi Story संध्याची ताई तिला जवळ घेते. संध्याच्या आईबाबांच्या डोळ्यात अश्रू असतात. आपली छोटीशी संध्या एवढी हुशार झाली, एवढी समजूतदार झाली, हे पाहून त्यांना खूप आनंद होतो.
संध्याच्या भाऊजींच्या डोळ्यातही पाणी असतं. आपल्याला मूल नसणं, हे किती वाईट असतं, हे त्यांनी भोगलंय आणि Jijaji Sali Marathi Story आज आपल्याला मुलगी मिळाली, त्यामुळे त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. संध्याच्या डोळ्यातसुद्धा आपल्या भविष्याची सोनेरी स्वप्न दिसू लागतात.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा ? नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !