CBSE Full Form माहितेय का ? CBSE बद्दल इंटरेस्टिंग माहिती

CBSE Full Form 

मित्रांनो आज आपण CBSE Full Form आणि CBSE बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

CBSE Full Form 

CBSE Full Form आहे Central Board of Secondary Education.

CBSE हे भारतातील पब्लिक आणि प्रायव्हेट शाळांसाठी एक राष्ट्रीय स्तरावरचं शैक्षणिक बोर्ड आहे.

1929 साली तेव्हाच्या भारताच्या सरकारने हायस्कूल आणि इंटरमिजीएट शिक्षणासाठी एका बोर्डची स्थापना केली होती. पुढे जाऊन 1952 मध्ये ते CBSE बोर्ड बनले.

CBSE च्या आताच्या अध्यक्षा निधी छिब्बर आहेत. त्या एक IAS आहेत.

CBSE बोर्ड भारत सरकारच्या नियंत्रणात आहे आणि याचं मुख्यालय नई दिल्लीमध्ये आहे.

या बोर्डच्या अंतर्गत भारतात हजारो शाळा येतात आणि जगभरातल्या 28 देशांमध्ये सुद्धा शेकडो शाळा आहेत.

CBSE बोर्ड भारतीय भाषांसोबतच विदेशी भाषा मिळून एकूण 40 भाषांमध्ये शालेय विषय शिकण्याची सुविधा देते.

CBSE बोर्ड या परीक्षा आयोजित करते :

1. दरवर्षी CBSE बोर्ड 10 वी आणि 12 वी परीक्षा घेते.

2. बोर्ड आधी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी AIEEE एक्झाम घ्यायचं पण आता ती JEE ( main ) या नावाने घेतली जाते.

3. CBSE बोर्ड AIPMT ची परीक्षासुद्धा दरवर्षी घेते. ही परीक्षा देशातल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी महत्वाची असते.

4. CBSE शिक्षक भरतीसाठी Central Teacher Eligibility Test सुद्धा घेत असते.

RBI Full Form

CBSE बोर्डचे फायदे :

1. CBSE बोर्डचा अभ्यासक्रम हा इतर बोर्डच्या तुलनेत चांगला असतो.

2. दुसऱ्या शिक्षण बोर्डच्या तुलनेत CBSE बोर्डचे विद्यार्थी हे इंग्लिश बोलण्यात जास्त चांगले असतात.

3. CBSE च्या शाळा संख्येने जास्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळाबदलून दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेऊन शिक्षण घेणं सोपं जातं.

4. अनेक स्पर्धा परीक्षा या CBSE बोर्डच्या अभ्यासक्रमावर घेतल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचा CBSE बोर्डमधून शिक्षण घेण्यास जास्त उत्सुक असतात.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top