महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर ने नवीन गाडीनंतर पूर्ण केलं आणखी एक स्वप्न

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे खूपच लोकप्रिय झाला. तो आपल्या जबरदस्त कॉमेडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तो उत्तम लेखकही आहे. त्याने लिहलेले अनेक कॉमेडी स्किट प्रेक्षकांना खूप हसवतात.

प्रथमेश सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असतो. तो नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असतो. मागील महिन्यात प्रथमेशने महिंद्रा थार गाडी विकत घेतली होती आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं. आपल्या नवीन गाडीसोबतचे फोटोही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

प्रथमेश शिवलकर
प्रथमेश शिवलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर

आता प्रथमेशने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने आपलं घराचं स्वप्नही पूर्ण केलं आहे. प्रथमेशने गावी शेतात सुंदरसा बंगला बांधला आहे. त्याने आपल्या बंगल्याला ‘शिवार्पण’ असं नाव दिलं. या बंगल्याला त्याने खूप सुंदर रोषणाईसुद्धा केली होती.

अभिनेता प्रथमेश शिवलकरने घेतली महागडी गाडी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर ने आपल्या नवीन बंगल्याचे फोटोसुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये प्रथमेशचा बंगला खूपच सुंदर दिसतोय. ‘शिवार्पण’ नावाखाली सरस्वती काढल्याचंही दिसत आहे. बंगल्यात आतमध्ये सुंदर फर्निचरही केलं आहे आणि घराचं टेरेसही छान आहे.

प्रथमेश शिवलकर
प्रथमेश शिवलकर

प्रथमेशने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहलंय की,

यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २:
शिवार्पण
शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी……
मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण; अशीच स्वप्नातली वास्तु झाली साकार
नाव तिचे “शिवार्पण”
ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो, त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची
संधी आपल्याला मिळते…… तेव्हा त्या वास्तुचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच …..”शिवार्पण”
हक्काचं शेतघर

प्रथमेश शिवलकर
प्रथमेश शिवलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर ने या शब्दात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आणि आपल्या स्वप्नातील वास्तू साकार झाल्याचं म्हटलं आहे. याचं घरात त्याचं लहानपण गेलं आणि तो लहानाचा मोठा झाला. तेच घर नव्याने उभं करण्याची त्याला संधी मिळाली. प्रथमेशने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक फॅन्सनी आणि मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला नवीन बंगल्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top