मित्रांनो आज आपण RBI full form आणि RBI बद्दल जाणून घेणार आहोत.
RBI Full Form
RBI full form आहे Reserve Bank of India.
RBI म्हणजे भारतीय रिजर्व बँक ही भारताची सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण मध्यवर्ती बँक आहे. देशातील बँकांसाठीचे सर्व नियम हे रिजर्व बँकच बनवत असते.
देशभरात चलनाचं नियंत्रण आणि पुरवठा करण्याची जवाबदारी सुद्धा रिजर्व बँकेचीच आहे.
रिजर्व बँकेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 साली करण्यात आली होती. पुढे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1949 साली बँकेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. RBI वर वित्त मंत्रालय भारत सरकारचं नियंत्रण आहे आणि RBI चं मुख्यालय मुंबईत आहे.
रिजर्व बँक देशाची पेमेंट सिस्टीम आणि आर्थिक प्रगतीसाठी काम करते.
रिजर्व बँक आपल्या नोट मुद्रण या विभागाद्वारे नोटांची छपाई करते. नाशिक महाराष्ट्र, देवास मध्यप्रदेश, मैसूर कर्नाटक, सलबोनी पश्चिम बंगाल या चार ठिकाणी नोटप्रेसद्वारे नोटांची छपाई करते आणि पूर्ण देशात नोटांचं वितरण करते.
RBI ची कामे :
1. रिजर्व बँक बँकिंग व्यवस्थांच्या आधारे देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी काम करते.
2. देशाच्या चलनविषयक धोरणांसाठी रिजर्व बँक जवाबदार असते.
3. देशातील आर्थिक व्यवहारांसाठी असलेल्या पद्धतींची देखरेख आणि नियंत्रण करते.
4. देशातील बँकिंग सिस्टीमसाठीचे नियमावली RBI बनवते.
5. रिजर्व बँक देशातील अन्य बँकांना त्यांच्या ठेवींचा विमा आणि क्रेडिट सुविधा सुद्धा देते.
6. अर्थव्यवस्थेला भांडवल उपलब्ध करून देणे, स्थिरता आणि सुरक्षा देणं हे रिजर्व बँकेचं काम आहे.
देशाच्या विकासासाठी आर्थिक प्रणालीमध्ये आधुनिकता आणणं तसेच देशात पायाभूत सोयी सुविधांसाठी आर्थिक मदत पुरवणे हे काम रिजर्व बँक करते.
आर्थिक विकास आणि देशाच्या चलनाची किंमत स्थिर रहावी यासाठी रिजर्व बँक पाऊलं उचलत असते. देशात चलन संकट होऊ नये म्हणूनही रिजर्व बँक कार्यशील राहते.
बँकांसोबतच दुसरे अनेक आर्थिक प्रकल्पांवर रिजर्व बँक लक्ष ठेवून असते.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !