अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्न. ही प्रेक्षकांची अतिशय आवडती अभिनेत्री आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आजपर्यंत तिने नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून अनेक भूमिका साकारल्या आहेत.
नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्न ची प्रमुख भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली.
अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्न
आता 17 मेला मुक्ताचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. ती 45 वर्षांची झाली. तिच्या फॅन्सनी आणि अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पण तिला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की या वयातही तिने अजून लग्न का केलं नाही ? ती सिंगलच का आहे ? आता यामागचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
ती म्हणाली की, मी आता जेवढी सुखी आणि आनंदी आहे, त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन.
याचा अर्थ मुक्ता बर्वे योग्य जोडीदार मिळाला, जो तिला आतापेक्षा जास्त सुखी आणि आनंदी ठेवणार असेल तर ती लग्न करायला तयार आहे.
मुक्ताच्या कुटुंबात आई, वडील आणि एक मोठा भाऊ आहे. ती मूळची पुण्याची आहे आणि तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने पहिल्यांदा ‘रुसू नका फुगू नका’ या बालनाट्यात काम केलं होतं. मुक्ताची आई लेखिका आहे आणि तिनेच हे नाटक लिहलं होतं. या नाट्यात तिने ‘भित्रा ससा’ आणि ‘परी राणी’ या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.
या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचं दुःखद निधन
Actress Mukta Barve Marriage
त्यानंतर 15 वर्षांच्या वयात तिने रत्नाकर मतकरी यांच्या ‘घर असावे तिघांचे’ या नाटकात काम केलं होतं. पुढे तिने ‘जोगवा’ या चित्रपटात काम केलं. या भूमिकेमुळे तिला खूप ओळख मिळाली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली.
तिचा आणि स्वप्नील जोशीचा ‘मुंबई पुणे मुंबई‘ हा चित्रपट प्रचंड गाजला. सर्वांनी त्या दोघांच्या जोडीला खूप पसंत केलं. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची जोडी खूपच गाजली होती.
अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लग्न करायला तयार असल्याचं म्हटली आहे त्यामुळे आपल्याला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !