Garib Aai Baap Marathi Goshta शामराव जो दिसेल त्याच्या हातात साखर देत होते. संपूर्ण गावात साखर वाटत होते. कारण आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा निलेश युनिव्हर्सिटी मध्ये पहिला आला होता. याआधीचं त्याला कॅम्पस इंटरव्यूमध्ये एक लाख रुपये महिना पगाराची नोकरीही मिळाली होती आणि आता त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षाही पास केली त्यामुळे श्यामराव भलतेचं खुश होते.
शामरावांचा हा आनंद पाहून गावकरीही खुश होते. कारण त्यांनी शामराव आणि त्यांची पत्नी जयश्रीचे कष्ट पाहिले होते. अवघ्या एक एकर शेतीमध्ये दिवसरात्र कष्ट शामरावांनी पोराचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला मोठा साहेब बनवलं.
Garib Aai Baap Marathi Goshta
सगळ्यांना साखर वाटून झाल्यानंतर श्यामराव गावातील एसटी स्टँडवर येऊन उभे राहिले. एसटी आली आणि सर्वात आधी त्यांचा मुलगा निलेश गाडीतून उतरला. त्याने शामरावांना घट्ट मिठी मारली. निलेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तसेच अश्रू शामरावांच्या डोळ्यातूनही वाहत होते.
निलेश म्हणतो, “बाबा मी करून दाखवलं. तुमचं स्वप्न पूर्ण केलं. Garib Aai Baap Marathi Goshta अख्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलोय मी.” शामराव म्हणतात, “हो रे पोरा, करून दाखवलंस तू. तू माझ्या पोटी जन्माला आला, याचा अभिमान वाटतोय. चल घरी, तुझी आई वाट पाहत असेल.”
निलेश आणि शामराव घरी येतात. तर निलेशची आई जयश्रीने सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो. निलेशच्या स्वागताची तयारी केलेली असते. निलेश दारावर येताचं, ती निलेशला ओवाळते. त्याला पेढा भरवते. निलेशही आईच्या पाया पडतो आणि रिझल्ट तिच्या पायाशी ठेवतो. Garib Aai Baap Marathi Goshta जयश्रीला खूप आनंद होतो.
जयश्री आणि शामराव स्वतःच्या हाताने निलेशला जेवू घालतात. तेव्हा या तिघांच्याही डोळ्यात पाणी असतं. कुणी एक शब्दही बोलत नाही. फक्त त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात.
संध्याकाळी निलेश आई बाबांना सांगतो, “बाबा मला येत्या काही दिवसातचं जॉईन व्हावं लागणार आहे. माझं सगळं स्थिर स्थावर झाल्यावर तुम्ही सुद्धा माझ्याकडे शहरातचं रहायला यायचं. Garib Aai Baap Marathi Goshta आजपर्यंत तुम्ही जितके कष्ट केलेत ना, तितकाचं आराम करायचा.”
आपला मुलगा किती चांगला आहे, हे पाहून शामराव आणि जयश्रीला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, “हो रे पोरा, तुझ्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण ? आम्ही तुझ्याजवळचं देणार ना, दुसरं कोठे जाणार ?” निलेश काही दिवस आई-बाबांजवळ राहतो आणि त्यानंतर नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी निघून जातो.
नोकरीला जॉईन झाल्यानंतर निलेशचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलेलं असतं. Garib Aai Baap Marathi Goshta पहिला लाख रुपये पगार अकाउंटमध्ये जमा झाल्यावर तो खूप खुश होतो आणि पहिला पगार तो आई-बाबांच्या पायावर ठेवतो. शामराव आणि जयश्रीला खूप आनंद होतो.
परंतु निलेशचं आयुष्य तेव्हा बदलतं, जेव्हा तो ज्या कंपनीत काम करायचा, त्या कंपनीच्या मालकाची मुलगी निलेशच्या प्रेमात पडते. निलेशची हुशारी पाहून, निलेश हा किती टॅलेंटेड आहे, Garib Aai Baap Marathi Goshta हे पाहून परी त्याच्या प्रेमात बुडते आणि निलेशला लग्नाबद्दल विचारते. एवढी श्रीमंत आणि सुंदर मुलगी स्वतःहुन लग्नाला विचारतेय, हे पाहून निलेशही होकार देतो.
परी निलेशला घेऊन तिच्या आई-बाबांकडे जाते. तेव्हा निलेशसारखा हुशार मुलगा आपल्या मुलीला मिळतोय. उद्या निलेश कंपनी सांभाळेल, या विचाराने परीचे बाबाही या लग्नाला होकार देतात. परीचे बाबा निलेशला म्हणतात, “निलेश तुझ्यासारखा मुलगा माझा जावई होईल, याचा मला खूप आनंद झालाय. Garib Aai Baap Marathi Goshta तू उद्या माझी कंपनी सांभाळशील. कंपनीचा मालक बनशील, यात मला कोणती शंका नाहीये. परंतु हे लग्न जर व्हायचं असेल, तर माझी एक अट आहे.”
निलेश विचारतो, “कोणती अट आहे सर ?” परीचे बाबा बाबा म्हणतात, “लग्नानंतर तुला आमच्या घरीच राहावं लागेल. हे सगळं माझ्या मुलीचं आहे आणि त्यानंतर तुझं. मग तू येथेच येऊन राह.” Garib Aai Baap Marathi Goshta निलेश म्हणतो, “ठीक आहे सर, मला मान्य आहे.”
परीचे बाबा म्हणतात, “पूर्ण ऐकून तरी घे. लग्न झाल्यानंतर तू तुझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. तुझ्या कुटुंबात तुझे आई बाबा आहेत, यानंतर तू त्यांना पुन्हा कधीही संपर्क करायचा नाही.” Garib Aai Baap Marathi Goshta हे ऐकून निलेशच्या पायाखालची जमीनचं सरकते आणि तो विचारतो, “हे काय बोलताय सर तुम्ही ?”
परीचे बाबा म्हणतात, “मी अशी अट ठेवलीये, कारण मला तुझं सगळं बॅकग्राऊंड माहित आहे. तुझे आई बाबा आणि आमचं स्टेटस मॅच नाही होणार. त्यामुळे मला तू त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवलेला नकोय.”
निलेशला काय उत्तर द्यावं, हे समजतचं नाही. परी निलेशचा हात पकडते आणि म्हणते, “निलेश माझा विचार कर, लग्नानंतर तुला काय मिळणार आहे, तुझं भविष्य कसं असेल याचा विचार कर.” परीचे बाबा म्हणतात, “निलेश विचार कर, परीसारखी अतिशय सुंदर मुलगी तुझी बायको बनेल. माझी शेकडो कोटींची कंपनी तुझी बनू शकते. Garib Aai Baap Marathi Goshta तुमचं लग्न होईल त्याक्षणी मी तुला कंपनीचा मालक बनवतो. माझ्या संपूर्ण प्रॉपर्टीचा, घरादाराचा मालक बनवतो. आणि तुझ्या आईबाबांनाही दरमहा लाख रुपये देईल मी. आता तरी तुला माझी अट मान्य असेल का ?”
परीच्या बाबांची ही ऑफर ऐकून निलेशच्या मनात सुद्धा विचार येतो की, “हाच तो क्षण आहे, माझ आयुष्य बदलण्याचा. किती दिवस मी ही नोकरी करत राहणार. Garib Aai Baap Marathi Goshta मी मालक बनू शकतो आणि आई-बाबांचीही दरमहा एक लाख रुपयांत सोय होईल.” असा विचार करून निलेश या ऑफरसाठी हो म्हणतो.
परी आणि परीच्या बाबांना खूप आनंद होतो. या दोघांचं लग्न ठरतं आणि पुढील काही दिवसात परी आणि निलेश लग्न करतात. परंतु निलेशने आई-बाबांना गावाकडे याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं Garib Aai Baap Marathi Goshta आणि तो त्यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकतो.
इकडे गावाकडे शामराव आणि जयश्रीला प्रश्न पडतो की, दोन महिने झालेत. परंतु निलेश शहरातून परत आला नाही. त्याचा फोनही येत नाहीये. फोन केला तर फोन लागत नाही. Garib Aai Baap Marathi Goshta कंपनीत त्याला कोणी फोन देत नाही. आपल्या मुलाला नेमकं झालंय काय, काही बरं वाटतं तर झालं नाही ना, या विचाराने दोघे खूप घाबरतात.
जयश्री शामरावांना म्हणते, “निलेशच्या कंपनीतला एक मित्र आहे, Garib Aai Baap Marathi Goshta त्याने मला नंबर दिला होता. त्याला फोन करून विचारूया.” शामराव या मित्राला फोन करतात आणि त्याला सांगतात, “मी निलेशचा बाप बोलतोय. मागील दोन महिन्यांपासून त्याचा आणि आमचा कोणताही संपर्क झालेला नाहीये.”
हा मित्र निलेशचा बेस्ट फ्रेंड असतो आणि त्याला निलेश बद्दल सगळं माहीत असतं. तो शामरावांना सांगतो, “काका माफ करा, Garib Aai Baap Marathi Goshta परंतु हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. निलेशचं लग्न झालंय. कंपनीच्या मालकाच्या मुलीशी त्याने लग्न केलंय.”
हे ऐकून शामराव आणि जयश्रीला मोठा धक्काचं बसतो. ते म्हणतात, “हे कसं शक्य आहे ? आमच्या मुलाने लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं नाही.” Garib Aai Baap Marathi Goshta हा मित्र सांगतो, “काका त्याच्यासमोर अशी अटचं होती की, जर त्याला हे लग्न करायचं असेल, तर तुमच्याशी सर्व संबंध तोडावे लागतील आणि त्याने ही अट मान्य केली. त्यामुळे तो तुमच्याशी संपर्क करत नाहीये.”
शामराव आणि जयश्रीचा यावर विश्वासचं बसत नाही आणि ते म्हणतात, “आमचा निलेश असं कधीही करणार नाही. आम्ही आत्ताच त्याला भेटायला येतोय” असं म्हणून हे दोघेही शहराकडे यायला निघतात.
हे दोघे जेव्हा शहरात पोहोचतात. तेव्हा निलेशचा मित्र त्यांना परी आणि निलेशच्या घरी घेऊन जातो. तेथे परीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. Garib Aai Baap Marathi Goshta शहरातील मोठमोठ्या आसामी आलेल्या असतात. सर्वांना इनविटेशन कार्ड पाहूनचं आतमध्ये सोडलं जात असतं. शामराव आणि जयश्री तेथे पोहोचतात. परंतु वॉचमेन त्यांना आज जाऊ देत नाही. शामराव सांगतात, “मी निलेशचा बाप आहे.” परंतु वाचमन त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि त्यांना तेथून हाकलून लावतो. शामराव आणि जयश्रीला खूप वाईट वाटतं आणि हे दोघे बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर बसतात.
तेवढ्यात पार्टी अरेंज करणारा मॅनेजर तेथे येतो आणि तो वॉचमनला सांगतो की, “आज अचानक दोन माणसं कमी पडली आहेत. तुझ्या ओळखीत कोणी आहे का, जे हे काम करू शकतील.” वाचमन सांगतो, ‘आता तर कोणी येणार नाही, परंतु दोन माणसं आली होती, कदाचित ते हे काम करतील.” असं म्हणून वॉचमन शामराव आणि जयश्रीला हाक मारतो.
हे दोघे पुढे येतात. तर वाचमेन म्हणतो, “आतमध्ये पार्टी सुरू आहे वाढदिवसाची. तेथे दोन माणसं कमी आहेत, काम कराल का ?” जयश्री आणि श्यामरावांना वाटतं की, Garib Aai Baap Marathi Goshta आपल्या मुलाला भेटायची ही चांगली संधी आहे आणि हे दोघे हो म्हणतात. मॅनेजर श्यामराव आणि जयश्रीला आत घेऊन जातो. मॅनेजर शामरावांना वेटरचे कपडे देतो, तर जयश्रीला सर्वांसाठी सरबत बनवायला लावतो.
श्यामराव हे वेटरचे कपडे घालून हातात सरबतचा ट्रे घेऊन संपूर्ण पार्टीमध्ये वाटू लागतात. निलेश कोठे दिसतोय का, हे शोधू लागतात. परंतु तेवढ्यात एका मुलीचा धक्का लागून त्यांच्या हातातील सरबताचा एक ग्लास खाली पडतो आणि सरबत या मुलीच्या अंगावर सांडतं. मुलगी खूप चिडते आणि श्यामरावांवर जोर जोरात ओरडू लागते. “ए ओल्ड मॅन, तुला नीट दिसत नाही का ? तुला डोळे आहेत की बटन आहेत ? माझा इतका महागाचा ड्रेस खराब झाला, त्याच्या भरपाई कोण करेल ?”
पार्टीत जमलेल्या सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. परी आणि निलेशसुद्धा तेथे येतात. श्यामरावांना वेटरच्या ड्रेसमध्ये पाहून निलेशला मोठा धक्काचं बसतो. शामराव या मुलीला म्हणतात, “बेटा माझी काही चूक नाही. तुझंच लक्ष नव्हतं.” ही मुलगी खूप चिडते आणि म्हणते, “मला उलट उत्तर द्यायची, हिंमत कशी झाली तुझी” आणि ती चक्क श्यामरावांवर हात उगारते.
निलेश लगेच पुढे येतो आणि या मुलीचा हात पकडतो.निलेश त्यांना विचारतो, “बाबा तुम्ही इथे काय करताय ?” शामराव रडू लागतात आणि म्हणतात, “पोरा तुला भेटायला आलो होतो. Garib Aai Baap Marathi Goshta दोन महिन्यांपासून तुझा काही संपर्क नाही झाला. तुझ्या मित्राने सांगितलं तू लग्न केलं आणि आमच्याशी सगळे संबंध तोडले. माझा तर विश्वासचं नाही बसला. म्हणून तुला भेटायला आलो.”
परी निलेशला विचारते, “निलेश हे आहेत का तुझे बाबा, त्यांनी माझ्या बेस्ट फ्रेंडचा अपमान केला आहे. तुझ्या बाबांना तिची माफी मागायला लाव.”
तेवढ्यात जयश्री तेथे येते. निलेशला पाहून तिचाही उर भरून येतो आणि ती म्हणते, “पोरा असं का केलंस रे, असं कसं विसरलास आम्हाला ?” तेवढ्यात परीचे बाबा तेथे येतात आणि म्हणतात, “निलेश हा काय तमाशा लावलाय. आधी तुझा बाप आला आणि आता तुझी आई आली का ? इतकी मोठी पार्टी आहे, त्यांची लायकी आहे का इथे थांबायची, त्यांना बाहेर काढ.”
निलेशला खूप राग येतो आणि तो परीचा बाबांवर ओरडून म्हणतो, “शट अप.” हे ऐकून सर्वांना मोठा धक्काचं बसतो. परी निलेशला म्हणते, “निलेश तुझी हिम्मत कशी झाली, Garib Aai Baap Marathi Goshta माझ्या बाबांवर ओरडण्याची. माझे बाबा आहे ते, आताच्या आता त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी माग.”
निलेश म्हणतो, “मी तुझ्या बाबांना बोललो, तर तुला इतका राग आला. मला त्यांची माफी मागायला लावतेस. मग तुझे बाबा आणि तू माझ्या आई बाबांना जे बोलताय, त्यांना इथे जी वागणूक मिळतेय, त्यासाठी मला किती राग आला पाहिजे, याचा विचार कर.
तुम्ही श्रीमंत आहात आणि माझे आई-बाबा गरिब आहेत, म्हणून मान अपमान वेगळा होतो की काय. उलट गरिबाला जितका स्वाभिमान असतो ना, तितका तुमच्यासारख्या माजूरड्या श्रीमंतांना नसतो.”
परीचे बाबा म्हणतात, “निलेश तू तुझी लिमिट क्रॉस करतोय. Garib Aai Baap Marathi Goshta आज तुझ्याकडे जे काही आहे, ते मी दिलेलं आहे. नाहीतर तुला कुत्रही विचारत नव्हतं. हे लक्षात ठेव.” निलेश निलेश चिडून म्हणतो, “मग तुम्ही तरी मला कशाला विचारलं ?
माझे आई-बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत. माझे परमेश्वर आहेत. ते होते म्हणून मी आहे. ते आहेत म्हणून, मी राहणार आहे. त्यामुळे त्यांचा अपमान नाही सहन करू शकत. तुमच्या पैशाला, कंपनीला, गाडी, बंगल्याला लाथ मारतो मी. नोकरी नाही मिळाली, तरी चालेल. आई बाबाबरोबर शेतात जाऊन काम करेल, सुखी भाकरी खाईल, पण आई बापाला कायम आनंदात ठेवेल.”
मराठी दुःखद गोष्ट
असं म्हणून निलेश आई बाबाचा हात पकडतो आणि त्यांच्याबरोबर तेथून निघून जातो. परी आणि परीच्या बाबांना मोठा धक्काचं बसतो. या घटनेला पंधरा दिवस उलटून जातात. निलेश गावीचं असतो आणि आता आई-बाबांबरोबरचं राहायचं, शेतात काम करायचं, असं त्याने ठरवलेलं असतं. आता ते शहर नको, शहरातली ती माणसं नको, असंही त्याला वाटतं.
परंतु तेवढ्यात परीचे बाबा आणि परी तेथे पोहोचतात. हे दोघे निलेशसमोर हात जोडून म्हणतात, ‘निलेश आम्हाला माफ कर. आमची खूप मोठी चूक झाली. परंतु आता आम्हाला कळून चुकलंय की, Garib Aai Baap Marathi Goshta जशी परीला तिच्या आई-बाबांची किंमत आहे. तशी तुलाही तुझ्या आई बापाची असेलचं ना. आणि तुझ्यासारखा मुलगा जो इतक्या शेकडो करोडोंची प्रॉपर्टी आईबापासाठी सोडून येऊ शकतो. त्याच्यापेक्षा चांगला मुलगा माझ्या मुलीला कुठे भेटणार नाही आणि इतका चांगला मालक माझ्या कंपनीला कुठे भेटेल.
हे ऐकून निलेश आणि त्याच्या आई-बाबांना खूप आनंद होतो. त्यानंतर निलेश आणि परीचा संसार सुखाचा होतो. निलेशचे आई-बाबाही त्याच्याबरोबरचं राहतात. Garib Aai Baap Marathi Goshta निलेश त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करतो. त्यांना आयुष्यभर आरामात ठेवतो.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा. धन्यवाद !