IPS Full Form टीव्ही, सिनेमामध्ये जेव्हा आपण एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दरारा पाहतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात असा अधिकारी होण्याची ईच्छा जागृत होते. असा अधिकारी होण्याचा एक मार्ग म्हणजे IPS (Indian Police Service).
IPS Full Form
आज आपण IPS full form जाणून घेणार आहोत आणि याबद्दल माहिती घेणार आहोत.
IPS full form आहे Indian Police Service.
आपल्या समाजात कायदा सुव्यवस्था आणि शांती ठेवण्याचं काम हे पोलिसांचं असतं आणि पोलीस आपली ही जवाबदारी उत्तमप्रकारे निभावत असतात. आपल्या आसपास कुठेही सामान्य माणसासोबत अन्याय झाला तर तो प्रथम पोलिसांकडे धाव घेतो कारण त्याचा पोलिसांवर विश्वास असतो.
इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच भारतीय पोलीस सेवा ही आपल्या देशभरासाठीची सिव्हिल सेवा आहे. IPS अधिकाऱ्यांची निवड UPSC परीक्षेतून केली जाते.
ही सेवा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियंत्रणात येते. IAS आणि IFS सेवांबरोबरची IPS ही सिव्हिल सर्व्हिस आहे.
IPS अधिकारी होण्यासाठीची पात्रता :
1. उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
2. किमान वय 21 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे 32 वर्ष आहे.
3. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यालयातून ग्रॅज्युएट असावा.
4. आधीपासून IAS किंवा IFS अधिकारी म्हणून नेमणूक झालेले अधिकारी IPS अधिकारी आपली उमेदवारी सादर करू शकत नाही.
5. शारीरिक चाचणी ही ठरवलेल्या नियमांप्रमाणे घेण्यात येईल.
नवीन IPS अधिकारी बनणाऱ्या उमेदवारांसाठी 2 वर्षांची ट्रेनिंग असते. ट्रेनिंग झाल्यानंतर या IPS अधिकाऱ्यांना सुरुवातीला सॅलरी 56100 रुपये असते तर पदोन्नती आणि अनुभवासोबत सॅलरी जास्तीत जास्त 2,25,000 रुपये मिळू शकते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकते.
IPS अधिकाऱ्याच्या जवाबदाऱ्या :
1. शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी असते.
2. गुन्हेगारी रोखणं आणि त्यासाठी आवश्यक नियम बनवण्याची जवाबदारी असते.
3. सामान्य लोकांच्या सुरक्षेची जवाबदारी IPS अधिकाऱ्यावर असते.
4. ट्रॅफिकशी संबंधित जवाबदारीही त्यांच्यावरच असते.
मित्रांनो या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला IPS चा full form आणि IPS अधिकाऱ्याच्या पदाबद्दल माहिती दिली.
तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर असेच आमच्या साईटवरील दुसरे आर्टिकलसुद्धा वाचा.
धन्यवाद !