Panchayat Season 3 Trailer Review In Marathi. आपल्या देशात 4G सुरू झाल्यानंतर ओटीटी (OTT) मार्केटला चांगलीचं झळाळी मिळाली. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार यांसारख्या जगभरातील मोठमोठ्या ओटीटी कंपन्या भारतात आल्या आणि त्यांनी OTT कन्टेन्ट बनवायला सुरुवात केली.
ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटला वेब सिरीज असं म्हटलं जातं. भारतात आता दरवर्षी शेकडो वेबसिरीज बनतात. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वेब सिरीज लोकांच्या मनात घर निर्माण करतात. अशीच एक वेबसिरीज आहे ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची पंचायत.
Panchayat Season 3 Trailer Review In Marathi
टीव्हीएफ (TVF) या कंटेंट क्रीएशन कंपनीने बनवलेली पंचायत ही वेबसिरीज संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या वेबसिरीजचे 2 सीजन रिलीज झाले आहेत आणि आता 28 मे रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पंचायत सीजन 3 रिलीज होणार आहे. या सीझनचा ट्रेलर युट्युबवर रिलीज करण्यात आलाय.
पंचायत वेबसिरीजची गोष्ट घडते फुलेरा या गावात. जिथे सचिवजी, प्रधानजी, मंजू देवी, बंदराकस आणि एमएलए (आमदार) यांच्यात चढाओढ सुरू आहे. गावात निवडणुका आहेत आणि निवडणुकी दरम्यानचं राजकारण विनोदी ढंगाने या सिरीजमध्ये दाखवण्यात येईल.
अबीर गुलाल मालिकेत हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
पंचायत या वेब सिरीजची निर्मिती करणारी कंपनी टीव्हीएफ (TVF) आपल्या वेबसिरीजसाठी खूप प्रसिद्ध आहे. मग त्यांची TVF Pitchers ही वेबसिरीज असो किंवा मग TVF Kota Factory आणि TVF Aspirants या सर्वच वेब सिरीजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यातल्या त्यात पंचायत ही वेबसिरीजतर अनेक लोकांची फेवरेट आहे.
पंचायत सिजन 3 ट्रेलर रिव्ह्यू
पहिल्या सीजनपासून अभिनेता जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फेजल मलिक, चंदन रॉय यांसारख्या तगड्या कलाकारांनी या सिरीजमध्ये जबरदस्त कामं केलीत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
या आधीचे दोन सीजन जबरदस्त सुपरहिट झाले आहेत आणि दुसरा सिझन संपल्यानंतरचं लोक पंचायतचा सिझन 3 कधी येतोय, त्याची वाट पाहत होते. याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. असंही म्हटलं जात होतं की, जितेंद्र कुमार सीजन 3 मध्ये नसेल. परंतु या सर्व अफवा होत्या.
आता तो पंचायत सीजन 3 मध्ये दिसून येतोय आणि फॅन्स 18 मे ची वाट पाहत आहेत, जेव्हा ही वेबसिरीज प्राईम व्हिडिओवड रिलीज होईल.
तर तुम्ही एक्साईटेड आहात का पंचायत सीजन 3 पाहण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !