Sasra Sun Marathi Goshta “सासरेबुवा, ओ सासरेबुवा लवकर इकडे या.” या सुरातचं सोनाली तिच्या सासऱ्यांना सुभाषरावांना जोरजोरात हाका मारत होती. सुभाषराव गडबडीने तेथे येतात आणि विचारतात, “काय झालं सुनबाई ?” सोनाली टॉयलेटकडे हात दाखवते आणि म्हणते, “हे काय आहे ? किती वास येतोय, किती वेळेस सांगितलं तुम्हाला, टॉयलेट वापरल्यानंतर चांगली स्वच्छता ठेवत जा. आता माझ्या मैत्रिणी येणार आहेत किटी पार्टीसाठी. त्यांच्यातील कोणी जर टॉयलेट युज केलं, तर त्यांना कसं वाटेल, माझी सगळी लाज निघेल ना.”
सुभाषराव थरथर करू लागतात आणि म्हणतात, “सुनबाई मी दोनदा नाही, चारदा पाणी टाकलं. तू जसं म्हणाली, तसचं मी टॉयलेट वापरतोय.” सोनाली चिडून म्हणते, “खोटं बोलण्यात तर तुमचा एक नंबर आहे. तुम्ही नाही सुधारणार. तुमच्या मुलाला सांगून तुमच्या बेडरूममध्येच एक टॉयलेट बांधून घेते. म्हणजे डोक्याचा ताण तरी एकदाचा मिटेल. जा आता तुमच्या रूममध्ये आणि जोपर्यंत आमची पार्टी सुरू आहे, तोपर्यंत बाहेर निघू नका. नाहीतर उगाचचं माझ्या मैत्रिणी तुम्हाला घरात काम करणारा नोकर समजतील आणि परत रडत बसाल तुम्ही.”
Sasra Sun Marathi Goshta
सोनालीचे शब्द ऐकून सुभाषरावांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, “हो सुनबाई नाही येणार बाहेर” आणि ते आपल्या खोलीत निघून जातात.
सुभाषराव हे खूपचं स्वच्छ मनाचे आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. एका सरकारी कार्यालयात कारकुनाची नोकरी केली त्यांनी आयुष्यभर. कधी एक रुपयाची लाचं घेतली नाही की भ्रष्टाचार केला नाही. सगळीकडे त्यांना संत म्हणूनचं लोक हाक मारायचे.Sasra Sun Marathi Goshta
परंतु इतक्या संतवृत्तीच्या माणसाच्या नशिबी मात्र सोनालीसारखी उद्धट सून आणि राजेंद्रसारखा नालायक मुलगा आला होता. सोनालीला सुभाषराव घरात जड झाले होते. तिला राजा राणीचा संसार हवा होता, म्हणून ती काही ना काहीतरी कारण काढून रात्रंदिवस सुभाषरावांचा अपमान करायची. तर राजेंद्र हा बायकोचा बैल होता. बायकोपुढे एक शब्द बोलण्याची त्याची हिंमत नव्हती.
सुभाषरावांच्या मनात अनेकवेळेस विचार आला की, हे सगळं सोडून कुठेतरी एखाद्या वृद्धाश्रमात जावं. नाहीतर एखादी वेगळी खोली घेऊन राहावं. परंतु घाबरट स्वभाव असल्यामुळे त्यांना ते काही जमत नव्हतं आणि ते सोनालीचा अत्याचार सहन करत होते.
एक दिवस सुभाषराव भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये आले होते. सगळा भाजीपाला घेऊन ते घरी जात होते. तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर कुणीतरी थपथप करत.
सुभाषराव मागे वळून पाहतात. तर एक माणूस उभा असतो. तो दोन्ही हात पुढे करतो आणि म्हणतो, “अरे सुभ्या ओळखलं का मला ?” सुभाषरावांना मात्र या माणसाची ओळख नाही पटत आणि ते म्हणतात, “माफ करा, नाही ओळखलं, कोण आहात तुम्ही ?” हा माणूस म्हणतो, “मला माहीतच होतं म्हातारपणात तुला स्मृतीभ्रंश होणार आहे. त्यामुळे मला ओळखत नाहीये. अरे तुझ्या लहानपणीचा सर्वात जिवलग मित्र रवींद्र.”
हे ऐकून सुभाषरावांना खूप आनंद होतो. त्यांच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. Sasra Sun Marathi Goshta रवींद्र आणि सुभाषराव दोघे एकाच गल्लीत, शेजारी शेजारी राहायचे. या दोघांची मैत्री संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. सगळे त्यांना जय वीरू अशीचं हाक मारायचे आणि आज जवळपास 25 वर्षानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट झाली होती. शेवटी रवींद्रच्या लग्नात सुभाषराव गेले होते आणि त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता.
रवींद्र आणि सुभाषराव एकमेकांना घट्ट मिठी मारतात. रवींद्र म्हणतो, “सुभ्या चल मस्तपैकी कुठेतरी चहा पिऊ आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ.” सुभाषरावसुद्धा तयार होतात. परंतु तेवढ्यात त्यांच्या मनात विचार येतो, घरी जायला उशीर झाला तर सुनबाई ओरडेल आणि ते म्हणतात, “नाही रवींद्र, मला घरी जायला उशीर होतोय. तू तुझा नंबर देऊन जा. आपण उद्या भेटू.”
रवींद्र म्हणतो, “घरी जायची घाई आहे का तुला आणि सॉरी बरं काझ पण मला माहिती आहे वहिनी आता या जगात नाहीये. Sasra Sun Marathi Goshta मग कोण आहे तुला विचारणार ? चल गपचूप,” असं म्हणून रवींद्र सुभाषरावांचा हात पकडतो आणि त्यांना एका चहाच्या टपरीवर घेऊन येतो.
रवींद्र आणि सुभाषराव चहा पिऊ लागतात. रवींद्र विचारतो, “मग काय चाललंय तुझ्या आयुष्यात ?” सुभाषराव सांगतात, “काही नाही, मुलाचं लग्न झालंय. मुलगा, सुनबाई आणि मीच असतो घरात. सगळं रोजचचं नवीन काही नाही. तुझं काय चाललंय ?”
रवींद्र सांगतो, “अरे रिटायर झाल्यानंतर मी स्वतःची एक प्रेस सुरु केली आहे. तेथे मी कविता संग्रह कथासंग्रह, पुस्तक छापतो.” Sasra Sun Marathi Goshta हे ऐकून सुभाषरावांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, “अरे वा मस्त काम करतोयस.” रवींद्रचा चेहरा पडतो आणि तो म्हणतो, “कसलं मस्त काम यार, रिटायरमेंटनंतरचा सगळा पैसा या धंद्यात टाकला. वाटलं काहीतरी छान होईल. परंतु जितकी पुस्तकं छापली सगळी फेल झाली. एकही चाललं नाही. धंद्यात नुकसान होतंय.”
सुभाषराव म्हणतात, “नको काळजी करू. सगळ ठीक होईल.” तेवढ्यात रवींद्रला काहीतरी सुचतं आणि तो म्हणतो, “बरं झालं तू भेटलास. तुला सुद्धा लिखाणाची आवड होती ना. लहानपणी काय भारी भारी निबंध लिहायचा तू. सगळे शिक्षक म्हणायचे, हा एक दिवस मोठा लेखक होणार. तू काही लिहितोस की नाही आता ?”
सुभाषराव म्हणतात, “अरे रवींद्र कोठे लहानपणीच्या त्या गोष्टी काढतोस ? आता मी काही नाही लिहीत. लहानपणीचे दिवस गेले. आता वर जायचे दिवस आलेत.’ रवींद्र म्हणतो, “अरे अनेक लेखक याचं वयात समृद्ध झालेले असतात. आयुष्यातील अनुभवांनी त्यांना समृद्ध केलेलं असतं. तू सुद्धा काहीतरी छान लिहि. Sasra Sun Marathi Goshta आपण तुझं पुस्तक छापू. काय सांगता येतं, आपल्या दोघांचं नशीब बदलेल.” सुभाषराव म्हणतात, “हो हो ठीक आहे, करतो विचार आणि आता मला खरंच जाऊ दे, मला खूप उशीर झाला आहे.” असं म्हणून सुभाषराव रवींद्रला पत्ता आणि नंबर देऊन घरी येतात.
रात्री झोपण्याचा प्रयत्न करत असताना सुभाषरावांना रवींद्र आज भेटल्याची आठवण होते. लहानपणीचा मित्र भेटला म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि रवींद्र जे काही म्हणाला तेही त्यांना आठवतं. लहानपणी सुभाषरावांना लिखाणाची खूप आवड होती.
सुभाषराव विचार करतात, काय हरकत आहे, दिवसभर माझ्याकडे वेळ असतो आणि जर खरंच काही चांगलं झालं, Sasra Sun Marathi Goshta तर रवींद्रचंही नुकसान भरून निघेल, त्याची अडचण दूर होईल. आणि त्या दिवसानंतर सुभाषराव एक पुस्तक लिहू लागतात.
बायको गेल्यानंतर म्हाताऱ्या नवऱ्याचं काय होतं. त्याच्या आयुष्यातील त्रास, एकटेपणा आणि सुना मुलाचं वागण बोलण या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवावर ते एक सुंदर पुस्तक लिहितात.
जवळपास तीन महिन्यानंतर हे पुस्तक पूर्ण होतं आणि ते घेऊन सुभाषराव रवींद्रकडे जातात आणि म्हणतात, Sasra Sun Marathi Goshta “तू म्हणाला होतास ना. एखाद पुस्तक लिही. पहा मी हे पुस्तक लिहिलंय.” रवींद्रला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, “अरे वा बरं झालं, तू मनावर घेतलंस आता तुझं हे पुस्तक कदाचित माझं सर्वात महत्त्वाचं आणि माझा व्यवसाय वाचवणारा पुस्तक असेल किंवा माझं शेवटचं पुस्तक असेल. त्यानंतर मी माझी प्रेस बंद करून टाकेल.”
रवींद्र लगेचं हे पुस्तक छापायला घेतो आणि हे पुस्तक प्रसिद्ध होताचं खूप प्रसिद्ध होतं. Sasra Sun Marathi Goshta या पुस्तकाच्या हजारो प्रति विकल्या जातात. सगळीकडे त्यांच्याचं नावाची चर्चा सुरू असते। परंतु सुभाषरावांनी या पुस्तकाला उपनाव दिलेलं असतं. त्यामुळे त्यांची खरी ओळख कोणालाही कळत नाही. त्यांच्या मुलाला आणि सुनबाईलाही नाही.
या पुस्तकाचा खूप चांगला खप होत असल्यामुळे रवींद्रचं जे नुकसान झालेलं असतं ते भरून निघतं. रवींद्र सुभाषरावांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवतो आणि म्हणतो, “आजपासून तू या कंपनीत माझा पार्टनर.” हे एकूण सुभाष रावांना मोठा धक्काचं बसतो आणि ते म्हणतात, “हे काय बोलतोयस तू ?” तर रवींद्र म्हणतो, “एकदम बरोबर बोलतोय मी. तुझ्यामुळे माझा व्यवसाय वाचला. नुकसानीतून फायद्यात आलो मी. त्यामुळे आजपासून या कंपनीत तू अर्धा हिस्सेदार, अर्धा मालक आणि यानंतर एक शब्दही बोलायचा नाही.”
सुभाषरावांचा नाईलाज होतो आणि ते काहीचं बोलत नाही. इकडे एक दिवस सोनाली तिच्या नवऱ्याला राजेंद्रला म्हणते, Sasra Sun Marathi Goshta “अहो मी विचार करतेय, एखादी नोकरी करावी. घरात बसून बसून खूप बोर होतंय. आजकाल तर तुमचे बाबासुद्धा दिवसभर बाहेरचं फिरतात.” राजेंद्र म्हणतो, “हो कर ना. तेवढाच तुला विरंगुळा होईल. चार पैसे हातात मिळतील.” सोनाली खूप खुश होते आणि लगेचं जॉब शोधू लागते.
काही दिवसानंतर सुभाषराव जेव्हा कंपनीत येतात. तेव्हा रवींद्र त्यांना सांगतो, Sasra Sun Marathi Goshta “अरे सुभाष आज आपल्या कंपनीत रिसेप्शनिस्टच्या जॉबसाठी काही मुली येणार आहेत. त्यांचा फायनल इंटरव्यू घ्यायचा आहे.” सुभाषराव म्हणतात, “हो घेऊयात ना.”
एकानंतर एक रिसेप्शनिस्टच्या पोस्टसाठी इंटरव्यू सुरू होतात. सुभाष आणि रवींद्र इंटरव्ह्यू घेत असतात. Sasra Sun Marathi Goshta परंतु अचानक या दोघांच्या केबिनमध्ये सोनाली येते. सोनालीला पाहून सुभाषरावांना आणि सुभाषरावांना पाहून सोनालीला मोठा धक्काचं बसतो. सोनाली विचारते, “सासरेबुवा तुम्ही येथे काय करताय ?” तेव्हा रवींद्र सांगतो, “मिसेस सोनाली, हे आमच्या कंपनीचे पार्टनर आहेत. अर्धे मालक आहेत आणि आमचं सर्वांत जास्त विकलं गेलेलं पुस्तकसुद्धा त्यांनीचं लिहिलंय.”
हे ऐकून सोनालीच्या पायाखायची जमीनचं सरकते. तिचा विश्वासचं बसत नाही. ती म्हणते, “तुम्ही तर आम्हाला काहीचं नाही सांगितलं.” Sasra Sun Marathi Goshta सुभाषराव काहीचं बोलत नाही. तेव्हा रवींद्र म्हणतो, “सोनाली मॅडम तुमची पर्सनल लाईफ बाजूला ठेवा. तुम्ही येथे इंटरव्ह्यू साठी आलाय ना, मग आम्ही जे विचारू त्या प्रश्नांची उत्तर द्यायची.” सोनाली म्हणते, “सॉरी सर.”
रवींद्र सोनालीला एकानंतर एक प्रश्न विचारू लागतो. सोनाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते. परंतु सुभाषराव तिला एकही प्रश्न विचारात नाही. रवींद्र म्हणतो, Sasra Sun Marathi Goshta “अरे सुभाष तुला तुझ्या सुनबाईला एखादा प्रश्न नाही का विचारायचा ?”
सुभाषराव म्हणतात, “हो विचारायचा आहे ना. एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचाय.” सुभाषराव सोनालीला प्रश्न विचारतात, “तुम्हाला टॉयलेट साफ करता येतं का ?” हे ऐकून सोनालीच्या पायाखालची जमीनचं सरकते आणि ती विचारते, “सर हे तुम्ही काय प्रश्न विचारताय ? मी येथे रिसेप्शनच्या जॉबला आले आहे, साफसफाई करणाऱ्याच्या नाही.”
सुभाषराव म्हणतात, “ते मलाही माहित आहे आणि मी तर फक्त तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारला. तुम्ही एक रिसेप्शनिस्ट म्हणून येथे जॉईन होणार आहात ना. मग तुम्हाला कोणी काहीही प्रश्न विचारू शकतं आणि त्याला विनम्रपणे उत्तर देणं, हे तुमचं काम आहे, चिडणं नाही.”
सोनाली दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, “हो सर, मला येतं टॉयलेट साफ करता.” Sasra Sun Marathi Goshta सुभाषराव म्हणतात, “परंतु मला नाही जमत. मी टॉयलेट युज केल्यानंतर ते खूप खराब करतो आणि जर तुम्हाला एखाद्याने येऊन सांगितलं की, टॉयलेट खूप खराब आहे. तुमच्या कंपनीच्या मालकानेचं केलंय, तर तुम्ही काय कराल ?”
सोनाली म्हणते, “मी त्यांना सॉरी म्हणेल आणि लवकरात लवकर ते टॉयलेट साफ करून घेईल.” सुभाषराव विचारतात, “मग त्यानंतर तुम्ही मला जाब विचारायला येणार ना, मला टोमणे मारायला, वाईट बोलायला येणार ना.”
सोनाली म्हणते, “नाही सर तुम्ही कंपनीचे मालक आहात, माझे बॉस आहात, Sasra Sun Marathi Goshta मग मी तुम्हाला कसे काय टोमणे मारू शकते, जाब विचारू शकते. तुम्ही मला पगार देणार, तुम्हाला असं काही बोलण चुकीचं आहे.”
सुभाषराव म्हणतात, “मग जसा या कंपनीत मी तुमचा बॉस आहे. Sasra Sun Marathi Goshta तुम्हाला मी पगार देतो. तसंच त्या घरात जेथे तुम्ही राहता, ते घर माझ आहे. त्या घराचा मालक मी आहे. ज्या नवऱ्याच्या पगारावर तुम्ही ऐश करता, त्या नवऱ्याला जन्म मी दिला आहे. त्याचं शिक्षण मी पूर्ण केलंय. मग माझ्याकडून जर एखादी चूक झाली, तर त्याबद्दल रोज माझा अपमान करणं, मला घालून पाडुन बोलण, हे चुकीचं नाही का ?
येथे दहा पंधरा हजार रुपयांच्या पगारासाठी तुम्ही बॉसची बोलणी ऐकून घेतात. Sasra Sun Marathi Goshta अपमान सहन करतात. परंतु घरी सासू-सासर्याकडून छोटीशी चूक जरी झाली, तरी त्यांचा अपमान करता. ते चुकीचं नाही का ?” सोनालीला काय बोलावं, काय उत्तर द्यावं हेचं कळत नाही. संपूर्ण केबिनमध्ये फक्त एक शांतता असते. सुभाषरावांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं आणि सोनालीला काय उत्तर द्यावं, हे कळत नाही. सोनाली जागेवरून उठते आणि बाहेर निघून जाते.
रवींद्र सुभाषरावांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, “ज्या दिवशी तुझं पुस्तक वाचलं, तेव्हाच मला समजलं होतं की, Sasra Sun Marathi Goshta ही तुझ्याचं आयुष्याची कहाणी आहे. मित्रा आता तू स्वतःच्या पायांवर उभा राहिला आहेस. यानंतर कधी कोणावर अवलंबून राहू नकोस. मी तर सांगेल, त्या घरात परत जाऊ नकोस. माणसाचा स्वाभिमान सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.”
सुभाषराव म्हणतात, “इंटरव्ह्यू झालेत ना सगळे. चल मग आता.” रवींद्र विचारतो, “कोठे जायचं ?” Sasra Sun Marathi Goshta सुभाषराव सांगतात, “माझ्या नवीन घरी. आज गृहप्रवेश आहे माझा.” हे ऐकून रवींद्रला खूप आनंद होतो आणि तो सुभाषरावांना मिठी मारतो. आजपासून सुभाषराव नवीन घरात शिफ्ट होतात आणि त्यानंतर ते त्यांच्या मुलाशी आणि सुनबाईशी कोणताही संबंध ठेवत नाही.
तर दुसरीकडे सोनाली आणि राजेंद्रची पुन्हा सुभाषरावांना कॉन्टॅक्ट करण्याची हिंमत होत नाही. Sasra Sun Marathi Goshta
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !