मित्रांनो आज आपण MLA full form आणि MLA बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
MLA Full Form
MLA Full Form आहे Member of Legislative Assembly.
MLA म्हणजेच विधानसभेचा सदस्य आमदार हा जिल्याच्या मतदारसंघातील मतदारांनी राज्याच्या विधानसभेसाठी निवडलेला त्यांचा प्रतिनिधी असतो.
राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून मतदार आपला एक प्रतिनिधी निवडतात त्यालाच आमदार म्हणतात. विधानसभेचा सदस्य म्हणजेच आमदाराचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत.
MLA विधानसभेचा सदस्य बनण्यासाठी पात्रता :
1. उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असावे.
3. उमेदवार राज्यातील कोणत्याही मतदारसंघाची मतदाता असणं आवश्यक आहे त्याशिवाय विधानसभा सदस्य बनता येत नाही.
4. उमेदवाराला कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवून 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली नसावी.
आमदाराची कामे काय असतात :
आमदार हा जनतेचा प्रतिनिधी असतो त्यामुळे तो मतदारसंघातील लोकांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेतो आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारपर्यंत पोहचवतो.
आपल्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी आमदार सरकारी साधनांचा वापर करून घेतो.
आमदार आपल्या मतदारसंघाच्या समस्या सरकारसमोर मांडतो आणि मतदारसंघाच्या विकासासाठी बजेटमधून निधी उपलब्ध करून देतो.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !