येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील अभिनेत्री दीप्ती केतकरच्या मुलीला पाहिलंत का ?

येऊ कशी तशी मी नांदायला

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत नलूची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर ही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर ही भूमिका चांगलीच गाजवली होती. मराठी मालिकांमध्ये तिने अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच तिने शेर शिवराज, पावनखिंड, सापळा या मराठी चित्रपटांमध्येही महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेत दीप्ती केतकर नलूच्या भूमिकेत दिसली होती तर तिची मुलगी स्वीटूच्या भूमिकेत अभिनेत्री अन्वीता फलटणकर होती. नलू आणि स्वीटू या मायलेकीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Dipti Ketkar Daughter
Dipti Ketkar Daughter

येऊ कशी तशी मी नांदायला

दीप्ती सोशल मीडियावरदेखील खूपच सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात राहते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर आपल्या खऱ्या आयुष्यातील मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने दिप्तीने आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर केलेत. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहलंय की,

तू भेटशी नव्याने मालिकेतील कलाकार

मला आणि सर्व प्रेमळ आईंना हॅपी मदर्स डे. आम्ही खूप नशीबवान आहोत. मनी माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप धन्यवाद.

Dipti Ketkar Daughter
Dipti Ketkar Daughter

Marathi Actress Dipti Ketkar Daughter  

दिप्तीने आपल्या मुलीसोबत शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. दीप्तीची मुलगी ही तिच्याइतकीच सुंदर दिसते. या दोघींना एकमेकींसोबत बघून फॅन्सना नलू आणि स्वीटूचीच आठवण झाली. फॅन्सनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत त्या दोघी मायलेकीच्या जोडीची स्तुती केलीय आणि मदर्स डेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Dipti Ketkar Daughter
Dipti Ketkar Daughter

सध्या अभिनेत्री दीप्ती केतकर ही सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी‘ या मालिकेत यामिनीची भूमिका साकारतेय. तिची ही भूमिका स्वार्थी, धूर्त आणि आव आणून जगणारी अशी आहे. प्रेक्षकांना तिची ही खलनायकी भूमिकासुद्धा अतिशय आवडतेय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top