Government Servant Wife Story सरकारी नोकरीवाली बायको हवी म्हणून त्याने…

Government Servant Wife Story

Government Servant Wife Story श्याम ठीकठाक पैसे कमवायचा. एक छोटीशी नोकरी करून तो सुखी होता. कारण त्याने स्वतःची योग्यता ओळखली होती. या नोकरीपेक्षा चांगली नोकरी आपल्याला मिळणार नाही. भरगच्च पगार मिळणार नाही. व्यवसाय आपण करू शकत नाही. आईबापाने काही कमवून ठेवलं नाही. हे सगळं त्याला माहीत होतं.

परंतु आपल्या आयुष्यातही स्थैर्य असावं, घरदार असावं. पैसा पाणी असावा. अशी त्याची इच्छा होती आणि जर हे मिळवायचं असेल, तर एखादी सरकारी नोकरीवाली बायको असायला हवी, हा विचार त्याने केला.

Government Servant Wife Story

तो जवळपास तीस वर्षांचा झाला होता आणि मागील पाच वर्षांपासून सरकारी नोकरी असणारीचं बायको हवी म्हणून मुलगी शोधत होता. परंतु त्याला स्वतःलाचं चांगली नोकरी नसल्यामुळे, स्वतःचं घरही नसल्यामुळे, त्याला काही लग्नासाठी मुलगी भेटत नव्हती. एक दिवस शामला वधु वर सुचक केंद्रातून फोन येतो आणि त्याला समजतं की, एका मुलीने त्याचा बायोडेटा शॉर्टलिस्ट केला आहे. या मुलीला सरकारी नोकरी आहे. ही बातमी ऐकून श्याम खूप खुश होतो आणि लगेचचं या मुलीबरोबर मीटिंग ठरवतो. Government Servant Wife Story

श्याम या मुलीला भेटण्यासाठी एका कॉफी शॉपमध्ये येतो. तर तेथे ही मुलगी रेश्मा आलेली असते. Government Servant Wife Story श्याम तिला खुश होतो कारण रेश्मा दिसायला सुंदर असते. श्याम आणि रेश्मा एकमेकांना हॅलो म्हणतात. तेव्हा रेश्मा श्यामला म्हणते, “पुढचं काही बोलण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे.” श्याम विचारतो, “कोणता प्रश्न ?” रेश्मा म्हणते, “तुमचं वय 30 वर्ष आणि माझं 40. 10 वर्षांनी मोठी आहे मी तुमच्यापेक्षा. तरीही तुम्ही माझ्याशी लग्न करायला का तयार आहात ?”

श्यामच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो म्हणतो, “खोटं नाही बोलणार मी. एकेक शब्द खरा सांगतो. Government Servant Wife Story मला चांगला पगार नाहीये. पैसे कमावण्याच्या बाबतीत या आयुष्यात जास्त काही करता येईल, असंही वाटत नाही. म्हणून सरकारी नोकरीवाली बायको भेटली, तर सगळं काही स्थिर होईल, असं मला वाटलं.

मागील पाच वर्षांपासून मुलगी शोधतोय. परंतु माझ्याकडेचं काही नाही, तर मग चांगल्या मुलींही मला लग्नाला होकार देत नाही. Government Servant Wife Story त्यामुळे आता तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तर मीही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आणि खरं सांगू, तर येथे येण्याआधी माझ्या मनात शंका होती की, 40 वर्षाची बाई कशी असेल, पण तुमच्याकडे पाहून नाही वाटत तुम्ही 40 वर्षाच्या असाल. 32-33 खूप झालं.”

रेश्मा हसू लागते. श्याम विचारतो, “हसायला काय झालं ?” तर रेश्मा म्हणते, “मला वाटलं तुम्ही काहीतरी डिप्लोमॅटिक उत्तर द्याल. Government Servant Wife Story परंतु तुमच्या एवढ खरं बोलणारा मुलगा आजपर्यंत नाही पाहिला मी. खूप खरं बोललात तुम्ही.” श्याम म्हणतो, “मी माणूसचं खरा आहे. एक शब्दही खोटा नाही माझ्या बोलण्यात, ना माझ्या वागण्यात. तुम्ही जर माझ्याशी लग्न करायला होकार दिला ना, तर आपण दोघे खूप सुखात राहू. हो थोड वयाचं अंतर असेल आपल्यात. पण घेऊ ऍडजेस्ट करून. तसेही नवरे बायकांपेक्षा लवकरचं ढगात जातात. त्यात काय एवढी काळजी करायची ?”

रेश्मा आणखीनचं जोरजोरात हसू लागते. सगळे या दोघांकडेचं पाहतात. शाम म्हणतो, “छान हसता तुम्ही, परंतु थोड्या जास्तच हसतात.” Government Servant Wife Story रेश्मा कसं कसं हसू कंट्रोल करते आणि म्हणते, “मी सुद्धा खरं बोलते. तुम्ही खूप आवडलात मला. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.” शामला खूप आनंद होतो आणि पुढील आठ दिवसांमध्ये हे दोघे कोर्ट मॅरेज करतात.

श्यामने इतक्या मोठ्या वयाच्या बाईशी लग्न केलं, त्यामुळे श्यामचे आई बाबा खूप चिडतात आणि ते या दोघांची सगळे संबंध तोडून टाकतात. Government Servant Wife Story तर रेशमाच्या आई-वडिलांनाही तिचा निर्णय काही योग्य वाटलेला नसतो. लग्नानंतर श्याम रेशमाच्याचं फ्लॅटवर शिफ्ट होतो. श्याम खरंच रेश्माशी खूप प्रेमाने वागतो. रेश्माला  समजतं की, श्याम खरंच एक चांगला माणूस आहे. पाहता पाहता या दोघांच्या लग्नाला तीन महिने उलटून जातात.

एक दिवस शाम त्याच्या ऑफिसमधून हाफ डे घेतो आणि विचार करतो की, “रेश्माला सरप्राईज देऊया. तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला भेटूया.” Government Servant Wife Story असा विचार करून तो रेशमाच्या ऑफिसमध्ये येतो. तेथे चौकशी करतो, तर त्याला समजतं की, रेश्मा या मागील आठ दिवसांपासून ऑफिसमधून दोन तास लवकर निघून जाते. श्यामला समजतचं नाही की, रेश्मा असं का करतेय.

श्याम घरी येतो आणि रेश्मा घरी आल्यानंतर तो रेश्माला म्हणतो, “काय गं रेश्मा, आजकाल तुझ्या ऑफिसमध्ये जास्त काम आहे की कमी आहे ?” Government Servant Wife Story रेश्मा म्हणते, “हो आजकाल खूप जास्त काम आहे मला. ऑफिसमध्ये पूर्णवेळ थांबावं लागतं. कधी कधी पंधरा-वीस मिनिटं, अर्धा तास जास्तही लागतो.” श्याम विचारतो, “मग कधी हाफ डे घेऊन कुठे जात नाही का, मैत्रिणीला वगैरे भेटायला ?”

रेश्मा म्हणते, “माझी इच्छा तर खूप आहे. परंतु मागील तीन चार महिन्यापासून एक दिवसही हाफ डे नाही घेतला मी. पूर्णवेळ ऑफिसमध्ये थांबते.” Government Servant Wife Story हे ऐकून श्यामला मोठा धक्काचं बसतो. रेश्मा सरळ सरळ खोटं बोलतेय, हे त्याच्या लक्षात येतं. परंतु आता तिला विचारलं, तर ती खरं सांगणार नाही. या विचाराने तो या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवतो.

दुसऱ्या दिवशी श्याम त्याच्या ऑफिसमधून पुन्हा एकदा हाफ डे घेतो आणि रेशमाच्या ऑफिसबाहेर पोहोचतो. रेश्मा ऑफिस सुटण्याच्या दोन तास आधी ऑफिस बाहेर पडते. श्याम तिचा पाठलाग करू लागतो. तिचा पाठलाग केल्यानंतर श्यामला मोठा धक्काचं बसतो. कारण रेश्मा चक्क त्या बायकांच्या वस्तीत जाते.

श्यामचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासचं बसत नाही. रेश्माला इतकी चांगली सरकारी नोकरी करता असताना, लग्न झालेलं असतानाही अशा वस्तीत का जाते, हे त्याला समजतचं नाही. तो खूप चिडतो. आताच्या आता तेथे जाऊन रेश्माला जाब विचारावा. तिच्या थोबाडीत मारावी. अशी त्याची इच्छा होते. परंतु त्या वस्तीत पाठ ठेवण्याची त्याला भीती वाटते आणि तो तेथून घरी निघून जातो

रेश्मा घरी येते. शाम ठरवतो की, आता तिला जाब विचारायचा. परंतु रेश्मा त्याच्याशी खूपचं प्रेमाने वागते. श्याम विचार करतो, नक्कीच त्याचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. ती एखाद्या सरकारी कामासाठी तेथे जाऊ शकते ना. उद्या पुन्हा एकदा रेश्माचा पाठलाग करायचा, असा विचार तो करतो आणि चौकशी करायची ठरवतो.

दुसऱ्या दिवशीही श्याम रेशमाच्या ऑफिसबाहेर येतो आणि रेश्मा नेहमीप्रमाणे दोन तास लवकर निघून त्या बायकांच्या वस्तीत जाते. Government Servant Wife Story शाम तिच्या मागे मागे जातो आणि तेथील एका माणसाला विचारतो, “ही बाई रोज येथे येते का ?” हा माणूस सांगतो, “हो ही बाई मागील पंधरा दिवसांपासून रोज येथे येते.” श्याम विचारतो, “ही बाई सरकारी नोकर आहे. एखादं सरकारी काम चालू आहे का या वस्तीत ?” हा माणूस सांगतो, “या वस्तीत कोणत सरकारी काम होत नाही, कोणतं काम होतं ते तुला माहितीये ना.”

श्यामला जबर धक्काचं बसतो आणि तो ठरवतो की, “आता काहीही झालं तरी रेश्माला याचा जाब विचारायचा.” संध्याकाळी रेश्मा Government Servant Wife Story घरी पोहोचते. तेव्हा श्याम तिच्याकडे खूप रागारागाने पाहत असतो. रेश्माला हे समजतं आणि ती विचारते, “काय झालंय श्याम, माझ्याकडे असा का पाहतोयस ?”

श्याम म्हणतो, “जेव्हा मला कळलं होतं की, तू चाळीस वर्षांची आहेस. तेव्हाच मला समजायला हवं होतं की, तुझ्यासारख्या बाईच्या इच्छा Government Servant Wife Story पूर्ण झाल्या नसतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तू कोणताही थराला जाऊ शकतेस. मीच मूर्ख की, तुझ्याशी लग्न केलं.” हे ऐकून रेशमाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती म्हणते, “तुझं डोकं बिकं फिरलय का ? काय बोलतोयस कळतंय का तुला ?”

श्याम म्हणतो, “हो डोकं फिरलय माझं. तुला त्या वस्तीत जाताना पाहिलं मी. मागील पंधरा दिवसांपासून जातेस. लग्न झाल्यावर तुझ्या Government Servant Wife Story इच्छा पूर्ण नाही झाल्या का ? नाहीतर तुला आधीपासूनची सवय असेल.” रेशमाला समजतं की, शामने तिला त्या वस्तीत जाताना पाहिलंय.

रेश्मा एक दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, “शाम तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. यानंतर एक शब्दही बोलू नको. आधी मला काय बोलायचंय, Government Servant Wife Story तुला काय दाखवायचंय, ते पाहून हे आणि मगचं बोल.” असं म्हणून रेश्मा श्यामचा हात पकडते आणि त्याला त्या वस्तीत घेऊन जाते.

तेथे गेल्यावर ती खूप सार्‍या लहान मुलांना बोलावून घेते आणि म्हणते, “मुलांनो मी रोज या वस्तीत का येते, हे या काकांना सांगा.” एक मुलगी पुढे येऊन म्हणते, “काका ही मावशी आम्हाला रोज शिकवायला येते. आम्ही कोणी शाळेत जात नाही ना, म्हणून ती आम्हाला शिकवते.”

आजी आजोबाची दुःखद गोष्ट

हे ऐकून शामला मोठा धक्काचं बसतो. तो रेशमाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागतो. तेव्हा रेश्मा सांगते, “पंधरा दिवसांपूर्वी या मुलीची आई आमच्या ऑफिसमध्ये आली होती, तिला तिची सरकारी कागदपत्र तयार करून घ्यायची होती. त्यांच्याबरोबर ही मुलगीही होती. त्या दोघींनाही स्वतःच नावही लिहिता येत नव्हतं. मी विचारपूस केली, तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे कोणीही शिकत नाही. परंतु या मुलीच्या आईला तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं. चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं.

म्हणून मी ठरवलं की, रोज दोन तास यांना शिकवायचं. श्याम मी तुला सांगणारचं होते. परंतु आधी मला थोडी क्लॅरिटी मिळायला हवी होती Government Servant Wife Story आणि मला भीती वाटली की, तू काय विचार करशील म्हणून तुला नाही सांगितलं.”

श्यामला खूप वाईट वाटतं आणि तो रेश्मासमोर हात जोडून म्हणतो, “रेश्मा मला माफ कर. महान आहेस तू आणि मी किती घाणेरडा विचार केला Government Servant Wife Story तुझ्याबद्दल. मी तुला सरप्राईज देण्यासाठी तुझ्या ऑफिसमध्ये आलो, तर मला तेथे कळलं की, तू रोज दोन तास लवकर निघून जाते आणि मी तुला घरी विचारलं तर तू खोटं सांगितलं की, ऑफिसमध्ये असते. म्हणून मी तुझा पाठलाग केला आणि मग तुला येथे येताना पाहून हा सगळा विचार केला.”

रेश्मा म्हणते, “जाऊ दे शाम. तुझी काही चुक नाहीये. तुला जे दिसलं, तू तसा विचार केला. तुझ्या जागी दुसरा कोणीही असता, तर त्यानेही असाचं विचार केला असता.” Government Servant Wife Story शाम म्हणतो, “रेश्मा तू खूप चांगलं काम करतेस. आपण एखादी सेवाभावी संस्था सुरू करूया. या मुलांना बाहेरच्या जगात सन्मानाने जगता यावं, यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. आपण त्यासाठी त्यांना मदत करू.”

रेश्मा म्हणते, “अगदी माझ्याव मनातलं बोललास. खरंच तू माझा सोलमेट आहे. आपल्या दोघांचे विचार जुळतात.” श्याम आणि रेश्मा त्यादिवशी एक चांगल्या कामाला सुरुवात करतात आणि त्यांचा संसारही सुखाचा होतो.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top