अभिनेत्री अमृता बनेला हनिमूनला गेल्यावर पतीकडून वाढदिवसाचं मिळालं खास गिफ्ट

अभिनेत्री अमृता बने वाढदिवस  

कन्यादान‘ मालिकेत अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांनी साकारलेल्या राणा आणि वृंदा या भूमिका खूप गाजल्या. या दरम्यान मालिकेच्या सेटवरच त्यांची ओळख झाली. मग त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मागील महिन्यात 21 एप्रिल 2024 रोजी शुभंकर आणि अमृताने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाले होते. आता हे दोघे लग्नानंतर व्हिएतनामला हनिमूनसाठी गेले आहेत. त्यांनी आपल्या फिरण्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री अमृता बने वाढदिवस  

त्यातच आज अमृताचा वाढदिवस आहे त्यासाठी शुभंकरने तिला खास सरप्राईज दिलंय. व्हिएतनाममध्ये शुभंकरने अमृताचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. त्याने संपूर्ण रूम खूप सुंदर डेकोरेट केली होती. फुग्यांनी रूम खूप छान सजवली होती. शुभंकरने आपल्या वाढदिवशी दिलेलं सरप्राईज पाहून अमृता आश्चर्यचकित झाली होती आणि तिला खूप आनंद झाला होता. अमृताच्या बर्थडेसाठी आणलेला केकसुद्धा खूप छान होता. तिने हा केक कापून आपला बर्थडे सेलिब्रेट केला.

Marathi Actress Amruta Bane Biking Photos Viral
अभिनेत्री अमृता बने वाढदिवस  

अमृताने आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय आणि कॅप्शनमध्ये लिहलंय की, तो आणि माझा बर्थडे…परफेक्ट हनिमून कॉम्बो

अमृताने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक फॅन्सनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Amruta Bane Birthday

अभिनेत्री अमृता बनेने वैजू नंबर 1, रंग माझा वेगळा, कन्यादान, सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर शुभंकरनेही कन्यादान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारलीय. याशिवाय त्याने धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, चौक, चिट्ठी या चित्रपटात काम केलंय. तो लवकरच विकी कौशलच्या छावा चित्रपटातही दिसणार आहे.

अभिनेत्री अमृता बने वाढदिवस  
अभिनेत्री अमृता बने वाढदिवस  

अमृता आणि शुभंकर हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या जोडीचे एकमेकांसोबतचे फोटो फॅन्स खूप लाईक करतात. आता ते व्हिएतनामला फिरायला गेलेत त्याचे आणखी फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. 

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top