Grand Parents Sad Story “सुनबाई अगं सुनबाई”, अशी हाक मारत हिराबाई त्यांच्या खोली बाहेर येतात. हिराबाईला पाहताचं त्यांची सून अरुंधती धावत येते आणि म्हणते, “सासुबाई किती वेळेस सांगितलंय तुम्हाला, “असं रूमबाहेर नाही यायचं. यांची मोठमोठ्या क्लायंटबरोबर मीटिंग सुरू असते. तुम्ही त्यांना डिस्टर्ब करताय. जा गुपचूप आतमध्ये.”
हिराबाई थरथरत्या आवाजात म्हणतात, “मला आठवतंय सुनबाई. मला नव्हतं यायचं बाहेर. पण खूप भूक लागलीये. सकाळचा चहा दिल्यानंतर तू नाश्ताही दिला नाहीस आणि दुपारचं जेवणही दिलं नाही. दुपारची रात्र झालीये. खूप भूक लागली आहे, आम्हाला दोघांना.”
Grand Parents Sad Story
अरुंधती चिडून म्हणते, “तुम्हाला काय म्हणायचंय, मी जाणून-बुजून असं केलं का ? सकाळपासून घरामध्ये मीटिंग सुरू आहे. पाहुणेरावळे येत आहेत, नाही लक्षात राहीलं त्या गडबडीमध्ये. जा तुमच्या खोलीत, आणून देते तुम्हाला जेवण, जा लवकर जा.”
असं म्हणून अरुंधती रागारागाने किचनमध्ये जाते. तर हिराबाई त्यांच्या खोलीत जातात. हिराबाईचा नवरा निवृत्तीराव तेथे बसलेले असतात. हिराबाईला पाहून ते विचारतात, “काय झालं गं हिरे, दिलं का जेवण त्यांनी ?” हिराबाई सांगतात, “हो मी सुनबाईला म्हटलं, खूप भूक लागलीये, तर ती म्हणाली आणून देते.”
तेवढ्यात अरुंधती तिथे येते. ती हिराबाई, निवृत्तीरावासमोर दोन ताट आपटते आणि म्हणते, Grand Parents Sad Story “खा आता किती खायचं ते. खा खा सुटलीये म्हातार्यांना.” असं म्हणून ती रागारागाने निघून जाते. हिराबाई आणि निवृत्तीराव ताटामध्ये पाहतात, तर एक सुकी भाकरी आणि लोणचं ताटामध्ये असतं.
हे पाहून या दोघांनाही खूप वाईट वाटतं. निवृत्तीराव हिराबाईला म्हणतात, “सुकी भाकरी आणि Grand Parents Sad Story लोणचं दिलंय. तुला दातांनी नीट चावताही येत नाही. तू हे कसं खाणार ?” हिराबाई म्हणतात, “माझं ठीक आहे, तुम्हाला तर दातचं नाहीये, तुम्ही कसं खाणार ? सुनबाईला हे सगळं माहिती आहे ना, आपल्यासाठी खिचडी करायची, तर तिने हे आणून दिलं. जाणून-बुजून करते ती सगळं.”
निवृत्तीराव म्हणतात, “जाऊ दे, सुकी भाकरी आहे ना. ती चांगली कुस्करून घेऊ आणि त्यामध्ये Grand Parents Sad Story पाणी टाकू. म्हणजे खाता येईल आपल्या दोघांना.” हिराबाई म्हणतात, “हा ही चांगली कल्पना आहे.” हे दोघे भाकरी कूस्करतात. त्यामध्ये पाणी टाकतात आणि काला करून खातात. या दोघांच्या चेहऱ्यावर पोट भरल्याचं समाधान तर असतं. पण डोळ्यात अश्रूही असतात.
निवृत्तीराव आणि हिराबाई या दोघांचं कुटुंब खूप प्रतिष्ठित होतं. या दोघांनीही समाजकार्य केलं, शेती Grand Parents Sad Story सांभाळली, चांगलं मोठं घर बांधलं. त्यानंतर निवृत्तीरावांचा मुलगा प्रकाशने एक मोठा व्यवसाय उभा केला. प्रकाशचा मुलगा सोहम हा एक आयएएस ऑफिसर होता, कलेक्टर होता.
परंतु जसे जसे निवृत्तीराव आणि हिराबाई यांचं वय वाढत गेलं, तशी तशी सर्वांनाचं त्यांची अडचण वाटू लागली Grand Parents Sad Story आणि मग दोघांना त्यांच्या खोलीतच बंद केलं गेलं. त्यांना घराच्या हॉलमध्येही यायची परवानगी नव्हती. रूममध्ये तुमची सगळी सोय करू, असं त्यांना सांगितलं गेलं. परंतु त्यांची सून अरुंधती त्यांना नीट दोन वेळेचं जेवायलाही देत नव्हती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा प्रकाश आणि सोहम गप्प बसून होते. ते याबद्दल काहीही बोलत नव्हते.
निवृत्तीराव आणि हिराबाई या दोघांनी त्यांच्या मुलाला आणि नातवाला याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, तर Grand Parents Sad Story आम्हाला आधीचं कामाचं खूप टेन्शन आहे. आमचं डोकं नका खाऊ. असं म्हणून या दोघांनाही त्यांना उडवून लावलं.
निवृत्ती राव आणि हिराबाई मागील अनेक महिन्यांपासून हा त्रास सहन करत होते. कधी कधी तर त्यांना दोन दोन दिवस काही खायला प्यायला मिळत नव्हतं. Grand Parents Sad Story अरुंधती त्यांना उपाशीचं मारत होती. आणि मग त्यानंतर एकदा असं घडलं की, सलग चार दिवस अरुंधतीने त्यांना काही खायला प्यायला दिलं नाही. साधा चहाही आणून दिला नाही. या दोघांची तब्येत खूप खराब झाली.
चार दिवस उपासमार झाल्याने त्यांच्या शरीरात त्राण राहिला नव्हता. तेव्हा हिराबाई निवृत्तीरावांना म्हणतात, “अहो चार दिवस झाले, काही खाल्लं पिल्ल नाहीये. Grand Parents Sad Story बाहेर जाऊन सुनबाईला म्हणू का, देईल ती काहीतर खायला.”
निवृत्तीराव म्हणतात, “नको जाऊ. बस झाली ही लाचारी. ती नाही देत ना खायला प्यायला, मग आपण का तिच्यासमोर भीक मागायची. आपलं घर आहे हे आणि Grand Parents Sad Story आता ती या घरची मालकीण म्हणून बसलीये. तिच्यासमोर हात पसरण मला नाही आवडत. त्यापेक्षा जीव दिलेला बरा.”
हिराबाई म्हणतात,”खरं बोलताय तुम्ही. तिच्यासमोर किती भिक मागायची. बस झाला आता. त्यापेक्षा आपण दोघांनीही जीव देऊ एकत्र.”
निवृत्तीराव म्हणतात, “आत्महत्या करणं चुकीचं आहे, परंतु अशा लाचारीफ जगण्यापेक्षा, ते चांगलं. आपण आपल्या शेतातळ्यात जीव देऊ.” Grand Parents Sad Story हिराबाई म्हणतात, “एकदम बरोबर बोलताय तुम्ही.” आणि हे दोघेही शेताकडे जायला निघतात.
Mother Daughter Motivational Marathi Story
निवृत्तीराव आणि हिराबाई कसेबसे त्यांच्या शेततळ्याजवळ पोहोचतात. तेव्हा आपली शेती पाहून या दोघांच्याही डोळ्यात पाणी येततं. निवृत्तीराव म्हणतात, Grand Parents Sad Story “आपलं संपूर्ण आयुष्य येथेच कष्ट करण्यात गेलं.” हिराबाईला म्हणतात, “किती आठवणी आहेत ना, या शेताशी आपल्या. आता इथेचं आपला शेवट होईल. चांगला निर्णय घेतला आहे आपण.”
हे दोघे एकमेकांचा हात हातात घेतात. निवृत्तीराव म्हणतात, “आयुष्याच्या सुरुवातीपासून साथ दिलीस तू मला, आता शेवटीही दे.” हे दोघे एकमेकांकडे डोळे भरून पाहतात आणि या शेततळ्यात उडी मारतात.
शेतात काम करणारा एक गडी हे सगळं पाहतो आणि आजूबाजूच्या सगळ्या शेतमजुरांना आवाज देऊ लागतो, “अरे आपले मोठे मालक आणि मालकीण शेततळ्यात बुडाले. लवकर या.” या मजुराचा आवाज ऐकून सगळे धावत पळत येथे येतात आणि तळ्यात उड्या मारतात. निवृत्तीराव आणि हिराबाई या दोघांनाही ते पाण्याबाहेर काढतात.
निवृत्ती राव आणि हिराबाई या दोघांच्याही नाका तोंडात पाणी गेलेलं असतं. शेतमजूर त्यांना लगेचचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. दोघेही बेशुद्ध झालेले असतात. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते की, एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातील दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सारे लोक हॉस्पिटल बाहेर जमतात. ज्यांना या दोघांनी आयुष्यभर मदत केलेली असते आणि पत्रकारही जमतात
अरुंधती प्रकाश आणि सोहम हे तिघेही हॉस्पिटलमध्ये येतात. प्रकाश अरुंधतीवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, “हे सगळं तुझ्यामुळे झालंय. चार दिवसांपासून त्यांना जेवायला नाही दिलं. मग ते असं नाही करणार तर काय करणार ?” अरुंधती म्हणते, “आता माझ्यामागे कामाचा व्यापचं एवढा आहे की, नाही लक्षात राहिलं.” प्रकाश चिडून म्हणतो, “मग चार दिवस तू पण उपाशी राहिली का ?” अरुंधतीला काय उत्तर द्यावं, हे समजत नाही आणि ती गप्प बसते.
सोहम म्हणतो, “बाबा जर ही बातमी बाहेर गेली आणि सर्वांना सत्य समजलं, तर तुमच्याही बिझनेसचे बारा वाजतील आणि Grand Parents Sad Story मलाही सस्पेंड करतील.” प्रकाश म्हणतो, “घाबरू नकोस, असं काहीही होणार नाही. मी त्या दोघांना खरं कोणाला सांगून देणार नाही.”
इकडे डॉक्टर निवृत्तीराव आणि हिराबाईवर उपचार करतात. या दोघांनाही शुद्ध येते. तेव्हा आपण जिवंत आहोत, हे पाहून या Grand Parents Sad Story दोघांनाही खूप वाईट वाटतं आणि ते डॉक्टरांना म्हणतात, “डॉक्टरसाहेब का वाचवलं आम्हाला ? जाऊ द्यायचं ना देवाघरी. तेथे आम्ही आनंदी राहिलो असतो.”
डॉक्टर या दोघांना म्हणतो, “तुम्ही या वयात आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला ? असं कोणतं दुःख आहे तुम्हाला ?” हिराबाई म्हणतात, Grand Parents Sad Story “असं म्हणतात की, डॉक्टरांपासून काही लपवायचं नसतं. त्यामुळे तुम्हाला सर्व सत्य सांगते,” असं म्हणून हिराबाई या सगळ सत्य डॉक्टरला सांगतात.
सत्य ऐकून डॉक्टरच्याही डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, “खरं आहे, कलियुग आले कलियुग. आजी आजोबा तुम्हाला एक सल्ला देतो, Grand Parents Sad Story अशा लोकांना सोडू नका. चांगला धडा शिकवा. तुमचा आदर्श घेऊन तुमच्यासारख्या काही लोकांची आयुष्य सुधारली, तर बरं होईल. बाहेर खूप सारे पत्रकार आले आहेत. त्यांना तुमची खरी गोष्ट सांगा. म्हणजे त्यांना चांगला धडा मिळेल.
निवृत्तीराव आणि हिराबाईला ही गोष्ट पटते आणि ते म्हणतात, “खरं बोलताय तुम्ही डॉक्टर साहेब, आमच्या मुलांना जर आम्ही धडा शिकवला, Grand Parents Sad Story तर त्यांच्यासारख्या अनेकांना वचक बसेल, ते घाबरतील आणि आई बापाशी असं नाही वागणार.”
डॉक्टर बाहेर येऊन सर्वांना सांगतात की, “निवृत्तीराव आणि हिराबाई शुद्धीत आले आहेत. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाहीये.” प्रकाश आणि सोहम अरुंधती बरोबर आतमध्ये जाऊ लागतात. Grand Parents Sad Story तर डॉक्टर म्हणतात, “त्यांना तुम्हाला नाही भेटायचं, तर पत्रकारांना भेटायचंय.” हे ऐकून या तिघांच्या पायाखालची जमीनचं सरकते.
पत्रकार लगेचं आतमध्ये पळतात. पत्रकार या दोघांना प्रश्न विचारतात की, “या वयात तुम्ही खरंच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का ? आणि केला तर का केला ?” निवृत्तीराव आणि हिराबाई एकेक शब्द सत्य सांगतात. त्यांचे व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होतात आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत. लोक खूप चिडतात. स्वतःच्या आई बापाला कोण असं वागू शकत, हे नराधम आहेत. राक्षस आहेत, यांना शिक्षा करा. अशी सगळीकडे प्रतिक्रिया येते.
या प्रकरणाबद्दल सरकारी लेव्हलवर चर्चा होते आणि सोहमला त्याच्या नोकरीवरून बडतर्फ केलं जातं.Grand Parents Sad Story तर दुसरीकडे प्रकाशच्या हातून मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट जातात आणि त्याचा बिजनेस डबघाईला येतो. अरुंधतीला चार चौघात जायला नाक राहत नाही. सगळे तिच्यावर थू थू करतात.
त्या दिवसानंतर निवृत्तीराव आणि हिराबाई कधी त्यांच्या घरी परत जात नाही. हे दोघे एका वृद्धाश्रमात जाऊन आनंदात राहतात Grand Parents Sad Story आणि पुन्हा कधीही त्यांच्या मुलाचा, सुनबाईचा आणि नातवाचा विचार करत नाहीत.
तर इकडे प्रकाश, सोहम आणि अरुंधतीला चांगलीचं अद्दल घडलेली असते.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !