कार्तिकी गायकवाडने दिला गोंडस बाळाला जन्म. मनोरंजन विश्वातून एक खूपचं आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड आई बनलीये. तिने सोशल मीडियावर ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. कार्तिकी गायकवाडने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सोशल मीडियावर आपल्या बाळाचा आणि स्वतःच्या हातांचा फोटो शेअर करत “इट्स अ बॉय, मी आज खूप आनंदी आहे. आमच्या घरी एक गोंडस बाळ आलंय” अशी बातमी तिने शेअर केली आहे.
कार्तिकी गायकवाडने दिला गोंडस बाळाला जन्म
कार्तिकी गायकवाड आणि रोहित पिसे या दोघांचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपली गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणाचे फोटो सुद्धा सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले होते.
त्यामुळे कार्तिकीसह तिच्या फॅन्सला सुद्धा कार्तिकीचं बाळ या जगात कधी येतंय, तिला मुलगा होणार की मुलगी ? याबद्दल खूप उत्सुकता होती आणि आता तिने ही गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. कार्तिकीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल होतेय. सगळे फॅन्स आणि मराठी सेलिब्रिटी तिला सोशल मीडियावर बाळासाठी शुभेच्छा देत आहेत.
कार्तिकी गायकवाड प्रसिद्ध मराठी गायिका आहे. झी मराठीवरील लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात तिने सहभाग घेतला होता आणि हा कार्यक्रम जिंकला होता. तेव्हा तिच्या गाण्याच्या सगळेचं प्रेमात पडले होते.
लिटल चॅम्पनंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय झाली. तिने अनेक स्टेज शोज केले. यातून तिची प्रसिद्धी वाढतचं गेली. मोठी झाल्यानंतर तिने लिटल चॅम्पच्या एका सिजनमध्ये जज म्हणून काम केलं, जिथे ती स्पर्धक होती.
कार्तिक गायकवाड ही सोशल मीडियावर सुद्धा चांगलीचं ऍक्टिव्ह असते. ती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलचे फोटो आणि व्हिडिओज नेहमी फॅन्सबरोबर शेअर करत असते.
मग तिने घेतलेलं नवीन घर असो किंवा गाडी. आई बाबांना दिलेलं सरप्राईज असो किंवा कामाबद्दलची न्यूज. ती नेहमी आपल्या फ्रेंड्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते आणि आता तिच्या या गुडन्यूज नंतर तर सगळे फॅन्स खूपचं एक्साईटेड झाले आहेत आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
आपण सुद्धा कार्तिकी गायकवाडला तिच्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. अशाचं नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !