प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड आई बनलीये.

कार्तिकी गायकवाडने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

आपल्या बाळाचा आणि स्वतःच्या हातांचा फोटो शेअर करत "इट्स अ बॉय, मी आज खूप आनंदी आहे

आमच्या घरी एक गोंडस बाळ आलंय" अशी बातमी तिने शेअर केली आहे.

कार्तिकी गायकवाड आणि रोहित पिसे या दोघांचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं.

कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणाचे फोटो सुद्धा सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले होते.

झी मराठीवरील लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात तिने सहभाग घेतला होता

लिटल चॅम्पनंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय झाली.

मोठी झाल्यानंतर तिने लिटल चॅम्पच्या एका सिजनमध्ये जज म्हणून काम केलं, जिथे ती स्पर्धक होती.

आपणही तिला बाळासाठी शुभेच्छा देऊयात.