लाखात एक आमचा दादा मालिका लवकरचं झी मराठीवर सुरू होतेय. या मालिकेतून आपल्या सर्वांचा आवडता अज्या म्हणजेचं नीतीश चव्हाण टीव्ही विश्वात कमबॅक करतोय.
अक्षय तृतीये च्या दिवशी 10 मे ला या मालिकेचा जबरदस्त प्रोमो टीव्हीवर शेअर करण्यात आला होता. तेव्हा सगळेचं खूप एक्साईटेड झालेले. परंतु या मालिकेच्या प्रोमोत फक्त नितीश चव्हाणचं दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त या मालिकेत कोण कोण असेल, याबद्दल माहिती अजून समोर आली नव्हती. पण आता त्याबद्दल मोठी बातमी समोर येतेय.
लाखात एक आमचा दादा
लागिर झालं जी मालिकेत टॅलेंटची भूमिका साकारणारा अभिनेता महेश जाधव या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. परंतु नितेश चव्हाणची हीरोइन कोण असणार ? त्याच्याबरोबर मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार ? याबद्दल खूप उत्सुकता होती आणि आता महत्त्वाची माहिती समोर येतेय.
राजा राणीची गं जोडी आणि मन झालं बाजींद या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता खरात लाखात एक आमचा दादा मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.
या दोघांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी एक रील आणि पोस्ट शेअर केली होती. यानंतर नीतीश चव्हाण आणि श्वेता खरात मध्ये अफेअर सुरू आहे, अशा बातम्या आल्या होत्या. परंतु या सगळ्या बातम्या अफवा असल्याचं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र ते एकत्र काम करत आहेत.
Actress Shweta Kharat In Mann Jhala Bajinda
श्वेता खरातने राजा राणीची गं जोडी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडलेली. परंतु ही सहअभिनेत्रीची भूमिका होती. त्यानंतर तिला झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली आणि ती सर्वांची लाडकी बनली.
मन झालं बाजींद मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर ती सन मराठीवरील सुंदरा या मालिकेत दिसली होती. तसेच तिने अनेक अल्बममध्येही काम केलं. ती सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असते.
लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे आणि प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर तुम्हाला नितीश चव्हाण आणि श्वेता खरातची जोडी पाहायला आवडेल का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !