अभिनेता चेतन वडनेरेची आई वयाच्या पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली

अभिनेता चेतन वडनेरेची आई

अभिनेता चेतन वडनेरेची आई वयाच्या पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली. अभिनेता चेतन वडनेरे हा ‘ठिपक्यांची रांगोळी‘ मालिकेतील शशांक या भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाला. त्याने साकारलेली शशांकची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत.

पण चेतन सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतो आणि आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहतो. तो नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कामाबद्दलचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.

अभिनेता चेतन वडनेरेची आई वयाच्या पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली

यासोबतच काही दिवसांपूर्वी चेतन वडनेरेने ऋतुजा धारपशी लग्न केलं. त्यांचं लग्न खूपच थाटामाटात पार पडलं. त्याने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. 

आता अभिनेता चेतन वडनेरेची आई आईला दुचाकी चालवायला शिकवली आहे. वयाच्या पन्नाशीनंतर त्याची आई दुचाकी चालवायला शिकलीय. त्याने आई दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ शेअर केलाय आणि याबद्दल माहिती देण्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहलीय. त्यात त्याने आईला मातृदिनाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

Thipkyanchi Rangoli Fame Actor Chetan Vadnere Got Married
अभिनेता चेतन वडनेरेची आई

चेतनने या पोस्टमध्ये लिहलंय की,

माझी आई आत्ता पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली. अजून चार चाकी चालवणं बाकी आहे, सुरुवात मात्र दुचाकीने केली आहे. खरं तर जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा जवळ गाडी नव्हती आणि आता गाडी आहे तर शिकण्याचं वय गेलं असं तिला उगाच वाटत होतं पण शिकायला वयाची काही अट नसते. आपल्या आयांच्या अनेक आवडीनिवडी, नवीन काहीतरी शिकणं- फिरणं या गोष्टी त्या कायम पुढे ढकलत असतात, नंतर करू – नंतर करू असं म्हणत म्हणत त्या करायच्या राहून जातात. तुमच्या आईची एखादी इच्छा, आवड असेल तर त्यांना त्या जोपासायला सांगा. कसं आहे वेळ निघत नसतो तो काढावा लागतो.
Happy mother’s day ( खरंतर हे Day’s पाळणं मला पटत नाही, मला उगाच ते फार औपचारिक वाटतं.)
तरी हा व्हिडिओ टाकण्यासाठी या दिवसाचं औचित्य साधलं बास.

अभिनेता चेतन वडनेरेने केलं धुमधडाक्यात केलं लग्न

चेतनने या शब्दात आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याच्या या पोस्टवर फॅन्सनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत चेतनचं अभिनंदन केलंय आणि आईला नवीन काहीतरी शिकायला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचं खूप कौतुक केलं आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top