आजकाल वाढत्या मानवी वस्तीमुळे माणसांच्या वस्तीत बिबट्या घुसण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत

असाच एक प्रकार लोकप्रिय मराठी मालिकेच्या सेटवरही घडला आहे.

सन मराठी वाहिनीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेच्या सेटवरही मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याने प्रवेश केला होता.

या मालिकेचा सेट मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये लावण्यात आला आहे.

नुकतेच या मालिकेचे 400 भाग पूर्ण झाले त्यामुळे सेटवर त्याबद्दल जंगी सेलिब्रेशनही करण्यात आलं होतं

तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला होता.

बिबट्या या मालिकेच्या सेटवर खूप वेळ मुक्तपणे संचार करत होता.

हे सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

सुदैवाने या मालिकेच्या सेटवर कुठलीही वाईट घटना घडली नाही.

याआधीही गोरेगाव फिल्मसिटीमधील दुसऱ्या अनेक मालिकांच्या सेटवर बिबट्याला पाहिलं गेलं आहे.