या लोकप्रिय मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसल्याने खळबळ

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या. आजकाल वाढत्या मानवी वस्तीमुळे माणसांच्या वस्तीत बिबट्या घुसण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण दिसून येतं. हे वन्य प्राणी अनेकदा खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधात माणसांच्या वस्तीत येत असतात.

असाच एक प्रकार लोकप्रिय मराठी मालिकेच्या सेटवरही घडला आहे. नुकताच सन मराठी वाहिनीवरील ‘प्रेमास रंग यावे’ या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या ने प्रवेश केला होता.

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या

प्रेमास रंग यावे‘ या मालिकेचा सेट मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये लावण्यात आला आहे. इथेच या मालिकेचं शूटिंग करण्यात येतं. नुकतेच या मालिकेचे 400 भाग पूर्ण झाले त्यामुळे सेटवर त्याबद्दल जंगी सेलिब्रेशनही करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम हजर होती.

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या

तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला होता. सगळीकडे भीतीचं वातावरण झालं होतं. मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या खूप वेळ मुक्तपणे संचार करत होता.
हे सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

सुदैवाने या मालिकेच्या सेटवर कुठलीही वाईट घटना घडली नाही.

Bibtya On Marathi Serial Set  

याआधीही गोरेगाव फिल्मसिटीमधील दुसऱ्या अनेक मालिकांच्या सेटवर बिबट्याला पाहिलं गेलं आहे. त्यावेळी त्या मालिकांच्या सेटवर लोकांची घाबरगुंडी उडाली होती. दिवसा किंवा रात्री बिबट्याची दहशत असतेच. गोरेगाव भागात अनेकवेळा बिबट्या फिरताना दिसत असतात.

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या

‘प्रेमास रंग यावे’ मालिकेच्या सेटवर 400 भागांचं सेलिब्रेशन सुरू असताना बिबट्या घुसला होता त्यामुळे या सेलिब्रेशनला बिबट्याने सुद्धा हजेरी लावली अशी चेष्टा मालिकेच्या टीमने केली.

सुदैवाने मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या ने कोणावरही हल्ला केला नाही, पण आजकाल अशा घटनांमध्ये भरपूर वाढ झाली आहे त्यामुळे आधीपासूनच योग्य ती सुरक्षेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top