हार्दिक जोशीने पत्नी अक्षया देवधरचा वाढदिवस केला धुमधडाक्यात साजरा

अक्षय देवधरचा वाढदिवस

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरने ‘तुझ्यात जीव रंगला‘ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडी प्रेक्षकांनी खूपच पसंत केली होती. अक्षया देवधरचा वाढदिवस नुकताच झाला. त्यांच्या जोडीला आणि मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं होतं. पण त्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षक त्यांच्या जोडीला खूप मिस करत होते.

त्यानंतर हार्दिक आणि अक्षयाने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवशी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्काच बसला होता.

अक्षय देवधरचा वाढदिवस
अक्षय देवधरचा वाढदिवस

अक्षया देवधरचा वाढदिवस 

पुढे डिसेंबर 2022 मध्ये हार्दिक आणि अक्षयाने लग्न केलं. त्यांच्या लग्नाला मराठीतील अनेक कलाकार उपस्थित होते. ते दोघेही सुखाने संसार करत आहेत. या दोघांना पुन्हा सोबत पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

हार्दिक आणि अक्षया दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. नुकताच अक्षया देवधरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अक्षयाने सुंदर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. हार्दिकने पत्नीच्या वाढदिवसासाठी घराची सजावटदेखील केली होती आणि तिच्या वयाचा क्रमांक 30 असलेल्या डिझाइनचा केक आणला होता तोच अक्षयाने कट केला.

अक्षय देवधरचा वाढदिवस
अक्षय देवधरचा वाढदिवस

Akshaya Deodhar Birthday Celebration  

हार्दिकने या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत आणि त्यासोबत एक पोस्टसुद्धा शेअर केलीय.

या पोस्टमध्ये त्याने लिहलंय की,
माझ्या अद्भुत पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस. तू माझ्या बाजूला नसशील अशा एकही दिवसाची मी कल्पना करू शकत नाही. मी आशा करतो की हे पुढील वर्ष तुझ्यासाठी अनेक नवनवीन रोमांच घेऊन येईल. हॅपी बर्थडे माय लाईफ पार्टनर अहा.

हार्दिक जोशी

हार्दिकने आपली पत्नी अक्षयाला या शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक फॅन्सनी आणि मराठी कलाकारांनी कमेंट्स करत अक्षयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top