PM SHREE Yojana 2024
PM SHREE Yojana 2024 कोणत्याही देशाचं उज्वल भविष्य घडवायचं असेल, तर त्या देशातील तरुण पिढी शिक्षित असायला हवी. फक्त देशचं नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी, सोनेरी बनवण्यासाठी शिक्षण सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनचं म्हटलं गेलंय की, पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया.
मग आपल्या देशातील तरुण पिढीला चांगलं वाढवण्यासाठी, संस्कारी बनवण्यासाठी त्यांचं सोनेरी भविष्य घडवण्यासाठी शाळांची सर्वात जास्त गरज आहे. शाळा जेवढ्या चांगल्या असतील, त्या मुलांना जेवढं चांगलं शिकवतील, तेवढंच देशातील मुलं कर्तबगार बनतील, या देशाचे भविष्य उज्वल असेल.
परंतु आपल्या देशामध्ये सध्या जे शिक्षणाचं खाजगीकरण होतंय, त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्या शिक्षणामध्ये एक खूप मोठी दरी निर्माण होतेय. एकीकडे श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांची मुलं प्रायव्हेट शाळांमध्ये शिकत आहेत. जेथे भरमसाठ फी असते. या प्रायव्हेट शाळा प्रत्येक गोष्टीत सरकारी शाळांपेक्षा वरचढ असतात. तेथील शिक्षणपद्धती, शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल ज्या फॅसिलिटी असतात, त्या सरकारी शाळांपेक्षा खूप उच्च दर्जाच्या असतात.
तर दुसरीकडे आपल्या देशातील सरकारी शाळांचा दर्जा मागील काही वर्षांमध्ये, मागील दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात ढासळला आहे, यातही शंका नाही. या सरकारी शाळांमध्ये फक्त गरिबांचीच मुलं शिकतात. त्यामुळे त्यांच्या सोनेरी भविष्यात अडचणी येऊ शकतात.
हीच गोष्ट लक्षात ठेवून भारत सरकारने पीएम श्री योजना या नावाची एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत देशातील विविध शाळांचं रूपड पालटलं जाणार आहे. शाळा आदर्श बनवल्या जाणार आहेत. अपग्रेड केल्या जाणार आहेत. मग ही पीएम श्री योजना नेमकी आहे तरी काय ? या PM SHREE Yojana 2024 योजनेअंतर्गत शाळांमध्ये काय बदल होतील ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
पीएम श्री योजना नेमकी आहे तरी काय
आपल्या देशांमध्ये नुकतीचं नवीन शिक्षा नीती 2020 लागू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पीएम श्री योजना म्हणजेचं पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही योजना सुरू केली.
पीएम श्री योजनेअंतर्गत 2022 ते 2026 या पाच वर्षांच्या कालावधीत भारतातील 14,500 सरकारी शाळांना अपग्रेड केलं जाईल. या योजनेसाठी केंद्र सरकारने 27000 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४.०
ज्या सरकारी शाळा अपग्रेड केल्या जातील, त्या आपल्या आजूबाजूच्या शाळांना मार्गदर्शन करतील आणि त्यांना सुद्धा अपग्रेडेड शाळेच्या धर्तीवरचं अपग्रेड केलं जाईल. मग आता सरकारी शाळांना अपडेट करायचं म्हणजे, काय करावे लागेल ? तर या योजनेअंतर्गत सरकारी शाळांमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि इतर ऍक्टिव्हिटीसाठी आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जाईल.
देशभरातील या 14500 शाळा राज्य सरकारच्या मदतीने निवडल्या जाणार आहेत. त्यासाठी सुद्धा एक प्रोसिजर आहे. आपण ती जाणून घेऊया.
पीएम श्री योजनेसाठी शाळांची निवड कशी केली जाईल
या PM SHREE Yojana 2024 योजनेअंतर्गत देशभरातील 14,597 शाळांची निवड केली जाणार आहे. परंतु ही निवड एका प्रक्रियेद्वारे केली जाईल. ती प्रक्रिया कशी असेल हे जाणून घेऊया.
1) या योजनेसाठी ज्या शाळा पात्र ठरतील, त्या शाळांमध्ये स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेचे तीन चरण असतील. शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची जिओ टॅगिंग केली जाईल.
2) पहिल्या चरणात भारतातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी नवीन शिक्षा नीती 2020 आपल्या राज्यात पूर्णपणे लागू करण्यासाठी सह्या केल्या.
3) दुसऱ्या चरणामध्ये केंद्र सरकारने या योजनेसाठी जे काही पात्रता निकष ठरवले आहेत. त्या पात्रता निकषांमध्ये बसणाऱ्या सरकारी शाळांची निवड राज्य सरकार करेल.
4) तिसऱ्या चरणात निवडलेल्या शाळांमध्ये काही स्पर्धा भरवल्या जातील आणि या स्पर्धेच्या आधारांवरचं शाळांची या योजनेसाठी (PM SHREE Yojana 2024) निवड केली जाईल.
पीएम श्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या PM SHREE Yojana 2024 योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारी शाळांना स्वतःहून अर्ज करावा लागेल. केंद्र सरकार या योजनेसाठी एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च करणार आहे. या ऑनलाइन पोर्टलवर शाळांना अर्ज करावा लागेल. प्रत्येक तिसऱ्या महिन्याला म्हणजेचं तिमाहीत हे ऑनलाइन पोर्टल सुरू होईल आणि रजिस्ट्रेशनही सुरू होतील.
पीएम श्री योजने का महत्त्वाची आहे
मागील काही दशकांमध्ये भारतातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय होत चालली आहे. त्यातल्या त्यात ज्या शाळा गावांमध्ये आहेत. त्यांना तर खूप समस्यांना सामोरे जावे लागते. अशा अनेक शाळा आहेत, जेथे विद्यार्थी तर आहेत, परंतु शाळांमध्ये त्यांना शिकवायला शिक्षकचं नाहीये. तर शहरी भागामध्ये असं होतंय की, सरकारी शाळांमध्ये शिक्षक आहेत, परंतु विद्यार्थी नाहीयेत.
सरकारी शाळांची ही परिस्थिती शहरांमध्ये आणि गावांमध्ये वेगवेगळी आहेत. त्याची कारणही वेगळी आहेत जसं की, गावांमध्ये मुलांना कोणत्याही प्रायव्हेट शाळांचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात. त्यामुळे त्यांना सरकारी शाळेतचं ऍडमिशन घ्यावं लागतं.
परंतु सरकारी शाळेचे शिक्षक अनेक वेळेस अदलाबदली करून घेतात. दोन शिक्षक असतील तर एकचं शिक्षक महिनाभर येतो आणि दुसरा शिक्षक घरी राहतो. पुढच्या महिन्यात शिक्षक पुन्हा अदलाबदली करतात आणि सुट्ट्या मारतात. गावातील सरकारी शाळांमध्ये शिकवण्याचा स्तर सुद्धा मागील काही वर्षांमध्ये खूप ढासळला आहे.
याउलट ज्या शहरातील सरकारी शाळा आहेत, तेथे शिक्षक तर आहेत. परंतु विद्यार्थ्यांची पटसंख्या खूप कमी आहे. कारण शहरांमध्ये पालक कर्ज काढतात आणि मुलांना प्रायवेट शाळांमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्याचा विचार करतात.
तसंच ज्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थीही आहेत, शिक्षकही आहेत, परंतु प्रायव्हेट शाळांच्या तुलनेत त्यांच्याकडे कोणत्याही फॅसिलिटी नाहीये. जसं की आजकाल प्रायव्हेट शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आले आहेत. विद्यार्थ्यांना एलईडी स्क्रीन प्रोजेक्टरच्या साह्याने शिकवलं जातं. तेच सरकारी शाळांमध्ये अजूनसुद्धा स्मार्ट क्लासरूम नाहीये. त्यांना फळा आणि खडूच्या माध्यमातून शिकवलं जातं.
प्रायव्हेट शाळा आज-काल एक्स्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हिटीकडेही लक्ष देतात. मग ते खेळ असो किंवा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण जसं की गाणं, डान्स आणि कराटे यांकडेही लक्ष दिलं जातं. परंतु सरकारी शाळांमध्ये फक्त शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असतात. येथे खेळ किंवा इतर ऍक्टिव्हिटीजकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही.
त्यामुळे असे अनेक पालक आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानासुद्धा आपल्या मुलांचे भविष्य चांगलं व्हावं, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी ते घरातील खर्च कमी करतात, कर्ज करतात, परंतु मुलांना प्रायवेट शाळांमध्ये शिकवतात. इच्छा असतानाही ते मुलांना सरकारी शाळेत पाठवत नाहीत.
परंतु जर सरकारी शाळांची परिस्थिती सुधारली, सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांप्रमाणेचं अपग्रेड झाल्या. तेथेही स्मार्ट क्लासरूम आले, खेळ आणि इतर ऍक्टिव्हिटीबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. तर अनेक पालक आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवतील. त्यांना जास्त फी भरून प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना पाठवण्याची गरज पडणार नाही.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशात प्रायव्हेट शाळा फक्त मोठमोठ्या शहरांमध्ये होत्या. सरकारी शाळांमध्ये जास्तीत जास्त मुलं शिकली आहेत. परंतु आता चित्र पूर्णपणे बदललंय. एकीकडे सरकारी शाळांची संख्याही कमी होतेय, तर दुसरीकडे प्रायव्हेट शाळांची संख्या वाढत चालली आहे.
एका बिल्डिंगमध्ये, एका गल्लीमध्ये राहणारी सर्व मुलं एकाचं शाळेत जायची. परंतु आता एका बिल्डिंगमध्ये राहणारी सगळी मुलं वेगवेगळ्या शाळांमध्ये जातात. पालकांना परवडेल अशा वेगवेगळ्या फी असलेल्या शाळांमध्ये मुलांना पाठवलं जातं. त्यामुळे एक सामाजिक विभागणी सुद्धा होत आहे.
आई-वडिलांकडे असलेल्या पैशांच्या बळावर त्यांची मुलं वेगवेगळे शिक्षण घेत आहे. त्यांना शैक्षणिक सुविधा मिळत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने पीएम श्री योजना PM SHREE Yojana 2024 सुरू केली आहे. पुढील चार वर्षांमध्ये नक्कीच आपल्या देशातील सरकारी शाळांमध्ये या योजनेमुळे अमुलाग्र बदल घडून येईल आणि सरकारी शाळांकडे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, यात शंका नाही.
FAQ’s About PM Shree Yojana पीएम श्री योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : PM SHREE Yojana 2024 कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : पीएम श्री योजना 2022 – 2023 या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात आली आहे.
2) प्रश्न : पीएम श्री योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : आपल्या देशातील सरकारी शाळांचा स्तर उंचावणं, त्यांचं अपग्रेडेशन करणं, स्मार्ट क्लासरूम आणि खेळ इत्यादी गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणे, हेच पीएम श्री योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
3) प्रश्न : PM SHREE Yojana 2024 अंतर्गत देशातील सर्व सरकारी शाळांचं अपग्रेडेशन केलं जाईल का ?
उत्तर : नाही, या योजनेअंतर्गत देशातील 14,500 पेक्षा जास्त सरकारी शाळांचे अपग्रेडेशन केलं जाईल. या शाळांची निवड करण्यासाठीही सरकारने एक योजना आखली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शाळांची निवड होईल.
4) प्रश्न : PM SHREE Yojana अंतर्गत शाळांना अर्ज कसा करता येईल ?
उत्तर : या योजनेत सामील होण्यासाठी सरकारी शाळांना एक पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल. या पोर्टलवर ते अर्ज करू शकता.
5) प्रश्न : PM SHREE Yojana 2024 अंतर्गत शाळांसाठी काय बंधनकारक आहे ?
उत्तर : या योजनेत सामील होण्यासाठी शाळांनी नवीन शिक्षा प्रणाली 2020 ची अंमलबजावणी करायला हवी.
पीएम श्री योजना PM SHREE Yojana 2024 खरंच एक ऐतिहासिक आणि कौतुकास्पद पाऊल आहे. मागील काही दशकांमध्ये भारतातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे आणि ती सुधारायची गरजचं होती. या योजनेमुळे ते उद्दिष्ट नक्कीचं पूर्ण होईल असं वाटतंय.
तुमच्या मनात पीएम श्री योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !