जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ? मदर्स डे निमित्त शेअर केले फोटो

जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का

जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ? काल ‘मदर्स डे’ खूपच उत्साहात साजरा केला गेला. सर्वांनी आपल्या आईच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला आणि आपल्यासाठी आयुष्यभर एवढं सगळं केलं त्यासाठी तिचे मनापासून आभार मानले. प्रत्येक आईचं कर्तृत्व पाहता तिच्यासाठी फक्त एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस हा तिच्यासाठीच असला पाहिजे.

मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येकजनाने आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर ठेवत तिचे आभार मानले. आपल्या मराठी कलाकारांनीही आपल्या आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्यासाठीचं प्रेम व्यक्त केलं.

जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ?

मराठी मालिकाविश्वातील सर्वांची आवडती अभिनेत्री जुई गडकरीनेही मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. जुईने आपल्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केलेत आणि आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jui Gadkari Mother
Jui Gadkari Mother

जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ? जुईची आई ही दिसायला तिच्यासारखीच खूप सुंदर आहे आणि जुई ही हुबेहूब तिच्या आईसारखीच दिसते. जुईने पहिल्यांदाच आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो तिच्या फॅन्सना खूपच आवडत आहेत.

Jui Gadkari Mother  

जुईने शेअर केलेल्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. फॅन्स त्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा देत आहेत. काहींना त्या दोघी तर एकमेकींच्या बहिणीच वाटत आहेत. सगळेजण त्यांचं खूप कौतुक करताय.

Jui Gadkari Mother
Jui Gadkari Mother

जुई ही सध्या मालिकविश्वातील नंबर 1 ची मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये प्रमुख भूमिका साकारतेय. तिने अनेक वर्षांनंतर या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलं होतं. ‘ठरलं तर मग‘ मालिका सध्या खूप गाजतेय. जुई साकारत असलेली सायली ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडतेय. अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्या पण ‘ठरलं तर मग’ मालिकेचं स्थान कोणीही हलवू शकलं नाही. प्रेक्षकांचं जुईवर असलेलं हे प्रेमच आहे जे तिच्या मालिकेसाठीही दिसून येतं.

मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top