मातृदिन च्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले अभिनेते मिलिंद गवळी
मातृदिनाच्या दिवशी आपल्या आईसाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय.
माझी आई तर माझी काळजी करत करतच गेली, स्वतःची काळजी तिने कधी घेतलीच नाही,
तिने तिचा आनंद जगाबरोबर साजरा केला पण तिचं दुःख मात्र तिने तिच्याजवळच कायम ठेवलं,
आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तक्रार तिने कधी केली नाही, तिने तिचं जगणं नेहमी celebrate च केलं.
माझी आई असेपर्यंत मी राजासारखाच जगलो, तीने मला प्रामाणिकपणे कष्ट करायला शिकवलं
ती स्वतः खूप मोठी मोठी स्वप्न पाहायची, तिने मलाही मोठी स्वप्न बघायला शिकवलं
तिला राग द्वेष हे काय माहिती नव्हतं तिला फक्त असीम प्रेम करणं निस्वार्थ प्रेम करणं हेच ठाऊक होतं
गणेशपुरीच्या नित्यानंद बाबांवर मुक्तानंद बाबांवर आणि गुरुमांईवर अपार श्रद्धा होती,
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more